शासकीय असो किंवा खासगी कर्मचारी, ग्रॅच्युटी (Gratuity) कायद्याअंतर्गत सर्वांना ठरवलेल्या मर्यादेपर्यंत एक नियोक्ता किंवा कंपनीत काम करण्यावर याचा लाभ मिळतो. जर एखादा कर्मचारी ५ वर्षापर्यंत सातत्याने कोणत्याही नियोक्तेसह काम करतो तर त्याला ग्रॅच्युटीत ठरवलेल्या फॉर्म्युल्याअंतर्गत याच्या रक्कमेचे पेमेंट केले जाते. तेव्हा तुम्ही निवृत्त असाल किंवा नोकरी सोडत असाल, तरीही ग्रॅच्युटीचे पेमेंट करणे गरजेचे असते.
आता असा प्रश्न उपस्थितीत राहतो की, अखेर नोकरी सोडली किंवा राजीनामा दिल्यानंतर किती दिवसानंतर तुम्ही ग्रॅच्युटीसाठी क्लेम करु शकता. वेळ गेल्यानंतर क्लेम केल्यास तुम्हाला तुमचा नियोक्ता पैसे देण्यास नकार देऊ शकतो का? या क्लेमसाठी काय प्रोसेस आहे आणि किती दिवसात तुमच्या खात्यात पैसे येतात. याबद्दलच अधिक जाणून घेऊयात.
-कधी पर्यंत अर्ज करावा लागतो?
ग्रॅज्युटी कायद्याअंतर्गत १९७२ नुसार, कोणताही नियोक्ता कर्मचाऱ्याने नोकरी सोडल्यानंतर किंवा राजीनामा दिल्यानंतर ३० दिवसांमध्ये ग्रॅच्युटीच्या रक्कमेचे पेमेंट करणे गरजेचे असते. अशातच कर्मचाऱ्याला सुद्धा ३० दिवसाच्या ठरवलेल्या कालावधीमध्ये अर्ज करणे गरजेचे असते. जर तुम्ही स्वत: अर्ज करु शकत नसाल तर ज्या ठिकाणी सुद्धा ऑथराइज केले आहे तेथे ३० दिवसांच्या आतमध्ये ग्रॅच्युटीसाठी अर्ज करु शकता.
जर ३० दिवसानंतर अर्ज केल्यास तर…
खरंतर ग्रॅच्युटीसाठी ३० दिवसात अर्ज करण्याचा कालावधी आहे. मात्र एखाद्या कर्मचाऱ्याने त्यानंतर ग्रॅच्युटीसाठी अर्ज केल्यास कंपनी तो रिजेक्ट करु शकत नाही. दरम्यान, या बद्दल कोणताही क्राइटेरिया नाही की, नोकरी सोडणे किंवा राजीनामा दिल्यानंतर तुम्ही अर्ज करु शकता. मात्र तुमच्या अर्जाला कंपनीला हे सांगून कधीच फेटाळून लावू शकत नाही जर अर्ज हा ठरवलेल्या मर्यादित सीमेनंतर आला असेल तर.(Gratuity)
हे देखील वाचा- ‘या’ लोकांना पुन्हा अपडेटेड करावे लागणार आधार कार्ड
ग्रॅच्युटी क्लेम करण्याची काय आहे प्रोसेस?
-नोकरी सोडल्यानंतर किंवा राजीनामा दिल्यानंतर ३० दिवसांमध्ये कर्मचाऱ्याला फॉर्म ‘I’ भरुन द्यावा लागतो
-जर कर्मचारी आपल्या ठिकाणी एखाद्याला नॉमिनी करतो किंवा ऑथराइज करत असेल तर त्याला फॉर्म J भरुन नियोक्ताला द्यावे लागेल
-अर्ज मिळाल्यानंतर १५ दिवसांमध्ये तुमचा नियोक्ता त्यावर तुम्हाला रिप्लाय करेल
-जर अर्ज नियमाअंतर्गत योग्य असेल आणि तुमची ग्रॅच्युटी झाल्यास तर नियोक्ता फॉर्म L मध्ये संपूर्ण रक्कमेची माहिती भरुन देईल
-नियोक्ता आपली एक निश्चित तारीख सुद्धा सांगतो, ज्या अंतर्गत तुम्हाला ग्रॅच्युएटीचे पेमेंट केले जाईल. हा कालावधी तुमच्या अर्जाच्या ३० दिवसाच्या आतमध्ये असला पाहिजे.