लोकसभेत नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या विरोधात संयुक्त विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर काँग्रेसने आपल्या सर्व खासदारांना व्हिप जारी करत विधिमंडळात उपस्थितीत राहण्यास सांगितले. आपण नेहमीच व्हिप बद्दल ऐकतो. संसदेच्या राजकरणात व्हिप म्हणजे एका आदेशाप्रमाणे असतो. याचे पालन पक्षाच्या सर्व सदस्यांना करावे लागते. (Whip in parliamentary)
लोकशाही संसदीय प्रणालीत व्हिपची प्रथा असतेच. याच्या माध्यमातून महत्त्वाच्या वेळी पक्ष आपल्या लोकांना खास गाइडलाइन्स पालन करण्यास सांगतो. संसदीय प्रणालीत पक्षााचा व्हिप हा काही नवा नाही. खरंतर तो ब्रिटेनच्या संसदीय प्रणालीतून आली आहे. व्हिप जारी करण्याचा उद्देश असा की, आमदार किंवा खासदारांना क्रॉस वोटिंग करण्यापासून रोखणे. तसेच आपल्या सदस्यांना एकत्रित करणे.
व्हिप म्हणजे काय
संसदीय संसदेत व्हिप एखाद्या पक्षाच्या सदस्यांसाठी लेखी आदेश असतो जो त्यांना सदनात उपस्थितीत राहणे आणि वोटिंगसाठी दिला जातो. व्हिप पक्ष या कारणास्तव जारी करतो की, त्यांच्या सदस्यांनी सदनात उपस्थिती राहून वोटिंगच्या वेळी मतदान करणे. व्हिप जारी झाल्यानंतर यामध्ये पक्षाच्या सदस्यांना त्याचे पालन करावेच लागते. प्रत्येक पक्ष यासाठी एका सदस्याची नियुक्ती करतात ज्याला चीफ व्हिप असे म्हटले दाते.
व्हिप हा शब्द खरंतर पक्षाच्या आदेशाचे पालन करणाऱ्यासाठी जुनी ब्रिटिश प्रथा Whipping मधून आला आहे. थोडक्यात, याचा अर्थ इशारा किंवा मार्गदर्शक असा होतो. तर भारतात सर्व पक्ष आपल्या सदस्यांना व्हिप जारी करु शकतात. पक्ष व्हिप जारी करण्यासाठी सदनातील सदस्यांपैकी एका वरिष्ठ सदस्यला मुख्य व्हिप म्हणून निवडतात, जो आपल्या पक्षाला व्हिप जारी करतो.
सरकारच्या संसदीय स्वरूपामध्ये, विविध राजकीय पक्षांचे व्हिप हे लोकसभा, राज्यसभा किंवा विधानसभेतील पक्षांच्या अंतर्गत संघटनेत आणि शिस्तीचा एक महत्त्वाचा दुवा आहेत. पक्षाच्या सदस्यांना व्हिपद्वारे गाइडलाइन्स मिळतात.(Whip in parliamentary)
हेही वाचा- IB आणि RAW मधील नेमका फरक काय?
व्हिपचे पालन केले नाही तर काय होते
जर पक्षाच्या सदस्याने व्हिपचे पालन केले नाही तर त्याची खासदारकी किंवा आमदारकी धोक्यात येऊ शकते. पक्षांतर विरोधी कायद्याअंतर्गत त्याला अयोग्य घोषित केले जाऊ शकते. मत्र अशा स्थितीत कोणत्याही पक्षाचे एक तृतीयांश सदस्य व्हिपचे पालन न करता पक्षाच्या लाइनच्या विरोधात मतदान करतात तर असे मानले जाते की, त्यांनी पक्षापासून फारकत घेऊन नवा पक्ष स्थापन केला आहे.