Home » Zepto History : ग्रोसरी डिलिव्हरी ॲपच्या क्षेत्राची गणित बदलून टाकली ती Zeptoनेच!

Zepto History : ग्रोसरी डिलिव्हरी ॲपच्या क्षेत्राची गणित बदलून टाकली ती Zeptoनेच!

by Team Gajawaja
0 comment
Zepto History
Share

२०२० असं म्हटलं तरी प्रत्येकाला ते वर्ष, त्या आठवणी नकोशा वाटतात. याच कारण म्हणजे कोरोना ! भारताप्रमाणेच संपूर्ण जगासाठी ते वर्ष भीतीदायकच गेलं. या कोरोना दरम्यान अनेकांनी आपल्या जवळची माणसं गमावली, आपले जॉब्स गमावले. पण त्याच १/२ वर्षात अनेकांनी आपलं ध्येय गाठण्यासाठी पहिलं पाऊल टाकलं. याच अनेकांमध्ये २ नाव आवर्जून घ्यावी लागतील ती म्हणजे कैवल्य वोहरा आणि आदित पलिचा. आपल्या सगळ्यांच्या परिचयाची आणि रोजच्या वापरातली ई- कॉम कंपनी zepto चे हे दोघ founder आहेत. भारतातील किराणा डिलिव्हरी स्पेसमध्ये Amazon, Flipkart, Swiggy Instamart, Blinkit आणि BigBasket असे मोठमोठे स्पर्धक असताना zepto ने स्वत:चं स्थान निर्माण केलंय. यासाठी zepto ने कशाप्रकारे मार्केटिंग strategy वापरलीये? आणि एकंदरीतच झेप्टोची स्टोरी काय आहे? जाणून घेऊ. (Zepto History)

तुम्हा सगळ्यांना D- mart कंपनी माहीतच असेल. काही महिन्यांपूर्वी याच D-mart कंपनीला आम्ही लवकरच मागे टाकू असं स्टेटमेंट zepto चे CEO असणाऱ्या आदित पलिचा यांनी केलं होतं. आणि त्यामुळे Zepto ची सगळीकडे चर्चा होऊ लागली. D-mart ला मागे टाकण्याचं धाडस करणाऱ्या या Zepto ची नेमकी सुरुवात कशी झाली हे आधी समजून घेऊ. तर आदित पलिचा आणि कैवल्य वोहरा Zepto चे founder आणि CEO ! दोघांचा जन्म मुंबईचा. दोघांचे वडील इंजिनिअर ! दोघांचं शिक्षण एकत्रच झालेलं. आणि दोघांना technology आणि business मध्ये इंटरेस्ट होता. म्हणून मग त्यातलं शिक्षण घेण्यासाठी दोघांनी अमेरिकेतल्या स्टॅनफोर्ड University मध्ये कंप्यूटर साइंस इंजीनियरिंग प्रोग्राम साठी ऍडमिशन घेतलं. पण मगाशी सांगितल्याप्रमाणे २०२० मध्ये कोरोनामुळे अनेकांच काम ठप्प पडलं होतं. असंच परदेशात शिकणाऱ्या मुलांना भारतात परत यावं लागलं होत. असंच आदित आणि कैवल्यलाही यावं लागलं. पण इथे आल्यानंतर त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे लॉकडाऊनच्या काळात लोकांना घरासाठी किराणा आणि अत्यावश्यक वस्तु घेण्यासाठी घराबाहेर पडणं शक्य नव्हतं. हेच लक्षात घेऊन या दोघांनी वयाच्या १९ व्या वर्षी सुरु केलं किराणाकार्ट ! हे basically लोकल दुकानांच्या माध्यमातून चालायचं. म्हणजे लोकल किराणा माल दुकानातून सामान घेऊन ते होम डिलिव्हर करायचे. लॉकडाऊनमध्ये जिथे किराणा सामान २/३ दिवसात डिलिव्हर व्हायचं तिथे ह्यांनी ते एका तासात डिलिव्हर करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या प्रयत्नाला यश आलं. या प्लॅटफॉर्मवर ग्राहक पुन्हा पुन्हा येऊ लागले. यानंतर त्या दोघांच्या मनात हा विचार आला की जर लोकांना हे आवडतंय तर आपण 10 मिनिटांत वस्तू का देऊ शकत नाही? (Zepto History)

यादरम्यान त्यांनी किराणाकार्टच Zepto केलं आणि किराणा मालाची १० मिनिटात डिलिव्हरी द्यायला सुरुवात केली. आधीच मार्केटमध्ये बिगबास्केट, डन्झो, स्विगी इन्स्टा मार्ट, अँमझोन सारख्या कंपन्या ठाण मांडून होत्या. पण त्या क्विक डिलिव्हरी देत नव्हत्या. आणि मग झेप्टोच्या १० मिनिटाच्या डिलिव्हरीमुळे मार्केटचा सगळा गेमच बदलला. आता प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे इतर मोठ्या कंपन्या डिलिव्हरी साठी एक ते तीन तास लावत असतात, पण तेच झेप्टोला १० मिनिटात कसं शक्य झालं? तर यासाठी झेप्टोची स्ट्रॅटेजी लक्षात घेणं महत्वाचं आहे… Zepto ने आलेल्या feedback नुसार हे ठरवलं की आता आपण डार्क स्टोअरच्या माध्यमातून डिलिव्हरी करायची. आता DARK STORE म्हणजे काय, तर मिनी वेअरहाऊस म्हणजेच गोडाऊन. या गोडाऊनमध्ये किराणा सामनासकट इतर जीवनावश्यक गोष्टी ठेवल्या जाऊ लागल्या. यामुळे ३ किलोमीटरच्या आसपास राहणाऱ्या ग्राहकांना सर्व्हिस वेळेत मिळू लागली. ज्या भागात स्विगी, इंस्टामार्ट, १५-२० मिनिटात डिलिव्हरी करतात त्याच भागात झेप्टो ६ ते १० मिनिटात डिलिव्हरी करू लागलं. इंटेररेस्टिंग म्हणजे तसं तर दोन्हीच्या डिलिव्हरी बॉयला डिलिव्हरी करण्यासाठी लागणारा वेळ आहे तो फक्त ६-७ मिनिटाचाच असतो तर मग फरक नेमका कुठे निर्माण होतो ? (Zepto History)

तर झेप्टोच्या सर्व स्टोरमथे picking खूप जास्त लवकर होत. झेप्टो स्टोरमधल्या सर्व employees ना टॅबलेट पुरवले जातात ज्यावर ग्राहकांनी केलेली ऑर्डर कळते. सोबतच त्यांना आलेली ऑर्डर कुठल्या स्टोरमध्ये लगेच available होईल हे सुद्धा यातून कळतं. त्यामुळे picking साठी लागणारा वेळ कमी होतो. Picking झाल्यावर लगेचच packing केले जाते आणि नंतर bagging केले जाते. ही सगळी प्रोसेस फक्त ६० सेकंदात पार पडते. आणि हाच संपूर्ण पॅटर्न झेप्टोच्या यशाचं गमक आहे. सध्या कंपनी दिल्ली, चेन्नई, गुडगाव, बेंगळुरु आणि मुंबई, पुणे याठिकाणी किराणा सामानाची घरपोच सेवा देत आहे. सध्या या कंपनीची वार्षिक उलाढाल ₹4,454 crore इतकी असून नुकतीच ती युनिकॉर्न कंपनी ठरली आहे. युनिकॉर्न म्हणजे 1 अब्ज डॉलरपेक्षा अधिक मार्केट value असलेल्या कंपनीला युनिकॉर्न अस म्हणतात. (Marathi News)

===============

हे देखील वाचा : Banarasi Saree ओरिजनल बनारसी साडी ओळखण्याच्या सोप्या ट्रिक्स

===============

दरम्यान सध्या कंपनीने झेप्टो कॅफे या नावाने फूड डिलिव्हरी ॲप सुरू केलं आहे. Zepto सध्या Rs 99 पेक्षा जास्त ऑर्डरवर मोफत शिपिंग ऑफर करत आहे. यामध्ये ब्लू टोकाई कॉफी, चायोस, गुरुकृपा स्नॅक्स आणि सॅसी टीस्पून यांसारख्या रेस्टॉरंट्सशी त्यांनी टायप केलाय. यामध्ये चहा, समोसे आणि कॉफी ही उत्पादने 10 मिनिटांत डिलिव्हर केली जातायत. यासोबतच Zepto IPO काढायच्यासुद्धा तयारीत आहे. आपल्या १० मिनिटात डिलिव्हरी या मार्केटिंग स्ट्रॅटेजीमुळे zepto यशस्वी झालं. जिथे लॉकडाऊन मध्ये लोकांचे व्यवसाय उद्योग धंदे बंद पडले तिथे zepto ने स्वत:च अख्ख मार्केट तयार केलं.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.