Home » ‘त्या’ ज्वेलरी ब्रँडच्या जाहिरातीवरुन बेबोला करावा लागतोय ट्रोलिंगचा सामना

‘त्या’ ज्वेलरी ब्रँडच्या जाहिरातीवरुन बेबोला करावा लागतोय ट्रोलिंगचा सामना

by Team Gajawaja
0 comment
Kareena Kapoor Troll
Share

सोशल मीडियामुळे जग जवळ आले असे नेहमीच म्हटले जाते. याच सोशल मीडियामुळे कलाकार आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये एक उत्तम असे संपर्काचे माध्यम देखील तयार झाले आहे. सोशल मीडियामुळे चांगल्या वाईट गोष्टींवर प्रत्येक व्यक्ती त्यांचे वैयक्तिक मत बिनधास्त आणि बेधडकपणे मांडू शकतो. मात्र आपल्याकडे एक म्हण आहे नाण्याला नेहमीच दोन बाजू असतात. अगदी खरे आहे. जरी सोशल मीडियाचे अनेक फायदे असले तरी याच सोशल मीडियाचे अनेक तोटे देखील आहेत. याच सोशल मीडियाचा सर्वात जास्त त्रास कलाकारांना होत असतो. कारण या माध्यमातून त्यांना नेहमीच ट्रोल केले जाते. सध्या अक्षय कुमारला त्याच्या एका जाहिरातींवरून तुफान ट्रोल केले जात होते. पण आता अक्षयनंतर बॉलिवूडची बेबो अर्थात करीना कपूर खानला ट्रोल केले जात आहे, आणि तेही एका जाहिरातींवरूनच.  (Kareena Kapoor Troll)

झाले असे की, लवकरच अक्षय तृतीया हा हिंदू धर्मियांचा मोठा आणि महत्वाचा सण येणार आहे. साडे तीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या या सणाच्या दिवशी हिंदू लोकं मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी करतात. यादिवशी सोने खरेदी करणे खूपच शुभ मानले जाते. त्यामुळे या सणाच्या पार्श्वभूमीवर सध्या मोठेमोठे ज्वेलरी ब्रँड असणारे जोरदार जाहिराती करताना दिसत आहे. अनेक मोठ्या ज्वेलरी ब्रँडच्या ब्रँड अँबेसिटरसाठी वेगवेगळ्या कलाकारांना विचारणा होते. ज्वेलरी जगातील मोठा ब्रँड असणाऱ्या मलबार ग्रुपची ब्रँड अँबेसिटर म्हणून करीना कपूर ओळखली जाते. नुकताच या ज्वेलरी ब्रँडने अक्षय तृतीयेला त्यांची नवीन ज्वेलरी लाँच केली असून, सध्या याची जोरदार जाहिरात केली जात आहे. या जाहिरातीमध्ये नेहमीप्रमाणे करीना कपूर दिसत असून, जाहिरात चांगलीच ट्रोल होत आहे. (Kareena Kapoor Troll)

आता तुम्ही म्हणाल सणाच्या निमित्ताने नवीन ज्वेलरी लाँच होते, यात ट्रोलिंग आले कुठे? अहो हा तोच तर खरा कळीचा मुद्दा आहे. या जाहिरातीमध्ये करीना कपूरने सुंदर असा गुलाबी रंगाचा लेहेंगा परिधान केला असून, त्यासोबत मॅचिंग सोन्याची ज्वेलरी देखील घातली आहे. अतिशय उत्तम मेकअप तिचा या जाहिरातीमध्ये दिसत असली तरी त्यात लोकांना काहीतरी खटकले आणि त्यांनी ती चूक शोधून काढलीच. या जाहिरातीमध्ये करीनाने कपाळावर टिकली न लावल्यामुळे तिला नेटकऱ्यांच्या रोषाचा सामाना करावा लागत आहे. (Kareena Kapoor Troll)

=============

हे देखील वाचा – काय सांगता! बिग बींची लाडकी नातं ‘या’ बॉलिवूड अभिनेत्याला करतेय डेट

=============

हिंदू सणासाठी जाहिरात करणाऱ्या करीनाला कपाळावर टिकली नसल्यामुळे लोकांनी तिच्या धर्माची आठवण करून दिली आहे. या जाहिरातीमुळे या ब्रँडचे मालक असणारे एमपी अहमग आणि करीना कपूर यांना मोठ्या प्रमाणावर टीकेला सामोरे जावे लागत आहे. लोकांनी #Boycott_MalabarGold, Boycott_MalabarGold और #No_Bindi_No_Business, असे हॅशटॅग वापरत मलबारमधून सोने न घेण्याचे आवाहन लोकांना केले आहे. एका युजरने कमेंट करताना लिहिले, “जो कोणी जबाबदार ज्वेलर आहे, ज्याने करीन कपूरसोबत ही जाहिरात प्रदर्शित केली आहे. त्यात तिने टिकली लावली नाहीये. करीनाला हिंदू संस्कृतीबद्दल पर्वा नाही का?” दुसऱ्याने लिहिले, “हिंदू सणाच्या निमित्ताने प्रदर्शित झालेल्या या जाहिरातीमध्ये टिकली न लावता करीना कशी काय दिसू शकते. टिकलीशिवाय हिंदू सण साजराच होऊ शकत नाही.” अजून एकाने लिहिले की, “आर्थिक फायद्यासाठी हिंदूंच्या सणांचा त्यांच्या परंपरांचा अनादर होत आहे.” आदी विविध प्रकारच्या कमेंट्समुळे सध्या करीना कपूर ट्रेंडिंगमध्ये आली आहे. अद्याप या जाहिरातीवर आणि ट्रोलिंगवर कंपनीकडून आणि करीना कडून कोणतेही वक्तव्य आले नाही. (Kareena Kapoor Troll)

करीना कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर ती लवकरच आमिर खानच्या ‘लालसिंग चड्ढा’मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आमिर आणि करीना या चित्रपटाच्या निमित्ताने दुसऱ्यांदा सोबत काम करणार आहे. याशिवाय ती सुजित सरकारच्या आणि एकता कपूरच्या एका चित्रपटात दिसणार असल्याचे बोलले जात आहे. (Kareena Kapoor Troll)


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.