भारतातील संस्कृती आणि आध्यात्माची चर्चा फक्त देशभरातच नव्हे तर विदेशात ही केली जाते. आपल्या देशात विविध ठिकाणी अनेक देवदेवतांची पुरातकालीन मंदिर आहेत. जेथे आवर्जुन भाविक भेट देतात. अशातच भारतातील असे एक मंदिर आहे ज्याची कथा अत्यंत ऐकण्यासारखी आहे. त्यापैकीच एक असणारे खाटू श्याम मंदिर. प्रसिद्ध खाटू श्याम मंदिराला श्री कृष्णाचे रुप मानले जाते. तर जाणून घेऊयात या मंदिराबद्दलच अधिक. (Khatu shyam temple)
खाटू श्याम मंदिर कुठे आहे आणि इतिहास
खाटू श्याम मंदिर हे राजस्थान मधील सीकर येथे स्थित आहे. हे सर्वाधिक प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. येथे हजारोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत राहतात. खासकरुन जन्माष्टमीच्या दिवशी या मंदिरात भाविकांची खुप गर्दी होते. कारण जसे आपण पाहिले की, या मंदिराला भगवान कृष्णाचे रुप मानले जाते.
मात्र त्याच्या इतिहासाबद्दल बोलायचे झाल्यास तो ऐकण्यासारखा आहे. असे सांगितले जाते की, या मंदिराचा इतिहास हजारो वर्ष जुना आहे. या मंदिरासंदर्भात अशी मान्यता आहे की, खाटू श्याम यांना वर्तमानकाळात देवता मानले जाते.(Khatu shyam temple)
खाटू श्याम मंदिराची पौराणिक कथा
खाटू श्याम मंदिराचा संदर्भ हा महाभारताच्या काळासोबत जोडला जातो. अशी मान्यता आहे की, भीम आणि हिडिम्बा यांचा पुत्र घटोत्कचचा एक पुत्र होता. त्याचे नाव बर्बरीक होते. असे मानले जाते की, बर्बरीक याला भगवती जगदंबामे अजेय होण्याचे वरदान दिले होते. जेव्हा महाभारत सुरु होणार होते तेव्हा बर्बरीक याने कुरुक्षेत्राच्या दिशेने प्रस्थान केले. याच दरम्यान तो श्री कृष्णाला भेटला.
तेव्हा कृष्णाने बर्बरीक याला तु कोणाच्या बाजूने आहेत असे विचारले असता त्याने जो पक्ष हरेल त्याच्या बाजूने लढणार असे सांगितले. तेव्हा श्री कृष्णाने त्याला थांबवण्यासाठी दानच्या रुपात शीश मागितले. परंतु बर्बरीक याने आधीच आपली इच्छा सांगितली होती की, शीश युद्धाच्या ठिकाणी ठेवावे. जेणेकरुन युद्ध पहायला मिळेल. या बलिदानामुळे श्री कृष्ण अत्यंत खुश झाले आणि त्यांनी वरदान दिले की, भविष्यात तुला श्यामच्या नावाने पुजले जाईल.
हे देखील वाचा- जगातलं सर्वात मोठं विष्णू मंदिर भारतात नाही, तर आहे ‘या’ देशामध्ये…
खाटू श्याम मंदिरात कसे पोहचाल?
खाटू श्याम मंदिरात अत्यंत सहज पोहचता येते. हे मंदिर जयपूर पासून जवळजवळ ८० किमी दूर आहे. येथे जवळच रींगस रेल्वे स्थानक आहे. येथून तुम्ही टॅक्सीच्या माध्यमातून मंदिरापर्यंत पोहचू शकता. तर जयपूर विमानतळापासून खाटू श्याम मंदिर हे ९५ किमी दूर आहे.