डिसेंबर महिन्याचा आजचा शेवटचा दिवस आणि वर्षाचा अखेरीचा हा आजचा दिवस. त्यामुळे जोरदार सेलिब्रेशन करत नवं वर्षाच्या स्वागतासाठी सर्वजण उत्सुक असतात. त्यासाठी लोक फिरण्यासाठी बाहेर जातात. अशातच १ जानेवारी पासून आपण नव्या वर्षाची सुरुवात करत त्याचे स्वागत करतो. या दिवशी ही ठिकठिकाणी जल्लोष केला जातो. प्रत्येकजण आपल्या नुसार सेलिब्रेशन करतो. मात्र तुम्हाला माहिती आहे का, नव्या वर्षाची सुरुवात यापूर्वी १ जानेवारी नव्हे तर एखाद्या दुसऱ्या महिन्यापासून सुरु व्हायची. खरंतर काही वर्षांपूर्वी कॅलेंडरमध्ये (Roman calendar) मध्ये बदल झाला होता. त्यानंतर १ जानेवारी पासून नवं वर्ष साजरा करण्यास सुरुवात झाली. तर मार्च महिन्यात नक्की का साजरं केलं जायचं नवं वर्ष याचबद्दल आपण अधिक जाणून घेऊयात. (Happy New Year)
मार्च महिन्यापासून व्हायची नवं वर्षाची सुरुवात
नवं वर्ष नेहमीच १ जानेवारीला सुरु होते. हे वर्ष साजरं करण्याची सुरुवात १५ ऑक्टोंबर १५८२ रोजी झाली होती. यापूर्वी मार्च महिन्यापासून नवं वर्षाची सुरुवात व्हायची. खरंतर रोमचा राजा नूमा पोंपिलस याने रोमन कॅलेंडरमध्ये काही महत्वपूर्ण बदल केले. त्यामध्ये जानेवारीच्या महिन्याचा समावेश केला. जानेवारीला वर्षाचा पहिला महिना मानले गेले. यापूर्वी कॅलेंडरमध्ये मार्च पासून महिना सुरु होऊन डिंसेंबर पर्यंत संपायचा. म्हणजेच १० महिनेच असायचे. त्यामुळे एका वर्षात ३१० दिवसच मानले जात होते. (Happy New Year)
हे देखील वाचा- जगातील ‘या’ देशांत विचित्र पद्धतीने New Year सेलिब्रेशन करतात
१ जानेवारीची सुरुवात कोणी केली?
विद्वानांच्या मते रोमन शासक जूलियस सीजर याने नव्या वर्षाची सुरुवात १ जानेवारी पासून केली होती. असे म्हटले जात आहे की, जुलियस सीजर याची भेट जेव्हा खगोलशास्रांसोबत झाली तेव्हा त्यांना कळले की, पृथ्वी ३६५ दिवस आणि सहा तासात सूर्याभोवती एक परिक्रमा करते. अशातच हिच गोष्ट लक्षात ठेवत वर्षातील ३१० दिवसांऐवजी ३६५ दिवस केले गेले.
काही वर्षानंतर म्हणजेच १५८२ रोजी पोप ग्रेगरी यांनी जूलियस कॅलेंडरमध्ये लीप ईयर मध्ये थोडी चुक केली. तेव्हा प्रसिद्ध धर्म गुरु सेंट बीड यांनी असे म्हटले की, एक वर्ष म्हणजेच ३६५ दिवस ६ तास नव्हे तर ३६५ दिवस आणि ५ तास आणि ४६ सेकंद असतात. त्यानंतर रोमन कॅलेंडरमध्ये बदल करत एक नवं कॅलेंडर तयार गेले गेले. असे म्हटले जाते की, तेव्हापासून १ जानेवारीला नवं वर्ष म्हणून साजरा करण्याची परंपरा सुरु झाली होती.