नेपाळ मधील पोखरा मध्ये येति एअरलाइन्सच्या अपघाताने सर्वांना हादरुन टाकले आहे. या अपघातात ६८ जणांचा मृत्यू झाला. येति एअरलाइन्सच्या अपघातानंतर ब्लॅक बॉक्स मिळाला आहे. ब्लॅक बॉक्स हा खरंतर अपघाताचे नेमकं कारणं काय असते यामधून समोर येते. येति एअरलाइन्सचे एक विमान पोखरा येथे लँन्डिंग करण्यापूर्वी त्याचा अपघात झाला होता. ४१ प्रवाशांची ओळख पटल्याचे सांगितले गेले. विमानातील ब्लॅक बॉक्स मिळाला असून आता हे अपघात कसा झाला हे समोर येऊ शकते. (Black Box)
परंतु कोणत्याही विमान अपघातानंतर तपास एजेंसी त्याच्या ब्लॅक बॉक्सला शोधू लागतात. अखेर त्यामध्ये असे काय असते जो अपघाताचे गुपित उघडे करतो आणि तो का ऐवढा महत्वाचा असतो याच बद्दल आपण जाणून घेऊयात.
ब्लॅक बॉक्स म्हणजे काय?
ब्लॅक बॉक्स कोणत्याही विमानाचा महत्वाचा हिस्सा असतो. ब्लॅक बॉक्स सर्व विमानांमध्ये असतो जरी ते पॅसेंजर विमान असो किंवा कार्गो अथवा फाइटर. तो वायुयानमध्ये उड्डाणादरम्यान विमाना संदर्भातील सर्व हालचालींचे रेकॉर्ड केले जाणारे उपकरण आहे. याला फ्लाइट डेटा रेकॉर्डर असे ही म्हणतात. सर्वसामान्यपणे या बॉक्सला सुरक्षित दृष्टीने विमानाच्या मागील हिस्स्यात ठेवला जातो. ब्लॅक बॉक्स टाइटेनियमचा बनवलेला असतो आणि टाइटेनियमच्या बनवलेल्या डब्ब्यात तो बंद असतो. जेणेकरुन उंचीवरुन जमीनीवर किंवा समुद्राच्या पाण्यात पडल्यानंतरच्या स्थिती त्याला कमीत कमी नुकसान व्हावे.
ब्लॅक बॉक्सच्या माध्यमातून कशा प्रकारे गुपित उघडले जाते?
खरंतर दुर्घटनेच्या कारणांची माहिती कळण्यासाठी ब्लॅक बॉक्स हा विमानात ठेवला जातो. विमानातील ब्लॅक बॉक्स किंवा फ्लाइट डेटा रेकॉर्डर, विमानात उड्डाणादरम्यान विमानासंदर्भातील सर्व प्रकारच्या हालचाली जशी विमानच्या दिशा, उंची, इंधन, गति, केबिनचे तापमान सारखे ८८ प्रकारच्या आकड्यांबद्दल २५ तासांहून अधिकचे रेकॉर्डेड माहिती एकत्रित ठेवतो.(Black Box)
हे देखील वाचा- विमानांचा रंग नेहमीच सफेद का असतो?
कधीपासून लावला जात आहे विमानांमध्ये ब्लॅक बॉक्स?
ब्लॅक बॉक्सचा इतिहास ५० वर्षांपेक्षा फार जुना आहे. खरंतर ५० वर्षाच्या दशकात जेव्हा विमान अपघातांची संख्या सातत्याने वाढत होती. त्यावेळी १९५३-५४ च्या दरम्यान तज्ञांनी विमानांमध्ये एक असे उपकरण लावण्याबद्दल सांगितले होते की, जे विमान अपघाताच्या योग्य कारणांची माहिती देईल. यामागील उद्देश असा होता की, माहिती मिळाल्यास भविष्यात होणाऱ्या अपघातापासून बचाव केला जाईल. त्यानंतर विमानातील एक ब्लॅक बॉक्सचा निर्माण करण्यात आला. सुरुवातीला तो लाल रंगाच्या कारणास्तव रेड एगच्या नावाने पुकारले होते. सुरुवातीच्या दिवसात बॉक्सचा आतमध्ये काळा रंग दिला जात होता. त्यामुळेच याचे नाव ब्लॅक बॉक्स पडले असेल.