अमेरिकेतील आंतराळ एजेंसी नासाने एक अभ्यास केला आहे. मात्र त्याचा निकाल हा अत्यंत थरकाप उडवणारा आहे. कारण अभ्यास केला आहे तो सुद्धा अमेरिकेबद्दलच पण त्याचा परिणाम मात्र संपूर्ण जगावर पहायला मिळणार आहे. अभ्यासात असा इशारा दिला गेला आहे की, २०५० पर्यंत अमेरिकेतील जवळजवळ सर्वच समुद्र किनाऱ्यालगतची तट बुडणार आहेत. त्याचसोबत असे ही सांगितले गेले आहे की, कोणता तट किती बुडणार. जेव्हा अमेरिकेतील तट बुडतील तेव्हा काही देशांची स्थिती वाईट होणार आहे. फक्त तटच बुडण्याचा धोका नव्हे तर लहान मोठ्या वादळांमुळे समुद्राला पुर येण्याचा धोका सुद्धा वाढणार आहे. नासाने हा अभ्यास तीन दशकांच्या सॅटेलाइट डेटाच्या विश्लेषणातून केला आहे. त्यानंतर नासाच्या वैज्ञानिकांनी असे सांगितले की, अमेरिकेतील तट एक फुटापर्यंत बुडतील. म्हणजेच आताच्या जलस्तराच्या एक फूट अधिक. सर्वाधिक प्रभावित होणार तो म्हणजे खाडीचा तट (Golf Coast) आणि दक्षिणपूर्व (Southeast Coast) चा तट. म्हणजेच न्यूयॉर्क, सॅन फ्रांसिसको, लॉस एजेंल्स आमि वर्जिनिया सारखे काही तटीय राज्यांना धोका उद्भवणार आहे. (NASA Study)
समुद्राच्या पाण्याची पातळी वाढण्यासह वादळामुळे समुद्राला येणाऱ्या पुरामुळे अधिक समस्या उद्भवणार आहे. हा अभ्यास नुकत्याच कम्युनिकेशंन्स अर्थ अॅन्ड एनवायरमेंट जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. नासाच्या या नव्या अभ्यास काही वैज्ञानिक एजेंसिंनी काही रिसर्च रिपोर्टचे अॅनालिसिस ही केले आहे. ज्याला सी-लेवल राइज टेक्निकल रिपोर्ट असे म्हटले जाते. यामध्ये असे सांगितले गेले आहे की, पुढील ३० वर्षांमध्ये अमेरिकेतील तटांवर पाणीच पाणी असणार आहे.
अमेरिकेतील ईस्ट कोस्टवर समुद्राची पातळी १० ते १४ इंचांनी वाढणार आहे. तर खाडीचा तट हा १४ ते १८ इंचांनी वाढेल. पश्चिम तटावर ४ ते ८ इंचाची वाढ होईल. या अभ्यासासाठी जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीच्या वैज्ञानिकांची सुद्धा मदत घेतली जाणार आहे. या लोकांनी सॅटेलाइट डेटाच्या आधारावर मल्टी एजेंसी स्टडीजला मान्यता दिली आहे.
युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन यांच्या क्लाइमेट साइंटिस्ट जोनाथन ओवरपेक यांनी असे म्हटले की, नासाने आपल्या सॅटेलाइट अल्टीमीटरच्या माध्यमातून समुद्राची सपाटी मोजली. त्यानंतर NOAA च्या टाइड गॉज रेकॉर्ड्स सोबत जुळवून पाहिले. नोआ हा डेटा गेल्या १०० वर्षांपासून एकत्रित करत आहे. त्यानंतर नासाने असे स्पष्ट कळले की, त्यांची रिडिंग्स चुकीची नाही. ग्राउंड लेव्हलवर डेटा योग्य आहे. सर्वाधिक मोठा चिंतेची बाब अशी की, डेटा योग्य आहे. म्हणजेच अमेरिकेतील तटांना धोका आहे. (NASA Study)
हे देखील वाचा- कोरोनानंतर आता Zombie Virus च्या महारोगाची शक्यता
नासाी सी लेवल चेंज टीमचे प्रमुख बॅन हॅमलिंगटन यांनी असे म्हटले की, आम्हाला हे एका मोठ्या आव्हानाप्रमाणे वाटत आहे. हे अत्यंत धोकादायक आहे. अभ्यास तर अमेरिकेचाच आहे पण त्याचा परिणाम संपूर्ण देशावर होणार आहे. फक्त समुद्राच्या पाण्याची पातळीच वाढणार नाही तर त्यासोबत अन्य काही नैसर्गिक समस्या ही वाढणार आहेत. आम्ही गेल्या वर्षातील डेटाचे अॅनालाइजेशन केले आहे. त्यानंतर आजच्या आधारावर पुढील तीस वर्षांची भविष्यवाणी केली आहे, जी योग्य आणि घाबरवणारी आहे.