Home » कॉमन आयटीआर फॉर्म म्हणजे काय? जाणून घ्या फायदे

कॉमन आयटीआर फॉर्म म्हणजे काय? जाणून घ्या फायदे

by Team Gajawaja
0 comment
Tax Saving
Share

देशात इनकम टॅक्स फाइल करण्यासाठी प्रत्येक वर्षाला करदाता यासंबंधित प्रक्रिया आणि नियमांसंदर्भात टेंन्शनमध्ये असतात. टॅक्सपेयर्सच्या या चिंता दूर करण्यासाठी केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड सातत्याने इनकम टॅक्स फाइलिंगला सोप्पे बनवण्याच्या दिशेने काम करत आहे. यामध्ये १ नोव्हेंबरला सीबीडीटीने असे म्हटले की, ते करदात्यांच्या सुविधेसाठी एक कॉमन आयटीआर फॉर्म इश्यू करु पाहत आहेत. (Common ITR Form)

खरंतर केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला अपडेटेड इनकम टॅक्स रिटर्न फॉर्म जारी करतात. आता कॉमन आयटीआर फॉर्मचा सुद्धा वापर करण्यात येऊ लागला आहे. खास गोष्टी अशी की कमीत कमी चार आयटीआर फॉर्मच्या ऐवजी हा एकच कॉमन फॉर्म असणार आहे. यामध्ये आयटीआर-२, आयटीआर-३, आयटीआर-५ आणि आयटीआर-६ फॉर्मचा समावेश आहे.

Common ITR Form
Common ITR Form

CBDT ने कॉमन आयटीआर फॉर्म वर मागितला अभिप्राय
कॉमन आयटीआर फॉर्म आल्यानंतर आयटीआर-१, आटीआर-४ चे ऑप्शन उपलब्ध असणार आहेत. आयटीआर-७ चे असित्व आधीसारखेच असणार आहे. ज्याचा वापर सार्वजनिक किंवा चॅरिटेबल ट्रस्ट करतात. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने टॅक्स सल्लागारांना कॉमन फॉर्मच्या ड्राफ्टवर अभिप्राय देण्यास सांगितले आहे. यावर विचार-चर्चा करुन अखेर फॉर्म जारी केला जाणार आहे.

हे देखील वाचा- जगातील लोकसंख्या वाढून ८ करोड झाली खरी पण मोजली कशी? जाणून घ्या अधिक

तज्ञांनी सांगितले हे मोठे फायदे
मनीकंट्रोलच्या बातमीनुसार, कॉमन आयटीआर फॉर्मवर टॅक्स तज्ञांनी आपला अभिप्राय मागितला आहे. त्यामध्ये त्यांनी असे म्हटले की, कॉमन आयटीआर फॉर्म किती उपयोगी आहे आणि करदात्यांना याचा काय फायदा होईल.

-Vilato Partners India चे पार्टनर कुलदीप कुमार यांचे असे मानणे आहे की, आयटीआर फाइल करण्यासाठी कंप्लायंस सोप्पी करण्यासाठी कॉमन आयटीआर फॉर्म उत्तम पाऊल आहे. यामुळे टॅक्सपेयर्सला असा विचार करण्याची भासणार नाही की, त्यांना कोणत्या आयटीआर फॉर्मचा वापर करायचा आहे. (Common ITR Form)

-AKM Global चे पार्टनर संदीप सहगल यांनी असे म्हटले की, कॉमन आयटीआर फॉर्म मध्ये अशी काही माहिती नसणार आहे ज्याचा टॅक्सपेयरशी कोणताही संबंध नाही. या फॉर्मला टॅक्सपेयर्सला काही प्रश्नांच्या आधारावर तयार करण्यात आला आहे. प्रश्न अशा पद्धतीने तयार करण्यात आले आहेत की, त्यांची उत्तरे नाही असतील तर त्या संदर्भातील प्रश्न समोर येणार नाहीत.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.