Home » उंची वाढवण्यासाठी ‘ही’ योगासन ठरतील फायदेशीर

उंची वाढवण्यासाठी ‘ही’ योगासन ठरतील फायदेशीर

by Team Gajawaja
0 comment
Yoga for height
Share

Yoga for height- नियमित रुपात योगा केल्याने तुम्हाला आरोग्यासंबंधित विविध समस्या दूर होतात असे म्हटले जाते. तर योगासन हे तुम्हाला मानसिक आणि शारीरिक रुपात तंदुरुस्त ठेवण्यास काम करते. अशातच जर तुम्ही तुमची उंची वाढवण्यासाठी विविध उपाय शोधत असाल तर थांबा. कारण काही सोप्पी योगासन करुन ही तुम्ही तुमची उंची वाढवू शकता. त्यासाठी जास्त काही करण्याची गरज नाही आहे. आपण जसे दररोज जी योगासन करतो त्यापैंकीच काही निवडक योगासन तुम्हाला तुमची उंची वाढवण्यासाठी करायची आहेत. तर जाणून घेऊयात याबद्दलच अधिक.

-ताडासन
ताडासन करण्यासाठी तुम्हाला योगा मॅटवर सरळ उभे रहायचे आहे. आपले हात आकाशाच्या दिशेने थेट सरळ ठेवा. त्यानंतर दोन्ही हातांची बोट एकमेकांना जोडून नमस्कार अवस्थेत उभे रहा. परंतु येथे तुम्हाला तुमचे हात वरच्याच बाजूला असू द्या. तुमचे वजन पंजांवर असू द्या.काही वेळ याच मुद्रेत उभे रहा आणि त्यानंतर याआधीच्या स्थितीत उभे रहा.

-शीर्षासन
या आसनाची सुरुवात वज्रासनापासून करा. डोक हे समोरच्या बाजूला ठेवा. त्यानंतर आपल्या हाताने डोक मागील बाजूस पकडा. आता हळूहळू आपले पाय वरच्या बाजूला नेण्याचा प्रयत्न करता. हे आसन करताना तुमचे शरिर सरळ असावे. काही सेकंदांसाठी याच स्थितीत रहा.

हे देखील वाचा- ‘संतूर मम्मी’ व्हायचं असेल तर नियमित करा हे ८ योगप्रकार; चाळिशीतही भासाल नवतरुणी.. 

Yoga for height
Yoga for height

-चक्रासन
हे सोप्पे आसन करण्यासाठी तुम्हाला योगा मॅटवर पाठीवर झोपायचे आहे. आता आपले पाय गुडघ्यापासून वर उचलण्याचा प्रयत्न करा आणि आपले हात मागील बाजूस करा. आता हळूहळू आपले शरिर वरच्या बाजूला उचला. याच आसनामध्ये काही वेळ थांबा.(Yoga for height)

-सर्वांगासन
सर्वांगासन करण्यासाठी तुम्ही पाठीवर झोपा. आता आपल्या हातांनी कंबर पकडा. असे केल्यानंतर तुमचे पाय ही वरच्या दिशेने उचला. या दरम्यान, तुमच्या शरिराचा भार खांदे, कंबर आणि डोक्यावर असेल. काही वेळ याच स्थितीत रहा.

दरम्यान, उत्तम उंची ही केवळ शारीरिक लाभच नव्हे तर सकारात्मक दृष्टीकोन आणि हाय आयक्यू सोबत ही त्याचा थेट संबंध जोडते. तुमची उंची ही अनुवांशिक, व्यायाम किंवा पोषण, पर्यावरण या सारख्या अन्य फॅक्टर्सवर ही निर्धारित असते. तर किशोर वयात उंची ही अधिक वेगाने वाढत असते. परंतु २१ वर्षानंतर उंची वाढणे बंद होऊन जाते. त्यामुळे जर आता तुम्हाला तुमची उंची वाढवायची असेल तर वरील काही योगासन नक्कीच करुन पहा.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.