Home » शरिरातील कोलेस्ट्रॉल वाढल्यास होऊ शकतात ‘या’ समस्या, वेळीच काळजी घ्या

शरिरातील कोलेस्ट्रॉल वाढल्यास होऊ शकतात ‘या’ समस्या, वेळीच काळजी घ्या

by Team Gajawaja
0 comment
high cholesterol symptoms
Share

धावपळीच्या आयुष्यात आणि वेगाने चालणाऱ्या लाइफस्टाइलमुळे आरोग्याची काळजी घेणे थोडे मुश्किलच होते. फक्त वृद्धच नव्हे तर तरुणांना सुद्धा विविध आजार होत चालले आहेत. सध्या सर्वाधिक लोक हायकोलेस्ट्रॉलच्या समस्येचा सामना करत आहेत. खरंतर कोलेस्ट्रॉल हेल्दी सेल्स बनवण्यास मदत करतात. मात्र शरिरात त्याचे प्रमण अधिक असल्यास हृदयासंबंधित आजार अधिक वाढू शकतात. तर स्मोकिंग, जंक फूड खाणे किंवा व्यायाम न केल्याने कोलेस्ट्रॉलचा स्तर वाढतो. दरम्यान, शरिरात वाढलेल्या कोलेस्ट्रॉलचे कोणते संकेत ही दिसत नाहीत. (High Cholesterol Symptoms)

कोलेस्ट्रॉल म्हणजे काय?
कोलेस्ट्रॉल एक फॅट आहे जे लीवर द्वारे उत्पन्न होते. हे शरिरात योग्य पद्धतीने काम करणे फार गरजेचे असते. आपल्या शरिरातील प्रत्येक कोशिका जीवंत राहण्यासाठी कोलेस्ट्रॉलची अत्यंत गरज असते. कोलेस्ट्रॉल मोम सारखा चिकट पदार्थ असतो जो ब्लड प्लाजमा द्वारे शरिरातील विविध भागात पोहचवतो. मात्र हे गरजेपेक्षा अधिक एकत्रित झाल्यास गंभीर समस्या होऊ लागते. तर जाणून घेऊयात हायकोलेस्ट्रॉल असल्यास कोणत्या आजारांचा धोका उद्भवतो.

High Cholesterol Symptoms
High Cholesterol Symptoms

हाय ब्लड प्रेशर
कोलेस्ट्रॉल वाढल्यास आपले आर्टिरीजमध्ये ब्लॉकेज होतात. ब्लड वेसल्स मध्ये फॅट्स जमा झाल्याने रक्त हे हृदयापर्यंत पोहचवण्यास खुप जोर दाव्या लागतो. यामुळे हाय ब्लड प्रेशरची समस्या होते. आजच्या काळात हाय ब्लड प्रेशरची समस्या सामान्य झाली आहे.

हृदयासंबंधित आजार
कोलेस्ट्रॉल वाढल्याने रक्तातील कोशिका गोठण्यास सुरुवात होते. ज्यामुळे आर्टरीज मध्ये ब्लड फ्लो कमी होतो. जेव्हा हा कोलेस्ट्ऱॉल तुटतो तेव्हा क्लॉटिंगची समस्या उद्भवते. यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो. (High Cholesterol Symptoms)

हे देखील वाचा- हिवाळ्यात ‘या’ गोष्टींचे करा सेवन, रहाल आजारपणापासून दूर

ब्रेन स्ट्रोक
शरिरात कोलेस्ट्रॉलचा स्तर नियंत्रणाबाहेर गेल्यास ब्रेन स्ट्रोक सुद्धा होऊ शकतो. कोलेस्ट्रॉल वाढल्याने मेंदूला रक्ताचा पुरवठा होत नाही आणि याच कारणामुळे स्ट्रोक येण्याची शक्यता असते.

तर सध्या थंडीचे दिवस सुरु होणार असल्याने या काळात आपले शरिर थोडे स्थूल होते. त्यामुळे शरिराची हालचाल अधिक होत नाहीच पण भुक ही अधिक लागते. अशातच शरिरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण आपण जर तळलेले-तेलकट पदार्थ अधिक खाल्ल्यास वाढू शकते. त्यामुळे कोलेस्ट्रॉल जर थंडीच्या दिवसात नियंत्रणात ठेवायचा असेल तर तुम्ही बदाम, फळ, अक्रोड, बिन्स यांचा समावेश खाण्यात करु शकता.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.