Home » “Zom-com” film Zombivli -निघाली झोंबिवली एक्सप्रेस….

“Zom-com” film Zombivli -निघाली झोंबिवली एक्सप्रेस….

by Team Gajawaja
0 comment
Share

मराठीतला पहिला वहिल्या झोंबीपटाची प्रतीक्षा आता संपली असून, हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  आदित्य सरपोतदार दिग्दर्शित ‘झोंबिवली (Zombivli)’ हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा पहिला टिझर दोन वर्षांपूर्वी म्हणजेच फेब्रुवारी २०२० ला प्रदर्शित झाला होता. काहीशा हटके असणाऱ्या या टिझरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली होती. 

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये गेल्या काही वर्षात एकापेक्षा एक सरस कथानक असणारे चित्रपट प्रदर्शित होत आहेत. त्यामुळे रसिक प्रेक्षकांचा मराठी चित्रपटांकडे असणारा ओढा वाढत चालला आहे. तसंच मराठी चित्रपटांमध्ये होणाऱ्या विविध प्रयोगांचेही रसिकांकडून स्वागत होत आहे. 

झोंबिवलीचा टिझर आणि त्यानंतर आलेल्या अंगात आलंया हे गाणं रिलीज झाल्यावरही मराठीत होत असलेल्या या वेगळ्या प्रयोगाला सिनेरसिकांना उत्तम दाद दिली. इतकंच नाही तर, प्रदर्शनच्या दिवशीच या गाण्याने लाखो हिट्स मिळवले आणि अनेकांना आपल्या तालावर नाचवलं. या गाण्याच्या प्रदर्शनांनंतर प्रेक्षकांच्या मनात या चित्रपटाविषयी, त्याच्या कथानकाविषयी कुतूहल निर्माण झालं आहे. हॉरर -विनोदी प्रकारात मोडणारं हे गाणं प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरलं आहे. 

या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून या चित्रपटाची भव्यता आणि झोंबीची पहिली झलक या ट्रेलर मधून दिसून येते. गेल्या दीड वर्षांपासून प्रेक्षक मराठीतला पहिला वहिला ‘झोंम कॉम’ असलेल्या ‘झोंबिवली (Zombivli)’ या चित्रपटाची वाट पाहत आहेत.  या चित्रपटाच्या निमित्ताने वैदेही, अमेय आणि ललित हे तीन कलाकार मोठ्या पडद्यावर प्रथमच एकत्रित काम करत आहेत. या तिघांची एकत्रित केमिस्ट्री मोठ्या पडद्यावर बघताना प्रेक्षकांना धमाल येणार आहे.  

या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अमेय, वैदेही आणि ललित यांच्या सोबत तृप्ती खामकर, जानकी पाठक, राजेंद्र सिरसटकर हे कलाकारही दिसत आहेत. चित्रपटाच्या टिझर आणि अंगात आलया या गाण्याप्रमाणेच ट्रेलरलाही प्रेक्षकांची पसंती मिळत आहे आणि त्याबद्दल सर्वत्र जोरदार चर्चाही सुरू झाली आहे. 

येत्या दोन्ही आठवड्यात चित्रपटगृहात कोणताच चित्रपट प्रदर्शित होत नाहीये. तसंच, “आता हा चित्रपट लवकर प्रदर्शित करा”, अशी प्रेक्षकांकडून जोरदार मागणी करण्यात आल्यामुळे या मागणीला अनुसरून निर्मिती संस्था आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमने हा चित्रपट ४ फेब्रुवारी ऐवजी २६ जानेवारीलाच प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. तेव्हा सतर्क रहा…आपल्या भेटीस झोंबी येत आहेत- आता ४ फेब्रुवारीला नाही, तर २६ जानेवारी रोजी, आपल्या जवळच्या चित्रपटगृहात!


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.