द काश्मीर फाइल्स आणि द केरळ स्टोरी या चित्रपटानंतर आणखी एक चित्रपट येत असून या चित्रपटाच्या नावातूनच त्याला किती विरोध होणार हे स्पष्ट होत आहे. 7 जुलै रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणा-या या चित्रपटाचे नाव आहे 72 हुरें (72 Huron Trailer). जिहादच्या नावाखाली अनेक तरुणांना दहशतवादाचा मार्ग दाखवला जातो. या तरुणांना दहशतवादी बनण्याचे प्रशिक्षण दिले जाते. हा सगळा प्रवास कसा चालतो, या मार्गात येणारे तरुण कसे फसवले जातात, त्यांना कशी आमिषे दाखवली जातात, यावर आधारीत हा 72 हुरें चित्रपट असून त्याचा नुकताच ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर (72 Huron Trailer) प्रदर्शित झाल्यावर एकच गदारोळ उठला आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी होऊ लागली आहे. मात्र या चित्रपटातून चुकीच्या मार्गावर जाणा-या तरुणांना योग्य संदेश मिळेल असा सकारात्मक पाठिंबाही मिळत आहे. एकूण 7 जुलै रोजी प्रदर्शित होणा-या 72 हुरें (72 Huron Trailer) या चित्रपटाला बॉक्सऑफीस वर कसा प्रतिसाद मिळतो हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
72 हुरें या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित (72 Huron Trailer) झाल्यावर एकच गदारोळ उठला आहे. हा चित्रपट दहशतवादावर बनला आहे. एका दहशतवाद्याच्या मनात काय चालले आहे, मृत्यूला सामोरे जाताना त्याच्या मनात काय विचार येतात, त्याला कशा आकर्षणात अडकवण्यात येतं, हे सर्व या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्यात आले आहे.
जागतिक पातळीवर वाढत्या दहशतवादावर अनेकवेळा चिंता व्यक्त करण्यात येत आहे. दहशतवाद कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न चालू असले तरी दिवसेंदिवस दहशतवादाच्या घटना वाढीस लागल्या आहेत. याविरोधात सर्वच देशात कडक कारवाई करण्यात येते. हे दहशतवादी कसे तयार होतात. अगदी कोवळ्या वयाची मुलं हसत हसत मृत्यूला कशी आणि का सामोरी जातात, हे प्रश्न सर्वांनाच पडलेले असतात. मात्र या मुलांना तयार करण्यासाठी एक मोठं नेटवर्क काम करत असतं. गरजू मुलांना निवडून त्यांना दहशतवादी बनवण्याचं प्रशिक्षण देण्यात येतं. याआधी आलेल्या पूर्वी ‘द काश्मीर फाइल्स’ आणि ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटांमधूनही याबाबत प्रकाश टाकण्यात आला आहे. मात्र 72 हुरें या चित्रपटात (72 Huron Trailer) याच विषयावर रोख आहे. दहशतवादी म्हणून काम करणा-या युवकांना मृत्यूनंतर जन्नतमध्ये 72 हुरें मिळण्याची खात्री कशी दिली जाते, हेही दाखवण्यात येणार आहे. हा चित्रपट बॉलीवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक संजय पूरन सिंह यांनी बनवला आहे. संजय पूरन यांना दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे.
72 हुरें चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित (72 Huron Trailer) होताच राजकारण तापले आहे. या चित्रपटाविरोधात निदर्शने सुरू झाली आहेत. मात्र काही संघटनांनी चित्रपटाला पाठिंबाही दिला आहे. सुफी इस्लामिक बोर्डाने या चित्रपटाचे स्वागत आणि समर्थन केले आहे. याबाबत सुफी इस्लामिक बोर्डाचे राष्ट्रीय प्रवक्ते कशिश वारसी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
ज्या कट्टरतावादी संघटना मुस्लिम तरुणांना 72 हुरोंचे आमिष दाखवून त्यांना इस्लामपासून दूर नेत आहेत आणि त्यांना चुकीचा मार्ग दाखवत आहेत, त्यांचा आम्ही विरोध करत आहोत. हा चित्रपट म्हणजे दहशतवादी मानसिकतेवर हल्ला असल्याचे कशिश वारसी सांगतात. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर काही मुस्लिम तरुणांनी हा चित्रपट पाहायला नक्कीच जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. संजय पूरन सिंग दिग्दर्शित 72 हुरैं (72 Huron Trailer) 7 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. मात्र त्याच्यावर आतापासून निर्माण होणारे वाद पाहता चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत शंकाही व्यक्त होत आहे.
=======
हे देखील वाचा : Ready to wear साडी खरेदी करण्यापूर्वी ‘या’ गोष्टींकडे द्या लक्ष
=======
स्वतः चित्रपटाचे दिग्दर्शक संजय पूरन सिंग या चित्रपटाबाबत बरेच उत्सुक आहेत. ते याबाबत सांगतात की, हा चित्रपट प्रेक्षकांना पाहण्यासाठी कोणीही थांबवू शकत नाही, ज्यासाठी आम्ही सर्वांनीच जवळपास चार वर्षे मेहनत घेतली आहे. चित्रपटाचा विषय वादग्रस्त आणि दहशतवादाशी संबंधित आहे आणि दहशतवादी संघटना लोकांचे ब्रेनवॉश कसे करतात, हे यातून दाखवण्यात आल्याचे संयज पूरणसिंग सांगतात. द काश्मीर फाइल्स आणि द केरळ स्टोरी यानंतर येणा-या या 72 हुरे चित्रपटांनी पुन्हा वाद निर्माण होणार आहे.
सई बने