Home » World Record : महिला शेफ सलग चक्क १०० तास जेवण बनवत राहिली…

World Record : महिला शेफ सलग चक्क १०० तास जेवण बनवत राहिली…

by Team Gajawaja
0 comment
World Record
Share

जगात असे काही लोक असतात जे आपल्या कारमान्यांमुळे सर्वांना हैराण करतात. असाच एक कारमाना एका महिलेने केला आहे. खरंतर तिचा कारनामा ऐकून कोणीही म्हणेल हे शक्यच नाही. पण त्या महिलेने करुन दाखवलेयच नव्हे तर वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. सर्वसामान्यपणे तुम्ही किचनमध्ये १-२ तास काम करु शकता. जर तुम्ही रेस्टॉरंटमध्ये काम करत असाल तर कमीत कमी ८ तास. पण एका महिलेने तब्बल १०० तास जेवण बनवले. (World Record)

सध्या या महिलेचे फोटो सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे. त्यात तिने केलेल्या कामगिरीचा आनंद तिच्या चेहऱ्यावर व्यक्त होताना दिसून येत आहे. महिलेने १०० तास सातत्याने जेवण बनवले आणि रेकॉर्ड केला. आता पर्यंत असा कारनामा कोणीच करुन दाखवलेला नाही. महिलेसाठी तो काळ किती आनंददायी असेल हे शब्दांत न सांगण्यासारखेच आहे.

महिला ही नायजेरियात राहणारी आहे. ती पेशाने शेफ आहे. हिल्डा बसी ही किचनमध्ये जेवण बनवण्याचा रेकॉर्ड ब्रेक करत आहे. तिन २०१९ मध्ये भारतीय शेफ लता टंडन यांनी ८७ तास ४५ मिनिटांचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला होता. पण आता शेफ हिल्डा बेकी हिने याला आव्हान दिले आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने सुद्धा याबद्दल एक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी असे म्हटले आहे की, ते आता अधिकृत पुष्टीची वाट पाहत आहेत.

शेफ लता टंडन हिने ८५ तास सातत्याने काम करत रेकॉर्ड ब्रेक केला होता. तिच्या या रेकॉर्ड ब्रेकच्या कामगिरीच्या वेरिफिकेशनसाठी इंडिया बुक रेकॉर्ड आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्डची टीम रीवा येथे आली होती. दोघांनी तिला त्यावेळी प्रशस्तीपत्रक दिले होते. लता टंडनच्या आधी सुद्धा हा रेकॉर्ड अमेरिकन शेफ लुम्पकिन हिच्या नावावर होता. तिने तर ६८ तास ३० मिनिटे सातत्याने जेवण बनवले होते. (World Record)

हेही वाचा- आर्टिफिशियल स्विटनरचा वापर करत असाल तर व्हा सावध

शेफ लता हिने चार दिवसात १६०० किलो पेक्षा अधिक जेवण, ४०० वडापाव, २५० सँन्डविच आणि अन्य लोकल पदार्थ बनवले होते. शेफ लताने स्पर्धेत विजयी झाल्यानंतर लोकांना १७ हजारांहून अधिक झाडं खरेदी आणि लावण्याचे आवाहन केले होते. या कार्यक्रमात २० हजारांपेक्षा अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यामध्ये अनाथाश्रमातील आणि नेत्रहिन शाळेतील मुलं आणि वृद्धाश्रमातील सदस्य सुद्धा सामील होते.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.