1986 मध्ये, क्लीव्हलँड, ओहायो या शहरात तब्बल 15 लाख फुगे हवेत सोडण्यात आले. हे सगळं डाउनटाउन क्लीव्हलँडमध्ये घडलं. हे एका चॅरिटी फंडरेझरसाठी केलं गेलं होतं, आणि त्याचबरोबर क्लीव्हलँडचं नाव स्वच्छ करण्यासाठी. त्या काळात क्लीव्हलँडचं नाव खूप बदनाम झालं होतं. लोकं अमेरिकेत क्लीव्हलँडला “मिस्टेक ऑन द लेक” असं बोलायचे. सगळ्यांना वाटत होतं की हा इव्हेंट एक जबरदस्त शो असेल, ज्यामुळे जगाला कळेलं की क्लीव्हलँड सुद्धा भारी शहर आहे. पण त्या दिवशी जे घडलं, ते इतिहासात एक भयंकर आपत्ती म्हणून नोंदलं गेलं. या इव्हेंटचं नाव होतं “बलून फेस्ट 86″, विमानतळ बंद, रस्त्यांवर अपघात, आणि दोन मच्छीमारांचं गायब होणं…१५ लाख फुग्यांमुळे काय घडलं? हे जाणून घेऊ. (Balloon Fest 86)
ही कहाणी सुरू होते सप्टेंबर 1986 च्या काही महिने आधीपासून. क्लीव्हलँड त्या काळात एका वाईट नावाने ओळखलं जायचं – “मिस्टेक ऑन द लेक”. शहराचं नाव खराब झालं होतं, आणि लोकांना वाटायचं की क्लीव्हलँड म्हणजे काहीसं मागासलेलं शहर. मग शहराच्या नेत्यांनी ठरवलं, काहीतरी भव्य करायचं, ज्यामुळे क्लीव्हलँड पुन्हा चमकेल. त्याआधीच्या वर्षी, म्हणजे 1985 मध्ये, डिझनी लँडने गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये आपलं नाव नोंदवलं होतं. त्यांनी जगात सर्वात जास्त फुगे एकाच वेळी हवेत सोडले होते. हीचं idea क्लीव्हलँडच्या नेत्यांना सुचली आणि त्यांना वाटलं, आपणही असंच काहीतरी भव्य करूया. त्यांनी ठरवलं, 15 लाख फुगे हवेत सोडायचे, आणि जगाला दाखवायचं की क्लीव्हलँड काही कमी नाही! (Top Stories)
या भव्य योजनेसाठी सहा महिन्यांची तयारी झाली. एक प्रचंड जाळी बनवली गेली, जी इतकी मोठी होती की त्यात 15 लाख फुगे सामावू शकतील. फुग्यांमध्ये हवा भरुन ते जाळीत भरण्यासाठी हजारो Volunteers नी रात्रंदिवस सगळं काही परफेक्ट वाटत होतं. 27 सप्टेंबरच्या सकाळी, क्लीव्हलँडमध्ये एक लाख लोक जमले होते, १५ लाख फुगे आकाशात हे ऐतिहासिक दृश्य पाहण्यासाठी. लोक उत्साहात होते, आणि आयोजक तर खूपच खुश होते आणि अखेर तो दिवस आला – 27 सप्टेंबर 1986. हा तो दिवस होता जेव्हा क्लीव्हलँड जगाला दाखवणार होतं की ते एक वर्ल्ड-क्लास शहर आहे. आणि हे सगळं ते करणार होते या बलून लॉन्चद्वारे. पण इथून जर आपण थोडं बाजूला जाऊ, तर एक वेगळीच कहाणी समोर येते. इव्हेंटच्या आदल्या रात्री एक भयंकर वादळ आलं होतं, ज्याने ओहायोच्या काही भागांना धडक दिली आणि या वादळापूर्वी, 26 सप्टेंबरच्या संध्याकाळी, दोन मच्छीमार लेक इरीवर मासेमारीसाठी गेले होते. पण 27 सप्टेंबरच्या सकाळी हे दोन मच्छीमार बेपत्ता झाले. त्यांच्या कुटुंबांनी पोलिसांना कळवलं, आणि पोलिसांनी तात्काळ लेक इरीवर एक मोठी शोधमोहीम सुरू केली.(Balloon Fest 86)
सकाळी वादळ थांबलं होतं, पण हवामान पुन्हा खराब होण्याची शक्यता होती. लोकांना कळलं की आणखी एक वादळ क्लीव्हलँडला धडकू शकतं. पण तोपर्यंत 15 लाख फुगे हवेत सोडण्यासाठी, त्या जाळ्याखाली तयार होते, . आणि लोकं त्या बलून लॉन्चची वाट पाहत होते. पण जेव्हा इतके सारे फुगे तुमच्या डोक्यावर तयार असतात, तेव्हा तुम्ही हा इव्हेंट पुढे ढकलू शकत नाही. आणि हीच त्यांची सगळ्यात मोठी चूक ठरली. (Top Stories)
आयोजकांनी ठरलेल्या वेळेपूर्वीच, त्या फुग्यांना हवेत सोडलं. आणि जेव्हा हे फुगे हवेत गेले, ते पाहायला खूपच जबरदस्त दिसत होते. सगळं शहर रंगीबेरंगी फुग्यांनी भरलं होतं. लोकांना हे पाहून खूप आनंद झाला, असं सुंदर दृश्य होतं. पण फार वेळ नाही, हे सगळं बदलणार होतं. आयोजकांना वाटलं होतं की हे फुगे हवेत खूप वर जाऊन, हळूहळू हवेतून खाली येतील आणि जमिनीवर उतरतील. पण असं काहीच झालं नाही. थंड हवा आणि पावसाने त्या फुग्यांना खाली ढकललं. हजारो एकर जागेवर, क्लीव्हलँडच्या आजूबाजूच्या भागात हे फुगे पसरले. आणि याचा परिणाम काय झाला? जवळच्या बर्क लेकफ्रंट विमानतळावर इतके फुगे पडले त्यामुळे विमानतळ बंद करावं लागलं! रस्त्यांवर आणि हायवेवर, गल्ल्यांमध्ये हे फुगे पडले, आणि यामुळे खूप अपघात झाले. परिस्थिती इतकी बिघडली की फुग्यांना हटवण्यासाठी बुलडोझर आणावे लागले. (Balloon Fest 86)
================
हे देखील वाचा : Nepali workers in Konkan : कोकणात नेपाळ्यांचा दबदबा पण कारण काय ?
================
मच्छीमारांसाठी सुरू झालेली शोध मोहीम सुरू ठेवणं खूप अवघड झालं. कारण नदीवर सर्वत्र फुगे तरंगत होते, 29 सप्टेंबर 1986 रोजी, खूप शोध घेऊनही कोस्टगार्ड आणि पोलिसांना ती शोधमोहीम थांबवावी लागली आणि त्यानंतर दोन दिवसांनी, त्या दोन मच्छीमारांच्या मृतदेह लेक इरीच्या किनाऱ्यावर सापडले. 1988 च्या गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये क्लीव्हलँड बलून लॉन्चचं नाव नोंदवलं गेलं. पण ही शेवटची बलून लॉन्चिंग होती. त्यानंतर गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने बलून लॉन्चिंगची ही कॅटेगरीच पूर्णपणे बंद केली. क्लीव्हलँडचा हा इव्हेंट, जो शहराचं नाव उज्ज्वल करणार होता, तो एका भयंकर आपत्तीच्या नावाने इतिहासात नोंदवला गेला.