व्हॉट्सअॅपचा वापर आता जगभरात मोठ्या प्रमाणात केला जातो. फोटो-व्हिडिओ शेअरिंग ते मेसेज आणि व्हिडिओ कॉल करणे ही याच्या माध्यमातून सोप्पे झाले आहे. अशातच आता व्हॉट्सअॅपवर आपल्याला कमर्शियल प्रमोशन करणारे मेसेज येतात. परंतु असे मेसेज आल्यानंतर त्यामधील किती खरे आणि बनावट आहेत हे सुद्धा आपण पाहत नाही व त्यात दिलेल्या लिंकवर अधिक माहितीसाठी क्किल करतो. अशातच काही वेळेस बहुतांश लोकांची फसवणूक झाल्याच्या घटना ही समोर आल्या आहेत. तर गेल्या काही काळापासून व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक करणाऱ्यांच्या घटना वाढल्या आहेत. (WhatsApp Spam Message)
भारतात नुकताच एक सर्वे करण्यात आला. त्यात व्हॉट्सअॅप युजर्सच्या नुसार, बहुतांश त्रास देणाऱ्या मेसेज मध्ये आर्थिक म्हणजेच फाइनान्स संबंधित सुविधांचे मेसेज येतात. या सर्वेतून असे समोर आले आहे की, युजर्सला व्हॉट्सअॅपवर येणारे मेसेज सर्विस, रियल एस्टेट, आरोग्य आणि पॅथोलॉजी, नोकरी किंवा पैसे कमावण्याचे मार्ग अशा पद्धतीचे असतात. सर्वेत सहभागी झालेल्या ७६ टक्के युजर्सचे असे म्हणणे आहे की, व्हॉट्सअॅप अकाउंटवर अशा प्रकारचे मेसेज येतात ज्यांच्याशी संपर्क फेसबुक, इंस्टाग्राम अथवा बिझनेस अकाउंटच्या माध्यमातून झालेला असतो. हा सर्वे Local Circles च्या द्वारे केला गेला आहे.
सर्वेतून असे समोर आले आहे की, २०२२ पासून अशा प्रकारच्या जाहीरात असलेले मेसेज वेगाने युजर्सला पाठवले जातात. याच्या माध्यमातून असे पाहिले गेले की, हे कमर्शियल मेसेज किती व्हॉट्सअॅप युजर्सला त्रास देतात. काही वेळेस याच्या माध्यमातून फसवणूक ही केली जाते.
सरकारला दिली गेली सुचना
सर्वेचा निकाल हा हैराण करणारा होता. कारण ९५ टक्के युजर्स असे होते की, ज्यांच्या व्हॉट्सअॅपवर जाहिरातीचे मेसेज येतात. याची माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणि सुचना प्रौद्योगिकी मंत्रालय म्हणजेच Metity आणि ट्राय या दोघांना दिली गेली आहे.
दरम्यान, युजर्सकडून तक्रारी येत आहेत. परंतु तरीही आता पर्यंत अशा कोणत्याही प्रकरणांवर कारवाई करण्यात आलेली नाही. या सर्वेमध्ये ४४ टक्के युजर्स टियर १, ३५ टक्के युजर्स टियर २, आणि टियर ३ शहर आणि ४ जिल्ह्यातील २१ टक्के युजर्सचा समावेश होता.(WhatsApp Spam Message)
हे देखील वाचा- Meta ची मोठी घोषणा, फेसबुक-इंस्टाग्राम सुद्धा ब्लू टीकसाठी शुल्क घेणार
TRAI ने तोडगा काढावा
EaseMy Trip चे को-फाउंडर रिकांत पिट्टी यांनी असे म्हटले आहे की, व्हॉट्सअॅप स्पॅमिंग एक गंभीर मुद्दा आहे. काळानुसार ही बाब वेगाने वाढत आहे. सरकार आणि व्हॉट्सअॅप दोघेही आपल्याकडून याच्या आव्हानावर तोगडा काढण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी पुढे असे म्हटले की, अशी अपेक्षा आहे टेलिकॉम आणि व्हॉट्सअॅपसह ट्राय लवकरच तोडगा काढेल.