Home » नेटफ्लिक्सचा पासवर्ड आता दुसऱ्यासोबत शेअर करता येणार नाही

नेटफ्लिक्सचा पासवर्ड आता दुसऱ्यासोबत शेअर करता येणार नाही

by Team Gajawaja
0 comment
Recharge Plans
Share

OTT सर्विसचा पासवर्ड घरातील मंडळी किंवा मित्रांसोबत शेअर करणे सामान्य गोष्ट आहे. परंतु जर तुम्ही नेटफ्लिक्स वापरत असल तर आता त्याचा पासवर्ड एकमेकांसोबत शेअर करता येणार नाही. नेटफ्लिक्सने आपल्या पासवर्ड शेअरिंगच्या नियमात मोठे बदल करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. कंपनीकडून असे सांगितले गेले आहे की, या तिमाहीत पेड शेअरिंग सर्विस सुरु केली जाणार आहे. म्हणजेच आता जर तुम्ही नेटफ्लिक्सचा पासवर्ड आपल्या खास व्यक्तीसोबत जरी शेअर करत असाल तर त्यासाठी वेगळा शुल्क द्यावा लागणार आहे.(Netflix password sharing)

नुकत्याच झालेल्या नव्या सीईओ ग्रेस पीटर्स आणि टेड सारंडोस यांनी ब्लूमबर्गसोबतच्या एका मुलाखतीत पासवर्ड शेअर करण्यासंदर्भातील ही घोषणा केली होती. याबद्दल अधिक माहिती मात्र दिली नाही. पीटर्स यांच्या मते, कंट्रोल पासवर्ड शेअरिंक केल्यानंतर व्हिडिओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म युजर्सच्या अनुभवासोबत कोणतीही तडजोड करणार नाही.

अशातच प्रश्न उपस्थितीत राहतो की, नेटफ्लिक्सच्या अकाउंट होल्डरची ओळख कशी कळणार? स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मने यापूर्वी सांगितले होते की, नेटफ्लिक्स नव्या पासवर्ड शेअरिंग नियमाला आयपी अॅड्रेस, डिवाइस आयडी आणि अकाउंट अॅक्टिव्हिटीच्या माध्यमातून लागू करणार आहे. अशा प्रकारे, स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म त्या युजर्सची ओळख पटवणार जे कोणत्याही विशेष घरातून बाहेर आहेत आणि नेटफ्लिक्सवरील कंटेट मोफत पाहू इच्छितात.

नेटफ्लिक्सने असे म्हटले आहे की, आता केवळ एकच डिवासइच किंवा मोबाइलमध्ये नेटफ्लिक्सच्या अकाउंटला लॉगइन केले जाऊ शकते. आता पर्यंत असे होत होते की, जर एखाद्याने नेटफ्लिक्सचे सब्सक्रिप्शन घेतले असेल तर ते चार-पाच लोकांसोबत शेअर केले जात होते. म्हणजेच नेटफ्लिक्सच्या एका सब्सक्रिप्शनचा फायदा एकत्रित चार-पाच लोक घेत होते.(Netflix password sharing)

पासवर्ड शेअरिंमुळे होत आहे नुकसान
दरम्यान, कंपनीने अशा प्रकारची सेवा बंद करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, पासवर्ड शेअर केले जात असल्याने कंपनीला फार मोठे नुकसान होत आहे. यामुळेच कंपनी लॉगइन पासवर्ड शेअर करण्याची सुविधा बंद करणार आहे. त्याचसोबत नेटफ्लिक्सवरील प्रेक्षकांना उत्तम अनुभव देण्याचा ही प्रयत्न केला जात आहे.

हे देखील वाचा- फोनमध्ये इंटरनेट सुरु होत नसेल तर ‘या’ सेटिंग्समध्ये करा बदल

दरम्यान, कंपनीने गेल्याच वर्षात नोव्हेंबर मध्ये एक कमी किंमतीचा, अॅड सपोर्टेड प्लॅन लॉन्च केला आहे. जो सध्या युएस, ऑस्ट्रेलिया, ब्राजील, ब्रिटेन, कॅनडा, फ्रांन्स, जर्मनी, इटली, जापान, दक्षिण कोरिया, मॅक्सिको, स्पेनसह १२ मार्केट्समध्ये उपलब्ध करुन दिला गेला आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.