पब्लिक प्रोविडेंट फंड देशातील सर्वाधिक प्रसिद्ध स्मॉल सेविंग स्किम पैकी एक आहे. यामध्ये ग्राहकांनी गुंतवणूक केलेली रक्कम ही पूर्णपणे सुरक्षित असते. या शासकीय योजनेत तुम्ही वर्षाला कमीत कमी ५०० रुपयांपासून गुंतवणूक करु शकता आणि अधिकाधिक १.५ लाख रुपयांची मर्यादा आहे. पीपीएफवर सध्या सरकारकडून वर्षभरासाठी ७.१ टक्के दराने व्याज दिले जाते. यामध्ये गुंतवणूक करुन तुम्हाला उत्तम रिटर्न्स मिळू शकतात. पीपीएफ खाते हे तुम्ही देशातील कोणत्याही पोस्ट ऑफिस मध्ये सुरु करु शकता.(PPF Account Withdrawal)
खरंतर पीपीएफमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला एक ठराविक व्याज दिले जाते, ज्याचे वर्षभाराच्या आधारावर आकलन केले जाते. पीपीएफ खाते तुम्ही पोस्ट ऑफिसह कोणत्याही शासकीय आणि खासगी बँकेत ही सुरु करु शकता. यासाठी तुम्ही भारताचे नागरिक असणे फार महत्वाचे आहे. अल्पवयीन मुलांच्या नावाने पीपीएफ खाते सुरु केले जाऊ शकते. मात्र त्यासाठी पालक असणे फार गरजेचे आहे. मुलांच्या खात्यातील कमाई ही पालकांच्या उत्पन्नासंबंधित असते. अशातच जर तुम्हाला गरज भासल्यास पीपीएफ खात्यातून कशा पद्धतीने पैसे काढू शकता त्याबद्दल घ्या जाणून.
वेळेआधीच पैसे काढू शकता
-पीपीएफमध्ये १५ वर्षांसाठी लॉकिंग पीरियड असतो. त्यासाठी तुम्ही जर लॉन्ग टर्मसाठी गुंतवणूक करु पाहत असाल तर पीपीएफ हा एक उत्तम ऑप्शन आहे
-जर तुम्हाला या कालावधीच्या आधीच पैशांची गरज भासल्यास तुम्ही या योजनेतील काही रक्कम काढू शकता
-जर तुम्हाला १५ वर्षाआधीच पैसे काढायचे असतील तर त्याची परवानगी सात वर्षानंतर मिळते
-या योजनेत गुंतवणूक करतेवेळी ही गोष्ट सुद्धा लक्षात घ्या की, पीपीएफ खात्याची मॅच्युरिटी १५ वर्षांची असली तरीही ज्या वर्षी तुम्ही ती सुरु केली आहे ते वर्ष ग्राह्य धरले जात नाही
-पीपीएफ खात्यातून तुम्ही सात वर्षानंतरच काही रक्कम काढू शकता
-खात्यातून तुम्ही ५० टक्के रक्कम काढू शकता. पण एका वर्षात तुम्ही एकदाच पैसे काढू शकता.
-काढलेली रक्कम टॅक्सपेयर मध्ये येईल
पीपीएफ खात्यातील रक्कम कशी काढावी?
-पीपीएफ खात्यातील रक्कम काढण्यासाठी तुम्हाला फॉर्म सी जमा करावा लागतो. तो तुम्हाला पोस्ट किंवा बँकेत मिळतो
-फॉर्मवर तुमचा खाते क्रमांक आणि जेवढी रक्कम काढायची आहे ते सांगावे लागते
-या व्यतिरिक्त एक रेवेन्यू स्टॅम्पची ही गरज भासते
-त्यानंतर ते पासबुकसह जमा करावे लागते
-प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर तुमच्या खात्यात रक्कम ट्रांन्सफर केली जाते (PPF Account Withdrawal)
हे देखील वाचा- ६० वर्षांपूर्वी e-पेमेंट सेवा सुरु करणाऱ्या VISA च्या यशाची कथा
हे फायदे होतात
-तीन वर्षांपर्यंत तुम्ही या योजनेवर कर्ज घेऊ शकता
-कर्जाची सुविधेसाठी खाते सुरु केल्याच्या ३ वर्ष ते सहाव्या वर्षापर्यंत उपलब्ध असते
-पहिले कर्ज फेडल्यानंतरच दुसऱ्या कर्जासाठी अर्ज करता येतो
-पीएफ खात्यातील जमा झालेल्या रक्कमेच्या २५ टक्के कर्ज घेता येते
-पीपीएफमधअये पैसे जमा करुन तुम्हाला उत्तम रिट्रनसह टॅक्समध्ये सूट ही मिळते
-जर तुम्ही इनकम टॅक्स कलम 80C अंतर्गत टॅक्समध्ये सूटचा फायदा घेऊ पाहत असाल तर त्याची मर्यादा अधिकाधिक १.५ लाख रुपयांपर्यंत आहे