Home » पाटन पटोला साडीचा ९०० वर्षांचा आहे इतिहास, जाणून घ्या अधिक

पाटन पटोला साडीचा ९०० वर्षांचा आहे इतिहास, जाणून घ्या अधिक

by Team Gajawaja
0 comment
Patola saree
Share

पटोला साडीचे (Patola saree) नाव ऐकून थोडे विचित्र वाटेल. पण ही साडी अत्यंत खास पद्धतची आहे. कारण ती तयार करण्यापासून ते किंमत आणि त्यासाठी लागणारा वेळ ऐकून तुम्ही हैराण व्हाल. मात्र कधी विचार केलाय का या साडीमध्ये नक्की असे काय आहे की ती अत्यंत खास मानली जाते. खरंतर नवरात्रीच्या वेळी आपण पटोला मोंघा लावजो या गाण्यावर गरबा खेळतो. पण नक्की पटोला काय आहे हे कधी जाणून घेतलेय का? तुम्ही अगदीच महागडी साडी ही ४०-५० हजार रुपयांच्या रेंजमध्ये खरेदी केली असेल किंवा पाहिली असेल. मात्र पटोला साडीची किंमत ही तब्बल २ लाखांपासून सुरु होते. ही साडी अत्यंत सुंदर आणि खास आहे. तर जाणून घेऊयात महागडी पटोला साडी कशी बनवली जाते.

हस्तकलेपासून बनवली आहे ही साडी
पटोला साडी बनवणाऱ्यांनी याबद्दल अधिक माहिती देत असे म्हटले की, या साडीचे संपूर्ण काम हे हाताने केले जाते. हँन्डलूम पटोला बनवण्याची प्रक्रिया ही थोडी गुंतागुंतीची आहे. मात्र त्या लोकांसाठी कठीण आहे ज्यांना या साडीमधील कला माहिती नाही. साडी बनवताना एक जरी धागा इकडे तिकडे झाल्यास संपूर्ण साडी खराब होते. पटोला साडी बनवण्यासाठी कोणत्याही पॉवरफूल मशीनचा वापर केला जात नाही. संपूर्ण साडीवर नशीकाम ते बनवण्याची प्रक्रिया हातानेच होते. ९०० वर्ष जुन्या या आर्टची खरेदी करण्यासाठी विदेशातील लोक ही येतात. ऐवढी महागडी पटोला साडी आहे पण त्यांची मोठी इंडस्ट्री असेल असा प्रश्न नक्कीच मनात उपस्थितीत होतो. मात्र तुम्हाला ऐकून धक्का बसेल की, पाटन पटोला साडीसाठी कोणतीही इंडस्ट्री नाही आहे. हा व्यापार फक्त ऑर्डवर चालतो. संपूर्ण देशातच एकच परिवार आहे जे पटोला बनवण्याचे काम करतात.

Patola saree
Patola saree

९०० वर्ष जुना आहे पटोला साडीचा इतिहास
पटोला आर्ट ऐवढा अमूल्य आहे की, १९३४ मध्ये सुद्धा एका पटोला साडीची किंमत १०० रुपये होती. पाटन पटोला साडीचा इतिहास हा ९०० वर्ष जुना आहे. असे म्हटले जाते की, १२ व्या शतकात सोलंकी वंशाचा राजा कुमारपाल याने महाराष्ट्रातील जालनाच्या बाहेर वसलेल्या ७०० पटोला तयार करणाऱ्यांना पाटन येथे स्थायिक होण्यास बोलावले. अशा प्रकारे पटोलाची परंपरा सुरु झाली होती. राजा आपल्या खास कार्यक्रमांच्या वेळी पटोला सिल्कचा पट्टा घालायचा. पाटनमध्ये फक्त एकच परिवार आहे जे मूळ पाटन पटोला साडी तयार करतात आणि त्यांची परंपरा ही पुढे अजून ही सुरु आहे.

हे देखील वाचा- जापान मधील विचित्र दुकान! टी-शर्ट ते ज्वेलरीवर ‘पॉटी’ चे डिझाइन

पटोला साडीची खासियत
पटोला साडी (Patola saree) टाइंग, डाइंग आणि वीविंग तंत्रज्ञानाने तयार केली जाते. पटोला साडी सर्वाधिक खास आहे जी दोन्ही बाजूने नेसता येऊ शकते. या आर्टला ‘डबल इक्कत’ आर्ट असे म्हटले जाते. डबल इक्कतच्या धाग्याची लांबी आणि रुंदी एकमेकांना क्रॉसमध्ये घेऊन विणली जाते. डबल इक्कतला मदर ऑफ ऑल इक्कत असे ही म्हटले जाते.त्यामुळेच साडीची सरळ बाजू कोणती आणि उलटी बाजू कोणती हे ओळखणे मुश्किल होते. या गुंतागुंतीच्या विणकामामुळे हे आर्ट देश-विदेशात सुद्धा प्रसिद्ध आहे आणि महाग ही आहे. पटोला साडीची आणखी एक खासियत अशी की त्याचा रंग कधीच फिका पडत नाही आणि ती साडी १०० वर्ष टिकते.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.