Home » ChatGPT ची जगभरात का होतेय जोरदार चर्चा?

ChatGPT ची जगभरात का होतेय जोरदार चर्चा?

by Team Gajawaja
0 comment
ChatGPT
Share

चॅट जीपीटी सध्याच्या दिवसात फार चर्चेत आहे. टेक वर्ल्ड मध्ये ही टर्म आजकाल सध्या सर्वांकडून बोलली जात आहे. तुम्ही सुद्धा कुठे ना कुठे हे ऐकले असेल. परंतु असे म्हटले जात आहे की, येणाऱ्या काळआत हे चॅटबॉट गुगल आणि दुसऱ्या सर्च इंजिनांसंबधित काही गोष्टी संपुष्टात आणू शकते. लोक गुगलवर चॅट जीपीटी काय आहे या बद्दल लिहून सर्च करत आहेत. तर याच बद्दल आपण अधिक जाणून घेऊयात.(ChatGPT)

चॅट जीपीटी नक्की काय आहे?
चॅट जीपीटी एक डीप मशीन लर्निंग बेस्ड चॅट बॉट आहे. चॅट जीपीटी म्हणजेच (Chat Generative Pretrained Transformer) असा होतो. हे डेव्हलप करणारी कंपनीचे नाव ओपन आय असे आहे. चॅट जीपीटी एक प्रकारचा चॅट बॉट आहे. हा एक असा बॉट आहे जो युजर्सद्वारे विचारल्या गेलेल्या प्रश्नांची संपूर्ण तपशीलवारासह उत्तर तयार करुन देतो.

खासियत काय?
चॅट जीपीटीला ३० नोव्हेंबर २०२२ रोजी लॉन्च करण्यात आले होते. जीपीटी सारखे चॅट बॉच मोठ्या प्रमाणात डेटा आणि कंप्युटिंग तंत्रज्ञानाद्वारे संचलित होतात. असे अशा कारणास्तव शब्दांसह योग्य पद्धतीने एकत्रित जोडल्यानंतर त्याचे काही उत्तरे तयार केली जातील. या माहितीसह शब्दावलीचा वापर केल्यास तर शब्दांचा योग्य संदर्भ कळू शकतो. गुगल आणि मेटासह दुसऱ्या तांत्रिक कंपन्यांनी सुद्धा हे मॉडेल डेवलप केले आहे. जे अशा प्रोग्रामासाठी प्रश्नांची उत्तर देतात. तर Open AI ने जे Chat GPT इंटरफेस तयार केला आहे. जे सामान्य जनतेसाठी थेट वापरण्यायोग्य आहे.

गुगलपेक्षा किती वेगळा आहे ChatGPT?
गुगल आणि चॅट जीपीटी मधील फरकाबद्दल बोलायचे झाल्यास तर गुगल केवळ एक सर्च इंजिन आहे. हे युजर्सने सर्च केल्यानंतर रिजल्ट्सच्या लिंक्स समोर दाखवल्या जातात. तर चॅट जीपीटी युजर्सने विचारलेले प्रश्नांची उत्तरे एआयच्या माध्यमातून तयार करुन टेक्स फॉर्ममध्ये समोर ठेवली जातात. चॅट जीपीटीला कोणताही प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि त्या प्रत्येकाचे उत्तर दिले जाते. AI प्रोग्राम चॅट जीपीटी युजरला त्यांनी दिलेल्या उत्तरामुळे संतुष्ट नसेल तर त्याच्या डेटात बदल करन नवा डेटा देतो.(ChatGPT)

चॅट जीपीटीमुळे गुगलला किती धोका आहे?
चॅट जीपीटीला कोणताही प्रश्न विचारला जाऊ शकतो. तो आर्टिफिशियल इंटेलीजेंस म्हणजेच एआयच्या माध्यमातून उत्तर तयार करुन युजरच्या समोर ठेवतो. गुगवर आपल्या प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी आपल्याला काही ऑप्शन दाखवले जाता. अशातच योग्य उत्तरापर्यंत पोहचण्यासाठी आपल्याला पाच ते दहा वेबसाइट्स चाळाव्या लागतात. तर चॅटजीपीटी तुमच्या त्याच प्रश्नांची उत्तर योग्य पद्धतीने देतो. टेक इंडस्ट्री मध्ये गुगलची प्रतिस्पर्धी कंपनी माइक्रोसॉफ्टने चॅच जीपीटीवर १० अरब डॉलरच्या गुंतवणूकीची घोषणा केली आहे. अशातच गुगला एआय आधारित या टूलमुळे धोका उद्भवू शकतो.

हे देखील वाचा- १ मार्च पासून सोशल मीडियात नवे नियम, ऑनलाईन तक्रार करता येणार

चॅट जीपीटीची कशी सुरुवात झाली?
इंटरनेटवर असलेल्या माहितीनुसार, चॅट जीपीटीची सुरुवात २०१५ मध्ये सॅम ऑल्टमॅन आणि एलन मस्क यांनी मिळून केली होती. तेव्हा ही एक नॉन-प्रॉफिट कंपनी होती. मात्र २०१७-१८ च्या दरम्यान, एलन मस्क वेगळे झाले. एलन मस्क यामधून बाहेर पडल्यानंतर मायक्रोसॉफ्ट कंपनीचे मालिक बिल गेट्स यांनी मोठी गुंतवणूक केली. कंपनीने ३० नोव्हेंबर २०२२ रोजी ते प्रोटोटाइपच्या आधारावर लॉन्च केले होते.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.