Home » लग्न करून मुलगी जाणार सासरी? तर आईने मुलीला शिकवाव्या ‘या’ गोष्टी

लग्न करून मुलगी जाणार सासरी? तर आईने मुलीला शिकवाव्या ‘या’ गोष्टी

by Team Gajawaja
0 comment
Lifestyle Married Mother Daughter लाईफस्टाईल
Share

आई आणि मुलीचे नाते काळाबरोबर मैत्रिणीसारखे बनत जाते. बहुतेक मुली आपल्या मनातील सर्व गोष्टी आईसोबत शेअर करतात, तर आईसुद्धा मुलगी मोठी झाल्यावर तिला संसाराच्या गोष्टी शिकवते. जरी प्रत्येक आई आपल्या मुलीला जवळजवळ प्रत्येक लहान गोष्टी शिकवते आणि समजावून सांगते, परंतु मुलगी जेव्हा लग्नाच्या वयात येते तेव्हा तिची शिकण्याची जबाबदारी अधिक महत्त्वाची बनते.

जी मुलगी नवीन नात्यात अडकणार आहे आणि आपल्या आई-वडिलांचे कुटुंब सोडून आपल्या पतीच्या कुटुंबासोबत राहणार आहे. तिला या नवीन आयुष्याशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी माहित असणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत जर मुलीचे लग्न ठरलेले असेल आणि तिची सासरी जाण्याची वेळ जवळ येत असेल, तर प्रत्येक आईने लग्नापूर्वी आपल्या मुलीला काही चांगले धडे दिले पाहिजेत. जेणेकरून तिचा सासरच्यांशी सहज समेट होईल. मुलीने माहेर सोडण्यापूर्वी, आईने तिला काय शिकवले पाहिजे ते जाणून घेऊया.

लग्नापूर्वी आईने मुलीला शिकवण्याच्या गोष्टी

आदर करणे

प्रत्येक पालक आपल्या मुलांमध्ये चांगले संस्कार रुजवण्याचा प्रयत्न करत असतातच. तरी आपल्या मुलीला लग्नाबाबत सांगणे खूप गरजेचे आहे की, तिचे सासर हे दुसरे कुटुंब आहे, जिथे तिने सर्वांचा आदर केला पाहिजे. आई-वडिलांसारखाच आदर सासू-सासऱ्यांनाही द्यावी. त्याचबरोबर सासरच्या इतर लोकांनाही आदर द्यावा, जसे की दीर, नणंद इत्यादी. जेणेकरून सासरचे लोक तिला मोकळ्या मनाने स्वीकारू शकतील.

घरातील कामात मदत करणे 

आईने आपल्या मुलीला हे शिकवायला हवे की, लग्नाआधी मुली ज्याप्रमाणे घरातील कामात आईला मदत करतात, त्याचप्रमाणे सासरी देखील सासूला मदत करावी. कदाचित तिला तिच्या माहेरच्या घरात जेवढे काम करावे लागते, त्यापेक्षा जास्त काम तिच्या सासरमध्ये करावे लागेल. अशा स्थितीत मुलीच्या मनात ही गोष्ट ठेवा की, तिचे सासरचे घर हे तिचे स्वतःचे घर आहे, जिथे तिला काम करताना कोणतीही अडचण नाही यायला पाहिजे.

सासरच्या पद्धतींचा स्वीकारणे

आईने आपल्या मुलीला हे शिकवले पाहिजे की, तिला तिच्या सासरच्या राहण्याच्या पद्धती चांगल्या प्रकारे समजल्या पाहिजेत. तिला माहेरच्या आणि सासरच्या राहणीमानातला फरक सांगा. सासरच्या घरी जर लोकं लवकर उठत असतील, तर तिलाही लवकर उठण्याची सवय लावा. जेणेकरून ती संपूर्ण कुटुंबासोबत लवकर मिसळेल.

=========

हे देखील वाचा – उन्हाळ्यात लडाखला भेट देण्याचा प्लॅन करताय? मग चुकवू नका ‘ही’ ५ ठिकाणं 

=========

लवकर कोणाबद्दल मत बनवू नका

अनेकदा मुली लग्नानंतर सासरच्या घरी जातात, तेव्हा त्यांना सासरच्या लोकांची फारशी माहिती नसते. एखाद्या नातेवाईकाची सुरुवातीची छाप चांगली नसेल. अशा परिस्थितीत घाईघाईने त्याच्याबद्दल आपले मत बनवू नका. मुलीला सासरच्यांना समजून घेण्यासाठी वेळ द्यायला शिकवा.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.