Home » Sharmishtha Panoli : ‘ऑपरेशन सिंदूर’शी संबंधित ‘त्या’ व्हिडिओमुळे सोशल मीडिया स्टार शर्मिष्ठा पनोलीला अटक

Sharmishtha Panoli : ‘ऑपरेशन सिंदूर’शी संबंधित ‘त्या’ व्हिडिओमुळे सोशल मीडिया स्टार शर्मिष्ठा पनोलीला अटक

by Jyotsna Kulkarni
0 comment
Sharmishtha Panoli
Share

संपूर्ण जगभरात भारताने पाकिस्तान विरोधात राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ची कमालीची चर्चा झाली. काश्मीरमधील पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर ही मोहीम राबवली आणि या अंतर्गत पाकिस्तानमध्ये असलेल्या सर्व दहशतवादी ठिकाणांचा खात्मा केला. या मोहिमेला आता एक महिना पूर्ण होईल, अजूनही याबद्दल चर्चा आणि बातम्या आपल्या कानावर पडत आहे. याच ऑपरेशन सिंदुरशी संबंधित सोशल मीडियावर आक्षेपार्ह विधान केल्याच्या आरोपाखाली सोशल मीडिया इन्फ्लुएंसर असलेल्या शर्मिष्ठा पानोलीला कोलकाता पोलिसांनी गुरुग्राम येथून अटक केली आहे. (Sharmishtha Panoli)

शर्मिष्ठा पानोलीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता ज्यामध्ये एका विशिष्ट धार्मिक समुदायासाठी अपमानास्पद विधान केल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आलाय. ऑपरेशन सिंदूरवरील अपडेटला प्रतिसाद म्हणून तिने पोस्ट केली होती. जी आता डिलीट करण्यात आलीय. पण तिचा स्क्रीनशॉट आणि पोस्टमध्ये शेअर केलेला व्हिडिओ वेगाने व्हायरल झालाय. त्यानंतर लोकांमध्ये खूप संताप निर्माण झाला. शर्मिष्ठाने शेअर केलेल्या व्हिडिओमुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्यामुळे अनेकांनी तिच्या विरोधात सूर लावला आहे, तर काहींनी तिला पाठिंबा देखील दर्शवला आहे. (Marathi News)

शर्मिष्ठा पनोली आहे कोण? 
२२ वर्षांची असलेली शर्मिष्ठा ही पुण्यातील लॉ युनिव्हर्सिटीची विद्यार्थिनी असून, तिंचे इन्स्टाग्रामवरही मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स आहेत. ती एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर देखील आहे. तिच्या या फॉलोअर्समध्ये एक पाकिस्तानी व्यक्ती देखील आहे. याच व्यक्तीने पहलगाम हल्ल्यानंतर शर्मिष्ठाला एक प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना शर्मिष्ठाने सोशल मीडिया हॅंडलवर एक व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओत तिने पहलगाम हल्ल्यानंतर बॉलीवूड कलाकारांनी घेतलेल्या मौनावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. याच व्हिडिओनंतर खऱ्या वादाला तोंड फुटले. एखाद्याच धर्मावर कथितरित्या आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल कोलकाता पोलिसांनी तिच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Top Marathi Headline)

Sharmishtha Panoli

पोलिसांनी शर्मिष्ठा पानोलीला कायदेशीर नोटीस बजावण्यासाठी बरेच प्रयत्न केले. पण तिचा आणि तिच्या कुटुंबाचा कोणताही ठाव ठिकाण पोलिसांना सापडला नाही. पोलिसांचे प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर न्यायालयाने तिच्याविरोधात थेट अटक वॉरंट जारी केले. ज्यानंतर पोलिसांनी गुरुग्राममधून तिचा ठिकाणा शोधत तिला अटक केली. (Social Updates)

नक्की प्रकरण आहे काय?
१४ मे २०२५ रोजी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या लष्करी कारवाईबद्दल एका पाकिस्तानी यूजरने शर्मिष्ठाला एक प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी शर्मिष्ठाने एक व्हिडीओ शेअर केला आणि वाद सुरु झाला. तिने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये इस्लाम आणि पैगंबर मुहम्मद यांच्याबद्दल अपमानास्पद टिप्पणी केल्याचा आरोप आहे. ज्यावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसत आहे. त्या व्हिडिओमध्ये शर्मिष्ठाने बॉलिवूड कलाकारांनी सुद्धा पाकिस्तानविरुद्ध शांत राहिल्याबद्दल टीका केली आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शर्मिष्ठाला जीवे मारण्याच्या आणि बलात्काराच्या धमक्या येऊ लागल्या. तिला मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला. (Top Stories)

पुढे १५ मे रोजी शर्मिष्ठाने ट्विटरवर अर्थात एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माफी मागितली. तिने शेअर केलेल्या माफी पोस्टमध्ये लिहिले, “मी बिनशर्त माफी मागते, जे काही शेअर केले त्या माझ्या वैयक्तिक भावना आहेत आणि मी कधीही जाणूनबुजून कोणालाही दुखावू इच्छित नाही. जर कोणी दुखावले गेले असेल तर मला माफ करा. मी आतापासून माझ्या सार्वजनिक पोस्टसाठी जागरूक राहील. माझा व्हिडीओ ‘कट्टरपंथी पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या’ धमक्यांना प्रतिसाद होत्या. माझ्यासाठी माझा देश प्रथम येतो. मी पुन्हा माफी मागते.” तिच्या या माफीनाम्यानंतर तिने तो विवादित व्हिडिओ व्हिडिओ डिलीट केला. (Marathi Latest News)

Sharmishtha Panoli

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) चे नेते वारिस पठाण यांनी जाहीरपणे तिच्या अटकेची मागणी केली तेव्हा हे प्रकरण खूपच वाढले. ‘कोणताही मुस्लिम आपल्या पैगंबराबद्दल अपमानास्पद शब्द सहन करणार नाही,’ असे ते म्हणाले होते. मात्र शर्मिष्ठाच्या अटकेनंतर याचे राजकारण सुरू झाले आहे. सोशल मीडियावर शर्मिष्ठाच्या अटकेवरून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. (Todays Marathi News)

===========

हे देखील वाचा : Jonas Masetti : कोण आहेत, पद्मश्री जोनास मासेट्टी !

===========

अनेक लोक कोलकाता पोलीस आणि ममता बॅनर्जी सरकारला टार्गेट करताना दिसत आहेत. “ही अटक अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला नाही का?” असे म्हणत अनेकांनी तर शर्मिष्ठाच्या अटकेला राजकीय दबाव असल्याचे सांगितले आहे. सोबतच सोशल मीडियावर #ReleaseSharmistha, #Sharmishta आणि #IStandwithSharmishta असे हॅशटॅग्स ट्रेंड करत आहेत. मुख्य म्हणजे शर्मिष्ठाला बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार कंगना राणोत आणि अभिनेते पवन कल्याण यांनी पाठिंबा दिला आहे. (Political News)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.