असं म्हणतात पुस्तके वाचली की माणसाच्या ज्ञानात भर पडत असते. ऐतिहासिक, धार्मिक, प्रेरणादायी असे अनेक पुस्तकांचे प्रकार आपल्याला सांगता येतील. जगात अशी अनेक पुस्तके आहेत जी माणसाला आयुष्याचे तत्वज्ञान सांभाळून सांगतात. पण जगाच्या पाठीवर अशी काही रहस्यमय पुस्तके (Mysterious books) आहेत ज्यांचं रहस्य आजवर कोणालाही शोधून काढता आलं नाही.
या पुस्तकांमध्ये देण्यात आलेली माहिती वाचली, तर अंगावर काटाच उभा राहील. कारण त्यामध्ये भूत, प्रेत आणि काळ्या जादूबद्दल सांगितलेले आहे. ती पुस्तके वाचून सैतानी शक्तीला आमंत्रण दिले जाऊ शकते. ही पुस्तके कोणती आहेत? चला याबद्दल माहिती घेऊया
बुक ऑफ सोयगा
‘बुक ऑफ सोयगा’ या पुस्तकाबद्दलचा इतिहास कोणालाही माहित नसून अनेक जादुई क्रियांची माहिती यामध्ये देण्यात आली आहे. यामधील भाषा रहस्यमयी असून ती अजून कोणालाही वाचता आलेली नाही. परंतु, स्थानिक लोकांच्या मते त्यामध्ये जादुई क्रिया आणि आत्म्याच्या गोष्टी लिहिण्यात आल्या आहेत.
असं सांगितले जाते की १९५२ मध्ये जॉन डी या व्यक्तीने हे पुस्तक डिकोड करण्याचा प्रयत्न केला होता पण त्याचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला होता. जॉनच्या मृत्यूनंतर हे पुस्तक ब्रिटिश ग्रंथालयाच्या एका कोपऱ्यात ठेवण्यात आले होते. सध्या ते पुस्तक याच ठिकाणी असून त्यातील शब्दांचा अर्थ आजवर कोणालाही लावता आलेला नाही.
‘कोडेक्स गिगास’
हे पुस्तक १३ व्या शतकात एका साधूने लिहिल्याचे दाखले इतिहासामधून मिळाले आहेत. या साधूने काही नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ‘झेक रिपब्लिक’ या देशाच्या राजाने त्याला शिक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्याला शिक्षा म्हणून भिंतींमध्ये गाडून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. पण जेव्हा त्याला गाडण्यात येत होते तेव्हा त्याने राजाकडे स्वतःच्या प्राणाची भीक मागितली.
राजाने त्याला विचारले की, मी तुझी शिक्षा रद्द केली, तर तू मला काय देशील? त्यावर बोलताना त्याने सांगितले की, मी तुम्हाला एका रात्रीत असं पुस्तक लिहून देईन की ज्यामध्ये संपूर्ण जगाचे ज्ञान असेल.
यानंतर साधूने खरोखरच एका रात्रीत पुस्तक लिहिले. याबद्दल अशी आख्यायिका सांगितली जाते की, साधुला जगाचे ज्ञान लिहिण्यासाठी सैतान (लुसीफर) स्वतः धावून आला. पण यासाठी साधूला त्याचा आत्मा आधी लुसीफरच्या स्वाधीन करावा लागला.
====
हे देखील वाचा: ‘कदंब’ या पुस्तकाला दुर्गाबाई भागवत यांनी अर्पणपत्रिका का लिहिली?
====
कोडेक्स गिगास या पुस्तकाची लांबी ३६ इंच, रुंदी २० इंच आणि जाडी ६.५ होती. त्याचे वजन जवळपास ३५ किलो होते. गाढवे आणि घोड्याच्या कातड्यांपासून त्याची बांधणी करण्यात आली होती आणि त्याला तब्ब्ल ३२० पाने होती.
मध्यकालीन युगातील हाताने लिहिलेले हे सर्वात मोठे पुस्तक होते. यामध्ये अशा काही क्रियांचा संदर्भ देण्यात आला आहे ज्याचा संबंध सैतानाशी येतो. हे पुस्तक डार्क वेब वर मोठ्या किमतीत उपलब्ध असल्याचे सांगण्यात येते.
द ग्रँड ग्रिमोर
द ग्रँड ग्रिमोर हे या यादीतील तिसरे पुस्तक असून या पुस्तकाबद्दल असे सांगितले जाते की, या पुस्तकाचा लेखक आत्म्याच्या ताब्यात होता. द ग्रँड ग्रिमोर पुस्तकात काळी जादू आणि आत्म्यांना बोलवण्याची अद्भुत शक्तीबद्दल माहिती देण्यात आली आहे. यामध्ये तांत्रिक क्रिया, नरबळी कसा द्यायचा याबद्दल विस्तृत माहिती देण्यात आलेली आहे.
====
हे देखील वाचा: भारतामधील खरे हिरो ज्यांच्यावर चित्रपट बनायलाच हवेत; जाणून घेऊया त्यांच्या कार्याबद्दल
====
अशी आख्यायिका आहे की, द ग्रँड ग्रिमोर हे पुस्तक वाचणाऱ्या व्यक्तीवर काळ्या जादूचा प्रभाव पडतो आणि ती व्यक्ती स्वतःहून आत्म्याच्या स्वाधीन होते. त्यामुळे या पुस्तकावर धार्मिक विधींची प्रक्रिया करून व्हॅटिकन सिटीमध्ये गोपनीय जागेवर ठेवण्यात आले आहे. (Mysterious books)
पुस्तके माणसाच्या मानसिक विकासासाठी चांगली असतात पण अशी काही पुस्तके आहेत जी वाचली की माणूस वेगळ्याच विश्वात प्रवेश करतो (Mysterious books) आणि त्याप्रमाणे वागायला लागतो. तुम्हाला समजा यापैकी एखादे पुस्तक वाचण्याची संधी मिळाली, तर तुम्ही काय कराल?
– विवेक पानमंद