आपल्याला जर कोणी विचारले नाश्त्याला काय खाणार…? तर सगळ्यांच्याच तोंडातून पहिले नाव येते ‘पोहे’. आमपासून खासपर्यंत सर्वांचाच आवडता नाश्ता म्हणून पोह्यांना ओळखले जाते. दररोज सकाळी गरमगरम पोहे खायला मिळाल्यानंतर संपूर्ण दिवस मस्त आणि आनंदी जाते. महाराष्ट्रीय लोकांच्या घरात तर पोहे म्हणजे जीव की प्राण. मराठी घरांमध्ये तर पोह्यांचे विविध प्रकार करून चवीने खाल्ले जातात. यात कांदे पोहे, दडपे पोहे, पोह्यांचा चिवडा, फोडणीचे पोहे, पोह्याचे पापड, बटाटा पोहे, दही पोहे आदी प्रकार तर कमालीचे लोकप्रिय आहेत. (Poha)
द्वापारयुगामध्ये जेव्हा सुदामा त्यांचे मित्र श्री कृष्णाला भेटायला गेले. तेव्हा त्यांनी त्यांच्यासोबत कृष्णाला भेट देण्यासाठी पोहे बांधून घेतले होते. इतक्या जुन्या काळापासून आपल्याकडे पोहे प्रसिद्ध आहेत. पोह्यांची लोकप्रियता महाराष्ट्रात आणि इंदोरमध्ये कमालीची पाहायला मिळते. पोह्यांबद्दल लोकांच्या मनात असलेले प्रेम पाहून तर या पोह्यांना राष्ट्रीय पदार्थ घोषित करावा असे देखील वाटते. या पोह्यांबद्दलचे प्रेम आणि पोहे खाल्ल्याने आरोग्याला मिळणारे फायदे पाहून दरवर्षी ७ जून हा जागतिक पोहे दिन म्हणून साजरा केला जातो. या लेखातून जाणू न घेऊया पोहे खाल्ल्याने आरोग्याला कोणकोणते फायदे होतात. (Marathi News)
एनर्जी देते
असे म्हणतात की, सकाळचा नाश्ता हेव्ही करावा त्यामुळे जर नाश्त्यात पोहे खाल्ले तर ते पोटभरीचे तर होतात शिवाय दिवसभर एनर्जी देखील देतात. पोह्यात कार्बोहायड्रेट्स आढळतात जे शरीराला एनर्जी देण्यास मदत करतात. नाश्त्यात एक प्लेट पोहे खाल्ल्याने दिवसभर उत्साही वाटू शकते. (Marathi Latest News)
बीपी नियंत्रित करते
बीपीच्या रुग्णांसाठी पोहे खाणे फायदेशीर ठरू शकते. पोह्यात भरपूर फायबर असते आणि ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते. पोहे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढण्यापासून रोखते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे फायदेशीर आहे. (Top Stories)
उत्तम पचनासाठी
पोहे हे अतिशय चांगले प्रोबायोटिक अन्न आहे. हे तुमच्या आतड्याच्या आरोग्यासाठी खूप चांगले आहे. यामध्ये असलेले कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन्स आणि फायबर्समुळे तुमची पचनशक्ती मजबूत होते. (Todays Top Marathi )
रोगप्रतिकारशक्ती
पोहे खाल्ल्याने तुमची प्रतिकारशक्ती मजबूत होते. कारण पोहे फक्त हिरव्या भाज्या वापरून बनवले जातात. याच्या मदतीने शरीराला प्रोटीन आयर्न आणि इतर आवश्यक पोषक घटक मिळू शकतात. यामुळे तुमची प्रतिकारशक्ती मजबूत होऊ शकते. (Marathi Top Trending News)
अतिप्रमाणात पोहे खाल्ल्यास होणारे त्रास
* पोहे खायला खूप चविष्ट असतात, पण पोहे खाल्ल्याने अनेकांना अॅसिडिटी आणि पोटात क्रॅम्पचा त्रास होऊ लागतो. त्यामुळे त्यांना पोटात जडपणा जाणवू लागतो. हे टाळण्यासाठी पोह्याचे सेवन फार कमी प्रमाणात करा, जेणेकरून अॅसिडिटीचा त्रास होणार नाही. (Social Updates)
* पोह्यात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण खूप जास्त असते, जे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. कार्बोहायड्रेट्सच्या अतिसेवनामुळे होणाऱ्या आजारांमध्ये उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, हृदयविकार, मधुमेह, पक्षाघात आणि कोलेस्ट्रॉल यांचा समावेश होतो.
* पोहे खाताना आपण हे विसरतो की पोहे देखील भातापासून बनवले जातात, जे खाल्ल्याने साखरेची पातळी वाढू शकते, आणि या कारणामुळे जसे साखरेच्या आजारात भात हानिकारक आहे, त्याचप्रमाणे पोहे देखील शरीरासाठी चांगले नाही. (Top Marathi News)