आपल्या सगळ्यांच्याच कमी जास्त प्रमाणात नशीब, दैव, लक आदी गोष्टींवर विश्वास असतो. काही लोकं तर रेग्युलर पेपरमध्ये किंवा इतर ठिकाणी येणारे भविष्य वाचतात. त्यांच्यासाठी शुभ असणाऱ्या रंगाचे कपडे घालतात. शुभ नंबर येईल असा फोन नंबर घेतात. काही लोकं या गोष्टी जरी रोज करत नसले तरी महत्वाच्या दिवशी मात्र फॉलो करताना दिसतात. त्यांच्यासाठी लकी असलेली गोष्ट महत्वाच्या दिवशी स्वतः जवळ बाळगतात. क्रिकेट मॅचेसच्या वेळेस तर आपल्याला अशा गोष्टी सर्रास पाहायला मिळतात. अनेकांना वाटत असेल अशा गोष्टी आपणच करतो किंवा असे करणारे आपणच आहोत मात्र असे अजिबातच नाहीये बर का…
लक किंवा नशिबावर विश्वास ठेवणारे लोकं आपल्याला सर्वात जास्त मनोरंजनविश्वात पाहायला मिळतील. या क्षेत्रात तर अनेकांनी आपल्या नावामध्ये देखील बदल केला आहे. काहींनी तर संपूर्ण नावाचं बदलवले तर काहींनी नावाच्या स्पेलिंगमध्ये बदल केला. काही जणं विशिष्ट प्रकारच्या वस्तू किंवा गोष्टी आपल्याजवळ सतत ठेवतात. याला कोणताही कलाकार अपवाद नाही. अगदी सुपरस्टार कलाकारांपासून ते नवीन कलाकारांपर्यंत सर्वच कलाकार या गोष्टी मानणारे आहेत. आज आपण या लेखातून कलाकार आणि त्यांचे लकीचार्म याबद्दल जाणून घेणार आहोत. (Bollywood)
सलमान खान
बॉलिवूडचा दबंग खान अर्थात सलमान खानच्या लकी चार्मची तर अनेकदा चर्चा होते. त्याच्या लकी चारंचे तर अनेक दिवाने देखील आहेत. सलमानचा लकी चार्म आहे, त्याच्या हातातील आकाशी खडा असलेले ब्रेसलेट. नीलमणी खड्याने जडवलेले सलमानचे हे ब्रेसलेट त्याच्यासाठी खूप लकी आहे. त्याच्या या ब्रेसलेटमुळेच तो वाईट नजरेपासून नेहमी वाचत असतो. याबद्दल खुद्द सलमाननेच सांगितले होते. याशिवाय सलमान साठी ईदचा दिवस देखील लकी आहे. तो दरवर्षी ईदला त्याचे चित्रपट प्रदर्शित करतो आणि काही १/२ अपवाद वगळता त्याचे ईदला प्रदर्शित झालेले चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले आहेत. (Marathi Top News)
कॅटरिना कैफ
बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफचा देखील काही गोष्टींवर विश्वास आहे. शिवाय ती नशिबाला देखील मानते. अभिनेत्री जेव्हा जेव्हा तिचा चित्रपट प्रदर्शित होणार असतो, त्याच्या आधी ती अजमेर शरीफला नक्कीच जाते आणि आशीर्वाद घेते.
विद्या बालन
विद्या बालन तिच्या मेकअपमध्ये कायम काजळ लावतोच. विद्याचा हाश्मी काजळावर खूप विश्वास आहे आणि ती हे काजळ केवळ तिच्या डोळ्यांचे सौंदर्य वाढवण्यासाठीच नाही, तर लकसाठी देखील लावते. याशिवाय विद्याला वेगवेगळ्या मण्यांचीही विशेष आवड आहे. या दोन गोष्टींमुळेच तिचे नशीब आणि जीवन बदलले असल्याचे ती सांगते. (Marathi Top News)
काजोल
काजोलचा तिच्या हिऱ्याने जडलेल्या ओम अंगठीवर खूप जास्त विश्वास आहे. माहितीनुसार, ही अंगठी तिला तिचा नवरा अभिनेता अजय देवगणने गिफ्ट केली आहे. काजोल याच अंगठीला तिचा लकी चार्म मानते. ती हि अंगठी तिच्या उजव्या हाताच्या बोटात घालते. तिला असे वाटते की, यामुळे तिला शांत राहण्यास मदत होते. (Marathi Trending News)
शिल्पा शेट्टी
शिल्पा शेट्टी चित्रपटांसोबतच तिच्या कमालीच्या फिटनेससाठी ओळखली जाते. शिवाय ती एक अध्यात्मिक व्यक्ती देखील आहे. शिल्पाने तिच्या उजव्या हाताच्या बोटात पन्ना रत्न असलेली अंगठी घातली आहे. ही अंगठी तिला तिच्या आईने भेट दिली होती. या अंगठीने तिच्या करिअरला वेगही मिळाला आणि ती यशस्वी देखील झाली. (Social News)
रणवीर सिंह
रणवीर सिंह हा कायम त्याच्या पायात कला डोरा बांधत असतो. हा काळा धागा रणवीरच्या आईने त्याच्या पायाला बांधला होता कारण तो सतत आजारी पडायचा. हा काळा धागा बांधल्यानंतर रणवीरची आजारांपासून सुटका झाली. शिवाय हा धागा त्याला वाईट नजरेपासून देखील वाचवतो. (Marathi Top News)
अमिताभ बच्चन
अमिताभ बच्चन हे बॉलिवूडचे शहेनशहा म्हणून ओळखले जातात. आजच्या कलाकारांसाठी बच्चन साहेब कायम एक आदर्श आहेत. पण या मेगास्टारच्या आयुष्यात एक वेळ अशी आली, जेव्हा त्यांचे दिवाळे निघाले होते. ते पूर्णपणे बॅककरप्ट झाले होते. तेव्हा त्यांच्या हातात कोणतेही चित्रपट नव्हते. अतिशय कठीण काळ त्यांनी पहिला मात्र तेव्हाच अमिताभ यांनी नीलम खडा जडवलेली अंगठी घातली, त्यानंतर त्यांच्याकडे कामे येण्यास सुरूवात झाली. ही लकी अंगठी आजही अमिताभ बच्चन परिधान करतात.
==========
हे देखील वाचा : Dadasaheb Phalke : भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक – दादासाहेब फाळके
==========
शाहरुख खान
शाहरुख खान साठी ५ हा आकडा खूपच लकी आहे. याच आकड्यामुळे त्याच्या आयुष्यामध्ये खूपच चांगले बदल झाले. म्हणूनच तो त्याच्या गाड्यांचे नंबर देखील ‘555’ या सिरीजमध्ये घेतो.