एखाद्या डॉक्टरची अपॉईंटमेट घेण्यासाठी सहा ते नऊ महिन्यांची प्रतीक्षा,ऑपरेशन करण्यासाठी त्यापेक्षाही दुप्पट महिन्यांचे वेटीं,गकोणाचा मृत्यू झाला तर त्याचे शव नेण्यासाठी 8 तास रुग्णवाहिकेची प्रतीक्षा,एका रुग्णाला हॉस्पिटलध्ये दाखल करण्यासाठी दहा तास रुग्णवाहिकेची प्रतीक्षाही,अवस्था कुठल्याही साधारण देशाची नाही (Health Care System). ही अवस्था झाली आहे इंग्लडची. ज्या इंग्लडनं एकेकाळी जगावर राज्य केलं. त्याच इंग्लडमधील आरोग्यव्यवस्था गंभीर अवस्थेत आहे. इंग्लडमधील आरोग्य कर्मचारी संपावर आहेत. काही आठवडे चालू असलेल्या या संपामुळे इंग्लडमधील आरोग्य अवस्थाच आयसीयुमध्ये असल्यासारखी झाली आहे. आरोग्य कर्मचा-यांच्या संपामुळे इंग्लडमध्ये आठवड्याला 500 नागरिकांचा मृत्यू होत असून ही अवस्था युक्रेन आणि श्रीलंकेपेक्षाही वाईट असल्याची बातमी इंग्लडमधील मान्यवर वृत्तपत्रांमध्ये येत आहे. (Health Care System)
सध्या ब्रिटनची सरकारी आरोग्य सेवा व्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली आहे (Health Care System). आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संपामुळे येथील बहुतांशी रुग्णालयातील व्यवस्था कोलमडली आहे. काही ठिकाणी परिस्थिती एवढी भयानक आहे की, रूग्णालयातील मजले, कॉरिडॉर, थांबलेल्या रूग्णवाहिका आणि रुग्णालयाच्या परिसरातही रूग्ण मरत आहेत. रॉयल कॉलेज ऑफ इमर्जन्सी मेडिसिनचे अध्यक्ष एड्रियन बॉयल यांनी याबाबतचे भयानक वास्तव जगासमोर आणले आहे. त्यांनी दर आठवड्यात सुमारे 500 लोक उपचाराअभावी मरत असल्याचे सांगितले आहे. ब्रिटिश रुग्णालयांची स्थिती युद्धग्रस्त युक्रेनपेक्षाही वाईट असल्याचे त्यांनी सांगितले. ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर या मानाच्या पुरस्काराने सन्मानित असलेले डॉक्टर पॉल रॅन्सम यांनीही इंग्लडच्या आरोग्य परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यांनीही इंग्लडमधील रुग्णालयांची अवस्था युक्रेन आणि श्रीलंकेपेक्षा वाईट असल्याचे सांगितले आहे (Health Care System). डॉ. पॉल रॅन्सम यांनी सांगितले की, अनेक रुग्णालयाच्या कॉरिडॉरमध्ये उपचाराच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांच्या रांगा लागल्या आहेत. हे रुग्ण काही तासच नाही तर दिवसदिवस उपचाराच्या प्रतीक्षेत आहेत. ही सर्व परिस्थिती पाहून अत्यंत असाह्य झाल्यासारखे वाटत असल्याचे डॉक्टर रॅन्सम यांनी सांगितले आहे. या सर्वात गंभीर परिस्थिती ज्या रुग्णांचा आजार जास्त आहे, किंवा ज्यांना अती जलदरित्या औषधोपचारांची गरज आहे, अशा रुग्णांची अवस्था वाईट झाली आहे. अशा रुग्णांना प्राधान्य देताना नर्सिंग स्टाफलाही खूप कठीण झाले आहे. कारण एका रुग्णाला जरी रुग्णालयात दाखल करण्यासाठी कारवाई सुरु झाली तर त्या ठिकाणी आणखी दहा ते वीस रुग्णाचा वेढा त्या रुग्णालयाच्या कर्मचा-यांना बसतो. यावरुनच इंग्लडमधील परिस्थिती किती ठेवाळलीय याची कल्पना येते.(Health Care System)
ब्रिटनमधील आरोग्य कर्मचारी त्यांच्या अनेक मागण्यांसाठी अनेक दिवसांपासून संपावर आहेत. ब्रिटनमध्ये आरोग्यसेवा, रुग्णालये ही राष्ट्रीय आरोग्य सेवा (NHS) अंतर्गत सरकारद्वारे चालविली जातात. या रुग्णालयांना सरकारतर्फेच निधीचा पुरवठा केला जातो. मात्र गेल्या काही सरकारच्या धोरणांचा फटका या रुग्णालयांना बसला आहे (Health Care System). सरकारनं निधी पुरवठा एकदम कमी केलाच शिवाय आरोग्य कर्मचारीही कमी केले. सरकारच्या या धोरणाचा फटका आता तेथील जनतेला बसला आहे. आरोग्य कर्मचा-यांना जो काही पगार मिळत आहे, तो अतिशय कमी आहेत. ब्रिटनमध्ये आता आरोग्यस्थिती इकती भयानक आहे की, एखाद्या सामान्य रुग्णाला डॉक्टरांची अपॉइंटमेंट मिळवण्यासाठी सहा ते नऊ महिन्यांची प्रतीक्षा करावी लागते. तर एखादे मोठे ऑपरेशन करायचे असेल तर रुग्णाला 18 महिने वाट पाहावी लागते. या सर्वात लंडनच्या परिचारिका आणि रुग्णवाहिका कर्मचारीही उच्च वेतन आणि सुधारित कामाच्या परिस्थितीच्या मागणीसाठी संपावर गेले आहेत. त्यामुळे बिघडलेली आरोग्यव्यवस्था पार ढेपाळली आहे.
======
हे देखील वाचा : फिलिपिन्समध्ये ड्रग्ज किंवा सोन्याची नव्हे तर चक्क कांद्याची होतेय तस्करी
======
यासर्वांबाबत ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यावरही आरोप करण्यात येत आहे. ऋषी सुनक यांनी पंतप्रधान पदाचा पदभार स्विकारतांना आरोग्य कर्मचा-यांना अनेक आश्वासने दिली होती. त्यात परिचारिकांची भरती आणि प्रत्येक स्थानिक रुग्णालयात खाटांची संख्या वाढवण्यात येईल या आश्वासनांचाही समावेश होता. पण ऋषी सुनक हे पंतप्रधान झाल्यावर या आश्वासनांचा त्यांना विसर पडल्याचा आरोप संपावर गेलेल्या आरोग्य कर्मचा-यांनी केला आहे. ग्रामीण भागातील रुग्णांना रुग्णालयात नेण्यासाठी 600 पौंड म्हणजेच 60 हजार रुपये ते 1300 पौंड म्हणजेच 1.28 लाख रुपये द्यावे लागत आहेत. एवढचं नाही तर काही ठिकाणी रुग्णवाहिकांसाठी सहा ते दहा तासांची प्रतीक्षा करावी लागत आहे. आता संपावर गेलेल्या या आरोग्य कर्मचा-यांनी आपला पगार वेळेवर मिळाला नाही तर हा संप अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. एकेकाळी जगावर राज्य करणा-या इंग्लडची ही परिस्थिती पाहून नक्कीच वाटते की, गड्या आपल्या देशच बरा….
सई बने