Home » Horoscope : शनिवारचा दिवस कसा असेल? जाणून घ्या आजचे राशिभविष्य

Horoscope : शनिवारचा दिवस कसा असेल? जाणून घ्या आजचे राशिभविष्य

by Jyotsna Kulkarni
0 comment
Horoscope
Share

आज शनिवार १७ जानेवारी. शनिवारचा दिवस हा शनिदेव आणि हनुमान यांना समर्पित आहे. शिवाय आज मध्यरात्रीनंतर मौनी अमावस्येला देखील सुरुवात होत आहे. त्यामुळे आजचा दिवस हा अनेक अर्थाने खास असणार आहे. आज सूर्य मकर राशीत असेल तर चंद्र धनु राशीत भ्रमण करेल. आज शनी आणि हनुमान यांच्या मंदिरात जाऊन त्यांचे दर्शन घेणे लाभदायक ठरणार आहे. आजची तिथी कृष्ण चतुर्दशी असून, आजचे नक्षत्र हे मूळ आहे. आजच्या दिवसातील अमृतकाळ हा सकाळी ०७:१२ ते ०८:३६ इतका असणार आहे. तर राहूकाळ हा ०९:५९ ते ११:२२ पर्यंत असेल. आज सकाळी सुर्योदय हा सकाळी ०७:१२ वाजता झाला असून, सुर्यास्त संध्याकाळी ०६:१९ मिनिटांनी होणार आहे. जाणून घेऊया बारा राशींसाठी आजचा दिवस कसा असणार आहे.

मेष
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. जर कोणी आज तुमच्याकडे पैसे उधार मागितले तर देऊ नका कारण ते परत मिळण्याची शक्यता कमी आहे. शिवाय आज करिअरमध्ये प्रगतीचे योग आहेत. नोकरीत पदोन्नती किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.

वृषभ
जर तुमची एखादी आवडती वस्तू हरवली असेल, तर ती तुम्हाला सापडण्याची चांगली शक्यता आहे. स्पर्धेत मुलांना यश मिळाल्यामुळे घरातही आनंदाचे वातावरण असेल. आज काही पैसे दानधर्मावरही खर्च होऊ शकतात.

मिथुन
आज नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या जीवनसाथीचा पूर्ण पाठिंबा मिळेल. एखादे काम पूर्ण करताना तुम्हाला येणाऱ्या कोणत्याही समस्या दूर होतील. आज तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल.

कर्क
आजचा दिवस या राशीच्या लोकांना थोडा दगदगीचा ठरू शकतो. कर्जमुक्तीचे योग दिसत आहेत. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी चांगला काळ आहे. तुमचे अडकलेले पैसेही कुठूनतरी परत मिळण्याची शक्यता आहे.

Horoscope

सिंह
आजच दिवस तुम्ही प्रगतीच्या मार्गावर पुढे जाण्यासाठी उत्तम ठरणार आहे. तुम्ही भूतकाळातील चुकीतून शिकाल. आज तुमच्या मनातील सकारात्मक विचारांमुळे तुम्हाला नवी उमेद नवा आत्मविश्वास मिळेल. नवीन काम, जबाबदारी अंगावर घेण्याची उत्सुकता असेल.

कन्या
कामाच्या ठिकाणी तुम्हाला काही नवीन लोक भेटू शकतात. कोणत्याही गोष्टीवर अनावश्यक राग टाळा.तुम्हाला व्यवसायात काही जोखीम घ्यावी लागेल ज्याचा तुम्हाला भविष्यात मोठा फायदा होईल.

तूळ
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. नातेवाईकांसोबतचे मतभेद आज संपतील. व्यवसायात टीमवर्कने काम केल्यास तुमच्या समस्या लवकर सुटतील. नोकरी शोधणाऱ्या तरुणांना अजून थोडा वेळ थांबावे लागेल मात्र तुमचा आत्मविश्वास मजबूत ठेवा.

वृश्चिक
आजचा दिवस तुमच्यासाठी खर्चाने भरलेला असेल. आज तुम्हाला कामावर नवीन समस्या येऊ शकतात. मीडिया, मार्केटिंग आणि सेल्स क्षेत्रातील लोकांसाठी हा काळ फायदेशीर ठरेल.

धनु
तुमच्या सभोवतालचे वातावरण आनंददायी असेल. कुटुंबात जर कोणाशी मतभेद असतील तर ते आज बोलून मिटतील. कामाच्या किंवा कुटुंबाच्या बाबतीत तुम्ही तुमची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडाल.

मकर
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस नोकरीमध्ये चांगला राहील. तुमची निर्णय घेण्याची क्षमता भक्कम होईल. करिअर आणि आर्थिक बाबतीत मोठी झेप घेण्याची ही संधी आहे. तुम्हाला गमावलेले पैसे परत मिळू शकतात.

कुंभ
आज वैवाहिक कलह संपेल. वडीलधाऱ्यांचे लक्षपूर्वक ऐका आणि व्यत्यय आणू नका. घरात लागणाऱ्या गरजेच्या वस्तू खरेदी कराल. व्यवसायात तुम्हाला काही अडचणी येऊ शकतात, परंतु तुमचे काम सुरळीतपणे पूर्ण होईल.

मीन
सरकारी कामातून धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन मार्ग उघडतील. विद्यार्थ्यांना आज लेखनात रस वाढलेला दिसेल. तुम्हाला काही चांगल्या कामासाठी प्रोत्साहन देखील मिळू शकते.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.