थँक्सगिव्हिंग डे (Thanksgiving Day) हा उत्तर अमेरिकेत साजरा केला जाणारा एक पारंपरिक सण आहे. तो प्रत्येक नोव्हेंबरच्या अखेरच्या गुरुवारी साजरा केला जातो. यंदाचा थँक्सगिव्हिंग डे २४ नोव्हेंबर २०२२ रोजी साजरा केला जामार आहे. या दिवशी लोक आपल्या घरी पार्टीचे आयोजन करतात आणि त्यामध्ये आपल्या मित्रपरिवाराला डिनरसाठी बोलावतात. एकमेकांना गिफ्ट्स ही यावेळी दिले जातात. हा सण अन्य सणांसारखाच धुमधडाक्यात साजरा केला जातो. मात्र या सण का साजरा केला जातो आणि याचा इतिहास काय आहे याचबद्दल आपण आज अधिक जाणून घेऊयात.
थँक्सगिव्हिंग डे ला ख्रिसमस प्रमाणेच समान महत्व आहे. या दिवशी राष्ट्रीय लोक एकमेकांचे आभार मानलतात. तसेच येणाऱ्या नव्या वर्षासाठी शुभेच्छा सुद्धा देतात.
कॅनडात हा फेस्टिव्हल ऑक्टोंबर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी साजरा केला जातो. असे मानले जाते की, हा फेस्टिव्हल पहिल्यांदा १६२१ मध्ये पिलिग्राम फादर्स यांनी साजरा केला होता. ते एक युरोपियन होते. मात्र युएस मध्ये येऊन ते स्थायिक झाले. त्यांनी अमेरिकेत आपली पहिल्यांदाच शेती केल्यानंतर त्यात यश आल्याने शेजाऱ्यांचे आभार मानले होते आणि एका पार्टीचे आयोजन केले होते. यालाच थँक्सगिव्हिंग डे असे नाव दिले गेले.
१७८९ मध्ये जॉर्ज वॉशिंग्टन यांनी या दिवसाला राष्ट्रीय स्तरावर साजरा करण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून ते आतापर्यंत तो राष्ट्रीय सणाच्या रुपात साजरा केला जातो. काही इतिहासकार असे म्हणतात की, हा दिवस सर्वात प्रथम फ्लोरिडा येथे १५६५ मध्ये साजरा करण्यात आला होता. तर काही जण असे मानतात की, हा दिवस सर्वात प्रथम कॅनडात १५७८ मध्ये साजरा केला गेला होता. (Thanksgiving Day)
हे देखील वाचा- सख्या भावाबहिणीशी लग्न करण्याची प्रथा असणाऱ्या ‘या’ ख्रिस्ती समुदायावर कोर्टाने घातली बंदी
या दिवसाला आधी हार्वेस्ट डे नावाने सुद्धा ओळखले जात होते. अमेरिकेतील लोक या दिवशी टर्की शिजवून खाणे पसंद करतात. या दिवशी मका आणि बिन्सच्या शेतीची सुरुवात होते. तसेच फिश आणि सीफूड सुद्धा बनवले जाते. या व्यतिरिक्त या दिवशी वविध प्रकारचे स्वादिष्ट पदार्थ ही तयार केले जातात. अमेरिकेसह इंग्लंड आणि युरोपियन देशांमध्ये हा फेस्टिव्हल धुमधडाक्यात साजरा केला जातो. शेतीची कापणी करुन काही लोक आपल्या शेजाऱ्यांना जेवणासाठी बोलावतात. या दरम्यान लोक देवाचे आभार मानतात आणि एकमेकांचे सुद्धा आभार मानतात.