Home » Hindenburg : हिंडेनबर्गच्या दुकानाला टाळे का लागले ?

Hindenburg : हिंडेनबर्गच्या दुकानाला टाळे का लागले ?

by Team Gajawaja
0 comment
Hindenburg
Share

नॅथन अँडरसन आणि हिंडेनबर्ग ही दोन नावं भारतातील राजकारणात वादळ घडवून आणण्यासाठी कायम वापरली गेली आहेत. 2017 मध्ये नॅथन अँडरसन यांनी हिंडेनबर्ग संशोधन नावाची कंपनी चालू केली. फक्त 11 सहका-यांसह चालू झालेल्या या कंपनी वजा संस्थेचे काम मोठ्या कंपन्यांच्या आर्थिक अनियमितता उघड करण्याचे होते. भारतातील अदानी ग्रुपसह अनेक मोठ्या कंपन्यांवर गंभीर आर्थिक अनियमिततेचा आरोप या हिंडेनबर्गनं केला. ही कंपनी जशी अचानक सुरु झाली, तशीच कोणतंही ठोस कारण न देता नॅथन यांनी हिंडेनबर्ग बंद करत असल्याची घोषणा केली. 2017 ते 2025 या कालावधीत हिंडेनबर्ग हे नाव जगभर गाजलं. त्यांनी भारतासह अन्य देशातही आर्थिक घोटाळे उघड करण्याच्या नावावर खळबळ उडवून दिली होती. (Hindenburg)

मात्र या कंपनीचा हेतू वेगळा असल्याचा वारंवार आरोप करण्यात येत होता. अदानी समुहावर अनेक आरोप करण्यापूर्वी नॅथन यांनी अदानी समुहाचे अनेक शेअर्स खरेदी केल्याचे स्पष्ट झाले होते. हिंडेनबर्गनं त्यानंतर अदानी समुहावर आरोप केल्यामुळे त्यांचे कोसळले, मात्र नॅथन यांनी शॉर्ट टर्मच्या आधारावर खरेदी केलेल्या या शेअर्स मधून करोडो रुपये कमावल्याचा आरोप त्यांच्यावर झाला. आता हिच हिंडेनबर्ग कुठलही स्पष्ट कारण न देता अचानक बंद होत आहे. त्यामुळे असा कुठला संशोधन अहवाल या हिंडेनबर्गनं पूर्ण केला आहे, असा प्रश्न विचारण्यात येत असून डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीच या कंपनीनं आपला गाशा गुंडाळल्याचीही टिका होत आहे. नॅथन अँडरसन यांनी हिंडेनबर्गच्या नावानं अनेकांची फसवणूक केली आहे. (Latest Updates)

मात्र ट्रम्प यांच्या कडक भुमिकेमुळे त्यांनी आधीच स्वतःहून कंपनीला टाळं लावल्याची चर्चा सुरु झाली आहे. असे असले तरी हिंडेनबर्गमधील अनियमीत व्यवहाराची चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी आता जोर पकडू लागली आहे. हिंडेनबर्ग या कंपनीनं 2023 मध्ये भारतीय अब्जाधीश गौतम अदानी यांच्या कंपन्यांविरुद्ध एक अहवाल प्रसिद्ध केला होता. त्या अहवालानंतर शेअर बाजारात मोठी पडझड झाली. अदानींच्या कंपन्यांना शेअर बाजारात मोठे नुकसान झाले. अदानी समूहाने हिंडेनबर्गचे आरोप फेटाळून लावले. मात्र त्यानंतरही शेअर बाजारातील पडझड कमी झाली नाही. या काळात स्वतः हिंडेनबर्गनं अदानी शेअर्समधून करोडो रुपयांची कमाई केली. हिंडेनबर्गची काम करण्याची हिच पद्धत कामय होती. जगभरातील अनेक मान्यवर कंपन्याना टार्गेट करुन त्यांच्या शेअर्सच्या किंमती खाली आणायच्या आणि त्यानंतर त्यांच्या शेअर्सच्या माध्यमातून लाखोंची माया गोळा करायची हे नंतर उघड झाले. (Hindenburg)

भारताच्या अदानी समुहसोबत केलेली चाल त्यांनी अमेरिकेतील इकान एंटरप्रायझेस या कंपनीबाबतही केली. त्यांनाही हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालामुळे अब्जावधी डॉलर्सचे नुकसान झाले. यानंतरही अदानी समुहानं आपल्याला झालेली तुट भरुन काढल्यावर हिंडेनबर्ग पुन्हा 2024 साली त्यांच्या मागे लागली. त्यांनी एक अहवाल प्रसिद्ध करुन सेबीच्या प्रमुख माधवी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांचे अदानी समूहाशी संबंधित एका ऑफशोअर कंपनीत हिस्सेदारी असल्याची माहिती मांडली. या बातमीचाही भारतातील शेअर बाजारावर मोठा परिणाम झाला. अदानी समुहाला जवळपास 100 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. अदानी समुहानं यावेळीही आपण कुठलेही चुकीचे काम केले नसल्याचे स्पष्ट केले. पण हिंडेनबर्गच्या अहवालावर विश्वास ठेवणा-यांनी अदानी समुहाला मात्र मोठे नुकसान सहन करायला लागले. या सर्वांमुळेच कायम वादात रहाणा-या हिंडेनबर्गला बंद करण्याचा निर्णय नॅथन अँडरसर यांनी का घेतला याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात कुठलाही खुलासा नॅथन यांनी केलेला नाही. (Latest Updates)

=====================

हे देखील वाचा : America : श्रीमंतांचा अमेरिकेला धोका !

Maha Kumbha : हर हर महादेवच्या जयघोषात महाकुंभाचा प्रारंभ !

=====================

फक्त एक पत्र जाहीर केले आहे. त्यात त्यांनी हिंडेनबर्गने आपले लक्ष्य पूर्ण केल्याचे सांगत ती बंद करत असल्याचे सांगितले. त्यांच्या या खुलाशानंतर काही देशात खळबळ उडाली आहे. हिंडेनबर्गच्या टीममध्ये 11 सदस्य होते. यासर्वांनी आता स्वतंत्र आर्थिक संस्था उघडण्याची तयारी सुरु केली आहे. आता स्वतःची आर्थिक संशोधन फर्म उघडण्याचा विचार करत आहेत. गेल्या काही वर्षात नातेवाईक, कुटुंबाला आपल्याला पुरेसा वेळ देता आलेला नाही. आता तो वेळ देणार असल्याचे कारण नॅथन यांनी पुढे केले आहे. हे कारण कोणालाही पटण्यासारखेच नाही. त्यामुळे नॅथन यांनी ट्रम्प प्रशासनाला घाबरुन आपल्याच कंपनीला टाळे लावल्याची बातमी आहे. मात्र नॅथन यांनी कंपनींवर आरोप करत शेअर्सच्या माध्यमातून कोरोडो रुपये गमावले आहेत. त्यामुळे नॅथन यांनी कंपनी बंद केली तरी त्यांच्या कंपनीनं केलेल्या सर्व आर्थिक व्यवहारांची चौकशी व्हावी अशी मागणी आहे. (Hindenburg)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.