Home » ब्रिटेनमध्ये कर्मचाऱ्यांना 4 Day Working Week ची मिळणार सुविधा

ब्रिटेनमध्ये कर्मचाऱ्यांना 4 Day Working Week ची मिळणार सुविधा

by Team Gajawaja
0 comment
IT Employees
Share

जगात मंदीची शंका व्यक्त केली जात असली तरीही काही मल्टिनॅशनल कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्यास सुरुवात केली आहे. तर ब्रिटेनमध्ये मात्र १०० कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. वाढती महागाई आमि मंदीच्या खाईत लोटली जाणारी ब्रिटेनची अर्थव्यवस्था पुर्ववत व्हावी यासाठी युनाइडेट किंगडम मधील १०० कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना ४ डे वर्किंग म्हणजेच आठवड्यातील फक्त ४ दिवस काम करण्याची घोषणा केली आहे. (4 day work week)

या मोठ्या घोषणेसंदर्भात या कंपन्यांचे असे मानणे आहे की, आठवड्यातील ४ दिवस काम केल्याने देशात बदल घडवून आणण्यास यश मिळेल. या १०० कंपन्यांमध्ये जवळजवळ २६०० कर्मचारी काम करतात.

4 day work week
4 day work week

४ डे वर्किंगमुळे कंपन्यांचे प्रोडक्शन वाढेल
ब्रिटेन मधील कंपन्यांनी असा तर्क लावला आहे की, ५ दिवस काम करण्याऐवजी ४ डे वर्किंग मुळे कंपन्या आपल्या प्रोडक्शनमध्ये सुधारणा करण्यासाठी प्रेरित करेल. म्हणजेच ते कमी तासांचा उपयोग करुन समान आउटपुट देऊ शकतात. ४ डे वर्किंग कल्चरला मान्यता देणाऱ्या या १०० कंपन्यांनमध्ये ब्रिटेनमधील सर्वाधिक दोन मोठ्या कंपन्या एटम बँक आणि ग्लोबल मार्केटिंग फर्म एविशनचा समावेश आहे. या दोन्ही कंपन्यांचे युकेत जवळजवळ ४५० कर्मचारी आहेत.

द गार्जियन येथून एविनचे मुख्य कार्यकारी अॅडम रॉस यांनी असे म्हटले की, नव्या वर्किंग पॅटर्नमुळे आम्ही सर्वाधिक ऐतिहासिक पावलाकडे वळण्याची ही वेळ आहे. यामुळे ग्राहकांना उत्तम सेवा मिळतीलच पण कर्मचाऱ्यांना सु्द्धा कामाचा भार अधिक येणार नाही.

हे देखील वाचा- ‘झीरो कोविड पॉलिसी’मुळे चीनमध्ये वादळ…

जगातील अन्य ७० कंपन्यासुद्धा करतायत ट्रायल
ब्रिटेनच्या या १०० कंपन्यांव्यतिरिक्त जगातील ७० कंपन्या सुद्धा ४ डे वर्किंगच्या पायलट प्रोजेक्टवर काम करत आहेत. सध्या ते ट्रायल फेजमध्ये आहे. या कंपन्यांमध्ये जवळजवळ ३३०० लोक काम करतात. तर कॅब्रिज आणि ऑक्सफोर्डसह बोस्टन युनिव्हर्सिटीचे संशोधक सुद्धा या विषयावर एक रिसर्च करत आहेत.(4 day work week)

तर सप्टेंबरमध्ये परिक्षणादरम्यान जेव्हा कंपन्यांना असे विचारण्यात आले की, त्यांचे ट्रायल कसे सुरु आहे. तेव्हा ८० हून अधिक कंपन्यांनी असे म्हटले की, ४ डे वर्किंग त्यांच्या व्यवसायासाठी उत्तम काम करत आहे. युके अभियानचे जे निर्देशक आहेत जो राइल यांनी असे म्हटले की, चार दिवसांचा आठवडा लागू करण्याचा विचार करत आहेत. भले कंपन्या मोठ्या मंदीसाठी तयार असल्या तरीही.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.