२४ जानेवारी, २०२२ अशी ही तारीख जेव्हा रशियाने युक्रेनवर हल्ला केला. पाहता पाहता एक सुंदर देश असलेल्या युक्रेनचे खडकात रुपांतर झाले. युद्ध असाच विनाश करतात. सर्वकाही उध्वस्त होते. शिल्लक राहतात ते केवळ पडझड झालेल्या इमारती, जखमी लोक आणि लोकांच्या डोळ्यांतील अश्रू. रशिया-युक्रेनच्या युद्धाला एक वर्ष पूर्ण होणार आहे. आजचा ३६१ वा दिवस आहे. दोन्ही बाजूचे हजारोंच्या संख्येने सैनिक यामध्ये मारले गेले. अरबो डॉलर्स खर्च झाले. शहराने आपली ओळख गमावली आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का, असे एक युद्ध होते जे इतिहासाच्या पानांवर लिहिले गेलेच. पण ते युद्ध ३६५ दिवस नव्हे तर ३३५ वर्ष लढले गेले. (365 year war)
३३५ वर्ष लढले गेलेले युद्ध
खरंतर हे युद्ध नेदरलँन्ड आणि सिसिली बेटांच्या समूहादरम्यान १६५१ ते १९८६ पर्यंत लढले गेले. १७ एप्रिल मध्ये शांती करारावर हस्ताक्षर करण्यात आले. कॉर्नवॉलच्या पश्चिम तटावर असलेले सिसिली आणि नेदलँन्ड दरम्यान झालेल्या युद्धाबद्दल ऐकतात तेव्हा ते आश्चर्यचकित होतात की, ऐवढी वर्ष युद्ध लढले गेले खरं पण एक ही गोळीबार झाला नाही. ना कोणाचा मृत्यू झाला, ना कोणाचे रक्त सांडले गेले. युद्धाची सुरुवात ३० मार्च १६५१ रोजी झाली होती. याची सुरुवातीचे अप्रत्यक्ष कारण असे की, इंग्लिंश सिविल वॉर.
युद्धाचे खरं कारण
इंग्लिश सिविल वॉरची सुरुवात झाल्यानंतर डच लोकांनी ब्रिटेनच्या संसद सदस्यांची बाजू घेतली. ते राजेशाही समर्थक मानले जात होते. डच हे राजेशाही लोकांना ऐतिहासिक मित्र असल्याने हे घडले. जेव्हा डच लोकांनी फसवले तेव्हा ही गोष्ट बिघडली. शाही लोकांनी विचार केला की, कसे ही करुन डच लोकांना धडा शिकवायचाच. त्यानंतर शाही लोकांनी रागात इंग्रजी चॅनलवर समुद्री मार्गांनी छापेमारी करण्यास सुरुवात केली. शाही लोकांसोबत गोष्ट सुरळीत सुरु नव्हत्या, कारण त्यांचा लष्कराने पाठलाग केला होता.(365 year war)
शाही लोकांनी डच लोकांना धडा शिकवण्याचे ठरवले
दुसऱ्या बाजूला डच लोकांनी संसदेच्या संदस्यांचे समर्थन होते. सदस्यांच्या नियंत्रणाखालील लष्कराने शाही लोकांचा पाठलाग करत लोकांकवर छापेमारी करत त्यांच्याकडून पैसे वसूल करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी १२ युद्ध जहाज हे सिसिली बेटावर पाठवले गेले. येथे कोणताच तोडगा निघाला नाही. केवळ काही सैनिकांना सोपवण्यात आले. हे पाहून डच एडमिरल मॅर्नटन ट्रॉमप यांनी ३० मार्च १६५१ रोजी सिसिली बेट समूहाच्या विरोधात युद्धाची घोषणा केली. मात्र आतापर्यंत एक ही गोळी चालवली जातेय इतक्यात सदस्यांनी येऊन हे प्रकरण शांत केले.
लष्कराने शाही लोकांना सरेंडर करण्यास केले मजबूर
३ महिन्यानंतर संसदेच्या लष्कराचे कमांडर ओलिवर कोर्मवैलच्या जवानांना शाही लोकांना आत्मसमर्पण करण्यास मजबूर केले. अशा प्रकारे सिसिली बेट हे पुन्हा एकदा ब्रिटिश सदस्यांच्या ताब्यात आले. अशा प्रकारे युद्ध शांत झाले. मात्र हे केवळ तीन महिने चालले आणि ३०० वर्षापेक्षा अधिक काळ त्याबद्दल चर्चा होत राहिली. खरंतर येथे एक चूक अशी झाली की, युद्धाची घोषणा झाली खरी पण निर्णय झालाच नाही.
हे देखील वाचा- कोहिनूर हिरा खरंच शापित आहे का? असा आहे इतिहास
शांति करारावर स्वाक्षरी झालीच नाही
अशा प्रकारे स्थिती शांत झाल्यानंतर डच सैन्य आपल्या देशात परतले. पण येथे मोठी चुक झाली. खरंतर युद्धाची घोषणा झाली पण ते संपवण्यासाठी शांती करार झालाच नाही. हे विसरले गेले की, वाद एप्रिल १९८६ पर्यंत सुरु राहिला. नंतर नेदरलँन्डचे राजदूत १७ एप्रिल १९८६ रोजी सिसिली बेटावर पोहचले आणि त्यांनी अधिकृतरित्या ३३५ वर्षांपर्यंत चाललेल्या या युद्धाला शांती कराराच्या माध्यमातून संपवले.