Home » ब्रिटीश राजघराण्यापेक्षा 16 पटींनी श्रीमंत आहे ‘हा’ परिवार

ब्रिटीश राजघराण्यापेक्षा 16 पटींनी श्रीमंत आहे ‘हा’ परिवार

आजवर आपण ब्रिटीश शाही परिवारासह जगातील सर्वाधिक श्रीमंत परिवारांबद्दल ऐकले असेल. मात्र जगातील सर्वाधिक श्रीमंत रॉयल फॅमिली कोण आहे माहितेय का?

by Team Gajawaja
0 comment
World richest royal family
Share

जगातील काही देशांमध्ये लोकशाहीची पद्धत सुरु होण्यापूर्वी राजा आणि शाही परिवाराची हुकूमत असायची. मात्र तो काळ आता संपला असला तरीही त्या रॉयल फॅमिलीची शान आजही कायम आहे. जगातील सर्वाधिक रॉयल फॅमिलीच्या रुपात ब्रिटिश राजघराण्याला ओळखले जाते,ज्यांनी काही देशांवर राज्य केले. त्यांची हुकूमशाही जगातील कानाकोपऱ्यापर्यंत पसरली गेली होती. मात्र आता चर्चा तर दुसरीच सुरु झाली आहे. ती म्हणजे जगातील एका श्रीमंत रॉयल परिवाराची. ऐवढेच नव्हे तर ब्रिटीश राजघराण्यापेक्षा ही १६ पटींनी श्रीमंत आहे ही रॉयल फॅमिली. (World richest royal family)

आजवर आपण ब्रिटीश शाही परिवारासह जगातील सर्वाधिक श्रीमंत परिवारांबद्दल ऐकले असेल. मात्र जगातील सर्वाधिक श्रीमंत रॉयल फॅमिली कोण आहे माहितेय का? या परिवाराकडे सोने, हिरे, दागिने आणि आलिशान गाड्यांसह एकापेक्षा एक उत्तम खासगी जेट सुद्धा आहेत.

World richest royal family

World richest royal family

ज्या श्रीमंत रॉयल फॅमिलीची चर्चा होत आहे ती म्हणजे ‘द रॉयल फॅमिली ऑफ सऊदी अरब’. सध्या या परिवाराचा मुख्य म्हणजेच राजा सलमान बिन अब्दुल अजीज अल सऊद हा आहे. श्रीमंत असण्यासह या परिवाराची ओळख ही जगातील सर्वाधिक ताकदवान परिवारात होते. असे ही म्हटले जाते की, या शाही परिवारात जवळजवळ १५ हजार लोकांचा समावेश आहे. यांच्याकडे १४ कोटी डॉलरची संपत्ती आहे. ही संपत्ती ब्रिटीश रॉयल फॅमिलीपेक्षा सुद्धा काही पटींनी अधिक आहे.सऊदी अरबमध्ये १९३२ पासून सौदी राजवंशाचे शासन आहे.(World richest royal family)

हेही वाचा- स्टीव जॉब्सवरच नव्हता Apple च्या को-फाउंडरचा विश्वास

या श्रीमंत रॉयल फॅमिलीकडे जगातील प्रत्येक आलिशान गोष्ट आहे. त्याच गोष्टींपैकी एक म्हणजे अल यमामाह पॅलेस. या पॅलेसमध्ये सऊदी अरबचा राजा राहतो. १९८३ मध्ये तयार करण्यात आलेला हा पॅलेस चार मिलियन स्क्वेअर फूटवर विस्तारला गेला आहे. या पॅलेसमध्ये एक हजार खोल्या आहेत. त्याचसोबत मुव्ही थिएटर, काही स्विमिंग पूल्स आणि एक मस्जिद सुद्धा आहे. या व्यतिरिक्त परिवाराकडे Leonardo Da Vinci’s Salvator Mundi यांचे पेंटिंग सुद्धा आहे. त्याची किंमत तब्ब्ल ४० मिलियन डॉलर आहे. आलिशान गोल्डन कार आणि एक शानदर याच सुद्धा आहे. याच बद्दल बोलायचे झाल्यास तर Serene नावाची या याचची किंमत चारशे मिलियन डॉलर आहे. ती खासकरुन इटलीत बनवण्यात आली. त्यांच्याकडे एकापेक्षा एक उत्तम गोल्डन कार सुद्धा आहेत.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.