World Richest Leady : जेव्हा कधी जगभरातील श्रीमंत लोकांबद्दल बोलले जाते त्यावेळी बहुतांश नावे ही पुरुष मंडळींचीच घेतली जातात. बिल गेट्स असो किंवा मार्क झुकरबर्ग अथवा एलन मस्क. श्रीमंत व्यक्तींच्या नावांमध्ये ही काही नावे नेहमीच ऐकली बोलली जात असल्याने त्यांचेच चेहरे बहुतांशवेळा आठवले जातात. पण तुम्हाला माहितेय का, जगातील श्रीमंत महिला कोण आहेत. या श्रीमंत महिलांमध्ये भारतीय लेडीचा देखील समावेश आहे.
फ्रँकोइस बेटेनकोर्ट मेयर्स (Francoise Bettencourt Meyers)
फ्रान्समध्ये राहणारी फ्रँकोइस बेटेनकोर्ट मेयर्स जगातील सर्वाधिक श्रीमंत महिला आहे. तिचे एकूण नेटवर्क $97.5 बिलियन आहे. वयाच्या 70 व्या वर्षात त्या L’Oréal नावाच्या कंपनीच्या मालकीण आहेत. जगभारातील श्रीमंत व्यक्तींमध्ये तिचा 15 वा क्रमांक लागतो.
ॲलिस वॉल्टन (Alice Walton)
युएसमध्ये राहणारी 74 वर्षीय Alice Walton जगातील सर्वाधिक श्रीमंत महिलांच्या यादीतील दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिचे एकूण नेटवर्थ $71.5 बिलियन आहे. अॅलिस या Walmart कंपनीच्या मालकीण आहेत. जगातील श्रीमंत व्यक्तींमध्ये 21 व्या क्रमांकावर आहे. अॅलिस Crystal Bridges Museum Of American Art च्या चेअरमन आहेत. (World Richest Leady)
ज्युलिया कोच (Julia Koch)
युएसमध्ये राहणारी 61 वर्षीय ज्युलिया जगातील श्रीमंत महिलांच्या यादीतील तिसऱ्या क्रमांकावर आहे. तिचे एकूण नेटवर्थ $61.4 बिलियन आहे. Koch Industries कंपनीची मालकीण असलेली ज्युलिया जगातील श्रीमंत लोकांच्या यादीतील 24 व्या स्थानावर आहे.
जॅकलिन मार्स (Jacqueline Mars)
जॅकलिन मार्स जगातील चौथ्या क्रमांकावरील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आहे. श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये जॅकलिन 34व्या क्रमांकावर आहे. युएसमध्ये राहणारी 84 वर्षीय जॅकलीन आपल्या Candy, Pet Food चा व्यवसाय करते. तिचे एकूण नेटवर्थ $38.7 बिलियन आहे.
सावित्री जिंदाल (Savitri Jindal)
भारतात राहणारी सावित्री जिंदाल या Savitri Jindal स्टील कंपनीच्या मालकीण आहेत. त्या सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींच्या यादीत सातव्या क्रमांकावर आहेत. भारतीय महिलांच्या यादीत त्या पहिल्या क्रमांकावर आहेत. 73 वर्षीय सावित्री जिंदाल यांचे नेटवर्थ $31.1 बिलियनच्या मालकीण आहेत. यांचा संबंध Jindal ग्रुपमधील आहेत.