पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ ऑक्टोंबरला दिल्लीत ५जी सुविधेचा शुभारंभ केला. त्याचसोबत देशातील ८ शहरांमध्ये ५जी सुविधा सुरु करण्याबद्दल ही घोषणा केली. यामुळे एका बाजूला देशाच्या अर्थव्यवस्थेला फायदा होणार आहेच. पण दुसऱ्या बाजूला त्याच्या बद्दल नकारात्मक चर्चा सुद्धा सुरु झाली आहे. जरी ५जी सुविधेमुळे डिजिटल युगात बदल जरी होणार असले तरीही सजीव वस्तूंवर त्यांचा काय परिणाम होईल याबद्दल ही आता बोलले जात आहे. अशातच लोकांच्या मनात विविध प्रश्न या सुविधेबद्दल उपस्थितीत राहत आहेत. याच प्रश्नांची उत्तरे आपण आज जाणून घेणार आहोत. (5G Service Updates)
प्रथम जाणून घेऊयात ५जी सेवेचे फायदे
भारतात ५जी सर्विस लॉन्च केल्यानंतर नागरिकांना सर्वात प्रथम इंटरनेटच्या स्पीडमध्ये अधिक वाढ झाल्याचे दिसून येणार आहे. त्याचसोबत वर्च्युअल रिअॅलिटीसह उत्तम ३डी अनुभव आणि मेटावर्सचा सुद्धा लाभ घेता येणार आहे. या व्यतिरिक्त या सर्विसचा सर्वाधिक मोठा फायदा शिक्षण, तंत्रज्ञानासह वैद्यकिय क्षेत्र आणि एविएशन क्षेत्राला होणार आहे.
५जी सर्विसबद्दल लोकांच्या मनातील प्रश्न
-५जी सुविधेमुळे कॅन्सर होतो?
आतापर्यंत झालेल्या रिसर्चनुसार ५जी मुळे कॅन्सर होण्याचा धोका कमी आहे. मात्र याबद्दल अधिक अभ्यास करण्यात आलेला नाही. तसेच याला पूर्णपणे आपण नाकारु सुद्धा शकत नाही. तर डब्लूएचओ कडून आरोग्यासंबंधित धोक्यांचे आकलन केले जात आहे. याचा रिपोर्ट वर्षभराच्या अखेर पर्यंत येऊ शकतो. डब्लूएचओच्या नुसार आतापर्यंत मोबाईल टेक्नॉलॉजीचा व्यक्तीच्या आरोग्यावर परिणाम झाल्याचे अद्याप काही समोर आलेले नाही.
तर अमेरिकेतील फेडरल कम्युनिकेशन कमीशन म्हणजेच FCC च्या सध्याच्या गाइडलाइन्सनुसार, लोकांना ३०० किलोहर्ट्ज ते १०० गीगीहर्ट्ज पर्यंच्या रेडीएशन पासून धोका नसतो. जगातील बहुतांश देशांमध्ये ५जी फ्रिक्वेंसीची रेंज २५-४० गीगाहर्ट्जच्या आसपास आणि १०० गीगाहर्ट्जपेक्षा कमी असते. भारतात ५जीसाठी ६०० मेगाहर्ट्ज ते २४-४७ गीगाहर्ट्जच्या फ्रिक्वेंन्सीचा वापर केला जाणार आहे.
-५जी सुविधा विमानांसाठी धोकादायक?
याचा थोडाफार परिणाम होतो. पण त्या संदर्भातील स्थिती पूर्णपणे स्पष्ट नाही. तर नुकत्याच अमेरिकेतील फेडरल एविएशन अॅडमिनिस्ट्रेशनने इशारा दिला आहे की, ५जी सुविधा ही काही विमानांच्या उंचीवरील रिडिंग करण्याची क्षमता प्रभावित करु शकते. ५जी मुळे विमानाचे अल्टीमीटर्स सुद्धा प्रभावित होऊ शकतात.
२०२० मध्ये नॉनप्रॉफिट रेडियो टेक्निकल कमिशन फॉर एअरोनॉटिक्सने याबद्दल सविस्तरपणे एक रिसर्च पब्लिश केला होता की, कशा प्रकारे ५जी विमानांवर प्रभाव टाकू शकते. दरम्यान, साउथ कोरियात एप्रिल २०१९ पासूनच ५जी सुविधेचा वापर केला जात आहे. मात्र तेथे ५जी च्या कारणास्तव विमान सेवेच्या रेडिओ सिग्नलमध्ये कोणत्याही प्रकारची समस्या आलेली नाही. (5G Service Updates)
-५जी टेस्टिंगमुळे पक्ष्यांचा होतो मृत्यू?
२२ एप्रिल २०२० ला एका पोस्टमध्ये दावा केला आहे की, नेदरलँन्डच्या हेगमध्ये ५जी नेटवर्कच्या टेस्टिंगमुळे शेकडो पक्ष्यांचा मृत्यू झाला. मात्र हे खरं नव्हते. हेगमध्ये ८ ऑक्टोंबर २०१८ ते ३ नोव्हेंबर २०१८ मध्ये शेकडो पक्ष्यांचा मृत्यू झाला पण त्याचे कारण ५जी सर्विस नव्हते. त्यावेळी तेथे ५जी ची कोणतीही टेस्टिंग ही झाली नव्हती.
मात्र हेल्थ काउंसिल ऑफ द नेदरलँन्ड्सचे मेंबर आणि ICNIRP चे प्रेसिडेंट डॉक्टर एरिक वान रोंगन असे म्हणतात की, पक्ष्यांचा मृत्यू ५जी टेक्नॉलॉजीमुळे अशा वेळी होऊ शकते जेव्हा त्यामधून निघाणारे रेडिएशन हे खुप शक्तिशाली असतील आणि त्यामधून नुकसान पोहचवणारी गरमी निर्माण होणार असेल तर असे होऊ शकते.
तर मोबाईल टेलिकॉमचा एंटिना खुप शक्तिशाली नसतो. संपूर्ण जगात असे लाखो एंटीना आहेत, मात्र अशी प्रकरणे समोर आलेली नाहीत. ५जी च्या रेडिएशनाचा प्रभाव पडणे ऐवढे शक्य नाही जेणेकरुन पक्ष्यांचा मृत्यू होईल.
हे देखील वाचा- पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून 5G नेटवर्क लॉन्च, जाणून घ्या खासियत
दरम्यान, भारतात १० कोटींहून अधिक युजर्सला ५जी-केटी स्मार्टफोनसह २०२३ मध्ये ५जी चे सब्सक्रिप्शन अपग्रेड करायचे आहे. मात्र त्यापैकी अर्ध्या लोकांना अधिक उच्च डेटा टियर प्लॅनमध्ये अपग्रेड करायचे आहे. शहरातील केंद्रांमध्ये भारतीय स्मार्टफोन युजर्सला ५जी मुळे होणाऱ्या अपग्रेडमुळे अधिक उत्सुकता लागली आहे.