काही लोक अशा गोष्टींमुळे लगेच आकर्षित वाटतात ज्या त्यांच्यासाठी खुप महत्वाच्या असता. जसे की एखादा फोटो, प्रतीक किंवा एखादी म्हण. अशातच सध्याच्या बदलत्या जगात टॅटू काढण्याची क्रेज ही सर्व वयोगटातील लोकांमध्ये आहे. त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे, अर्थाचे, भाषांचे टॅटू आपल्या शरिरावर काढले जातात. काहींना असे केल्याने आपले सौंदर्य अधिक खुलल्याचे वाटते. अशातच तुम्ही कधी एखाद्याने टॅटू काढलाय पण तो बारकोड असल्याचे ऐकले आहे का? हे ऐकून थोडे विचित्र वाटेल. पण हे खरं आहे. (Barcode Tattoo)
खरंतर बारकोड हा एखाद्या प्रोडक्ट किंवा वस्तूची किंमत स्कॅन करण्यासाठी दिला गेलेला असतो. पण व्यक्तीने जर अंगावर टॅटू म्हणून बारकोड काढला तर हे विचित्रच आहे. जगात स्मार्टफोनची चलती असल्याने कॅश पेमेंट हे ट्रेंन्डच्या बाहेर गेले असून डिजिटल पद्धतीने व्यवहार केले जात आहे. यामध्येच एका व्यक्तीने चक्क आपल्या हातावर बारकोड असलेला टॅटू काढला आहे. यामागील कारण सुद्धा ऐकून तुम्ही चक्रावाल.
आपल्या हातावर बारकोड असलेला टॅटू काढला
बहुतांश लोक कार्ड किंवा ट्रांजेक्शन अॅपच्या माध्यमातून पेमेंट करतात, जे भारतात सामान्यपणे युपीआय पेमेंटच्या रुपात असते. जर तुम्ही फोनवर एक कोड स्कॅन केला तर अॅपच्या माध्यमातून पेमेंट करता येते. पण व्यक्तीने हातावर टॅटू हा बारकोडचा काढल्याने सध्या चर्चेत आहे. यामागील कारण असे की, त्याला वेळोवेळी फोनवर काढण्यास आळस येतो. तुम्हाला सुद्धा थोडे विचित्र वाटले ना? खरंतर वारंवार फोन काढून पेमेंट करण्यापासून सुटका मिळावी म्हणून त्याने असे केले. (Barcode Tattoo)
हे देखील वाचा- किराणा मालाच्या दुकानात कपलने केले लग्न, कारण ऐकून व्हाल हैराण
आळशीपणामुळे असे करावे लागले
नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, ताइवान मधील एका व्यक्ती वारंवार एखाद्या गोष्टीसाठी पेमेंट करण्यासाठी कंटाळा करायचा. त्यामुळेच त्याने असा विचित्र फंडा काढला. त्याने आपला पेमेंट बारकोडचा टॅटू हा हातावरच काढला. व्यक्तीचे नाव समोर आलेले नाही. पण आता तो ताइवानमध्ये खुप लोकप्रिय झाला आहे. त्याची कथा कथा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म डीकार्डवर व्हायरल होत आहे. सोशल मीडिया अॅपवर पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडिओ मध्ये व्यक्तीने असे म्हटले की, दीर्घकाळापासून त्याला टॅटू काढायचा होता. अशातच त्याने असा अनोखा विचार केला.