गोदावरीच्या काठावर वसलेलं नाशिक आणि १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं त्र्यंबकेश्वर ही ठिकाणं हिंदू धर्माच्या आणि भारतीय संस्कृतीच्या वारशात अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान राखतात. याचं आपल्या नाशिकमध्ये सर्वात मोठा उत्सव साजरा केला जातो तो म्हणजे कुंभमेळा. आता नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पुराणात सांगितलंय की, खूप वर्षांपूर्वी जेव्हा देव आणि राक्षसांनी मिळून समुद्र मंथन केलं. तेव्हा समुद्रातून बऱ्याच गोष्टी बाहेर आल्या. तेव्हा एक अमृताचा कलश सुद्धा मिळाला, ज्याच्यासाठी हे मंथन करण्यात आलं होतं. पण त्यावरून देव आणि राक्षसांमध्ये जोरदार लढाई झाली. की हा अमृताचा कलश कोणाला मिळणार. (KumbhMela)
तेव्हा राक्षस अमृत घेऊन पळाले सुद्धा होते पण भगवान विष्णूंनी मोहीनी रूप घेतलं आणि ते कलश पुन्हा राक्षसांकडून परत मिळवलं. या सगळ्या धावपळीत अमृताचे चार थेंब चार ठिकाणी पडले – प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि आपलं नाशिक! आता हे चार थेंब कलशमधून म्हणजे भांड्यातून पडले होते ज्याला संस्कृतमध्ये कुंभ असं म्हणतात. म्हणूनच या चार जागी कुंभमेळा भरतो. तोही दर १२ वर्षांनी. आता नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणारा हा सिंहस्थ कुंभमेळा कसा असतो? कुंभमेळा आणि सिंहस्थ कुंभमेळा यात फरक काय? आणि सिंहस्थ कुंभमेळ्याबद्दल बरंच काही जाणून घेऊ.( Top Stories)
कुंभमेळा हा हिंदू धर्मातला एक मोठा धार्मिक उत्सव आहे, जो भारतात चार ठिकाणी होतो – प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक. हा मेळा दर १२ वर्षांनी भरतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. नुकताच महा कुंभमेळा प्रयागराज येथे पार पडला. मग नाशिक येथे होणारा सिंहस्थ कुंभमेळा कुंभमेळया पेक्षा वेगळा आहे का? नाशिक सिंहस्थ हा नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथे होणारा कुंभमेळाच आहे. याला सिंहस्थ म्हणतात कारण हा मेळा तेव्हा होतो जेव्हा सूर्य आणि गुरु ग्रह सिंह राशीत असतात. म्हणून नाशिकचा कुंभमेळा हा सिंहस्थ नावाने ओळखला जातो. पण मुळात हा कुंभमेळ्याचाच भाग आहे. (KumbhMela)
पण मग नाशिक आणि त्र्यंबकेश्वर अशा दोन ठिकाणी हा कुंभमेळा का साजरा केला? तर त्यामागे सुद्धा एक घटना आहे. १७८९ मध्ये नाशिकच्या त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यात शाही स्नानाच्या मानावरून शैव आणि वैष्णव साधूंमध्ये मोठा वाद झाला होता. या घटनेनंतर पेशवे सवाई माधवराव दुसरे यांनी निर्णय घेतला की शैव साधू त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त कुंडात स्नान करतील, तर वैष्णव साधू रामकुंड, नाशिक येथे स्नान करतील. तेव्हापासून नाशिक आणि त्र्यंबकेश्वर दोन्ही ठिकाणी कुंभमेळा साजरा होतो. (Social News / Updates)
==============
हे देखील वाचा : पद्मनाभस्वामी मंदिरात 270 वर्षांनंतर महाकुंभभिषेकम का होणार?
==============
२०२७ हा कुंभमेळा ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी ध्वजारोहणाने सुरू होईल आणि २० फेब्रुवारी २०२८ रोजी संपेल. यात मुख्य शाही स्नानं २ ऑगस्ट २०२७ आणि ११ सप्टेंबर २०२७ ला होतील. सिंहस्थ कुंभमेळा हा साधारणपणे १२ ते १५ महिने चालतो, पण २०२६-२८ चा मेळा तब्बल २२ महिने चालणार आहे, आणि याचं कारण म्हणजे त्रिखंड योग. ज्योतिषशास्त्रात, जेव्हा सूर्य, गुरु आणि इतर ग्रह विशिष्ट राशींमध्ये येतात, तेव्हा काही दुर्मीळ आणि पवित्र योग तयार होतात. २०२६-२८ मध्ये सिंह राशीत सूर्य आणि गुरु यांच्यासोबत इतर ग्रहांच्या विशेष संयोगामुळे हा त्रिखंड योग निर्माण होतो. हा योग खूप शुभ आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे, कारण यामुळे कुंभमेळ्याचा कालावधी वाढतो आणि स्नानांचं महत्त्वही वाढतं. (KumbhMela)
त्यामुळे सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सरकारने आतापासूनच कंबर कसली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठका होत आहेत, आणि तब्बल ६,९०० कोटींचा निधी यासाठी प्रस्तावित आहे. यात १० नवीन घाट, १०५ किमी रस्ते, ७६ पूल, ५,००० सीसीटीव्ही कॅमेरे आणि १०० Observation towers बांधले जातायत. या कुंभमेळ्यात ५ कोटी भाविक येण्याचा अंदाजा आहे. कुंभमेळा म्हणजे फक्त नदीत स्नान करणं नाही, तर असं मानलं जातं की, हा आत्म्याच्या शुद्धीचा आणि मोक्षाच्या मार्गाचा उत्सव आहे, कुंभमेळ्याच्या काळात पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने पाप धुतले जातात आणि आत्म्याला शांती मिळते. याशिवाय, हा मेळा साधू-संत, महंत आणि भाविकांना एकत्र आणतो. यातून आध्यात्मिक ज्ञानाचा प्रसार होतो, संतांचे प्रवचन ऐकायला मिळतात आणि आपल्या संस्कृतीचं दर्शन घडतं. त्यामुळे कुंभमेळा हा फक्त धार्मिक उत्सव नाही, तर भारताचा अत्यंत महत्वाचा सांस्कृतिक वारसा आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली?