डिसेंबरच (December) महिना लागला की सगळ्यांना वेध लागतात ते नवीन वर्षाचे आणि ख्रिसमसचे (Christmas). सर्वच ख्रिश्चन लोकांचा महत्वाचा आणि मोठा सण (Festival) म्हणून ख्रिसमस किंवा नाताळ या सणाला ओळखले जाते. २५ डिसेंबर (25th December) हा दिवस येशू ख्रिस्त (Yeshu Christ) यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो. उद्या २५ डिसेंबरला संपूर्ण जगभर ख्रिसमस साजरा होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज आपण या सणाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. (Christmas 2024)
ख्रिसमस हा सण प्रामुख्याने ख्रिश्चन धर्माचा (christian) असला तरी जवळपास सर्वच धर्माचे लोक हा सण मोठ्या जल्लोषात साजरा करतात. ख्रिसमस सण साजरा करण्याच्या प्रत्येकाच्या पद्धती वेगळ्या आहेत. ख्रिस्ती धर्माचे लोकं या दिवशी चर्चमध्ये (Church) जाऊन, घरी प्रार्थना (Prayer) करतात, मेणबत्त्या लावतात, केक कापतात अनेक प्रकारचे स्वादिष्ट व्यंजन घरी बनवले जाते.
ख्रिस्ति धर्माचे लोक या सणाची तयारी १० दिवस अगोदर पासूनच सुरु करतात, बाजारातून नवीन कपडे, नवीन वस्तू खरेदी तसेच आपल्या घरातील साफसफाई करणे, आणि गोड पदार्थ बनवण्यास सुरु करतात. २४ डिसेंबरच्या रात्रीपासून येशूची प्रार्थना करण्यास सुरवात केली जाते. २५ डिसेंबर ला येशूचा जन्म दिवस साजरा केला जातो.

जीझस ईश्वराचे पुत्र असल्याची श्रद्धा आहे. या दिवशी गिरिजाघरात प्रार्थना, कॅरॉल्सचे गायन करण्यात येते. ख्रिश्चन बांधव नाताळच्या आगमना अगोदर पासूनच प्रार्थना व कॅरॉल्सच्या गायनास सुरूवात करतात. शिवाय, नाताळच्या दिवशी सर्व ख्रिस्ति धर्माचे लोक नवीन कपडे घालून उत्साहाने चर्च मध्ये जातात, आणि या दिवशी सर्व ख्रिश्चन बांधव एक दुसऱ्याची गळा भेट घेऊन शुभेच्या देतात.
जवळच्या मित्र नातेवाईकांना या दिवशी घरी बोलवले जाते. या सणाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ख्रिसमस ट्री. (Christmas Tree) हा ख्रिसमस ट्री ऑफिसमध्ये, घरी आणला जातो, तो सजवला जातो. घराला रोषणाई केली जाते. पार्टी केली जाते. अशा पद्धतीने सामान्यपणे हा सण साजरा करतात.
ख्रिश्चन मान्यतेनुसार, प्रभु येशू ख्रिस्ताचा जन्म २५ डिसेंबर रोजी झाला होता. त्यामुळे हा दिवस ख्रिसमस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी मेरीच्या घरी येशू ख्रिस्ताचा जन्म झाला असे मानले जाते. प्राचीन आख्यायिकेनुसार, मरियमला एक स्वप्न पडले.
या स्वप्नात प्रभूचा पुत्र येशूला जन्म देण्याची भविष्यवाणी केली होती. या स्वप्नानंतर मेरी गर्भवती झाली आणि त्यांच्या गर्भधारणेदरम्यान बेथलेहेममध्ये राहावे लागले. एके दिवशी, जेव्हा रात्र मोठी झाली तेव्हा मेरीला राहण्यासाठी योग्य जागा दिसली नाही.

अशा परिस्थितीत त्यांना अशा ठिकाणी थांबावे लागले जेथे लोक पशुपालन करायचे. दुसऱ्याच दिवशी २५ डिसेंबरला मेरी यांनी प्रभु येशूला जन्म दिला. या कारणास्तव हा दिवस नाताळचा सण म्हणून साजरा केला जातो. असे म्हटले जाते की प्रभु येशू ख्रिस्तानेच ख्रिस्ती धर्माची स्थापना केली.
येशूच्या जन्मतिथीवरून अनेक मतमतांतरे आहेत. पण, रोमन साम्राज्याच्या दरम्यान कॉन्सटेंटाइनच्या काळात या तिथीला मान्यता मिळाली आणि तेव्हापासूनच २५ डिसेंबरला ख्रिसमस साजरा केला जातो. येशूचा जन्मदिवस जनतेपर्यंत पोहवणारी व्यक्ती होती सेक्स्तुस ज्यूलिअस अफ्रिकानुस. सेक्स्तुसने २२२ इ.मध्ये ख्रिस्ती इतिहासात या तिथीचा उल्लेख केला. याआधी ख्रिसमस साजरा करण्यासाठी कोणतीही तारीख वा दिवस निश्चित नव्हता.
येशूच्या जन्मस्थळापासून काही अंतरावर काही मेंढपाळ त्याच्या मेंढ्या चरण्यासाठी घेऊन गेले होते. असे सांगितले जाते की ईश्वर स्वतः देवदूताचे रूप धारण करून तिथे पोहचले आणि त्यांनी मेंढपाळांना या शहरात ‘एका देवदूताचा जन्म झाला आहे. तो स्वतः ईश्वर आहे.’ असा संदेश दिला.
त्या देवदूताच्या म्हणण्यावर विश्वास ठेवून मेंढपाळ त्या नवजात बाळाला पाहण्यासाठी पोहचले. बघता बघता येशूची किर्ती सगळीकडे पोहचली आणि येशू ख्रिस्तला पाहण्यासाठी लोकांची एकच झुंबड उडाली होती. ‘येशू परमेश्वराचा मुलगा आहे आणि लोकांच्या कल्याणासाठी तो पृथ्वीवर आला आहे.’ अशी लोकांची मान्यता होती.

नाताळ हा शब्द लॅटिन भाषेचा नातूय या शब्दापासून तयार झालेला असून,त्याच्या अर्थ जन्म असा होतो. इंग्रजी भाषेत त्याला ख्रिसमस असे म्हणतात. येशु ख्रिस्ताचा जन्म जगाचा इतिहासातील सर्वात मोठी ब्राह्मणडनीय घटना होती.
ख्रिसमस डे उत्सव मध्ये ख्रिसमस ट्रीला खूप महत्त्व असते, त्यामागे एक कथा सांगितली जाते, त्या दिवशी या झाडाची सजावट कशी सुरू झाली. ख्रिसमसच्या दिवशी सदाहरित वृक्ष सजवून उत्सव साजरा केला जातो, ही परंपरा जर्मनीपासून सुरू झाली, ज्यामध्ये एका आजारी मुलास संतुष्ट करण्यासाठी त्याच्या वडिलांनी सदाहरित वृक्ष सुंदरपणे तयार केला आणि त्याला एक भेट दिली.
याशिवाय असेही म्हटले जाते की, जेव्हा येशूचा जन्म झाला तेव्हा सर्व देवतांनी आनंद व्यक्त करण्यासाठी सदाहरित वृक्ष सजविला, तेव्हापासून हे झाड ख्रिसमसच्या झाडाचे प्रतीक मानले गेले आणि ही परंपरा लोकप्रिय झाली.
=======
हे देखील वाचा : Kashmir : काश्मीरच्या थंडीत कांगरीची गर्मी !
Coconut Oil : आणि खोबरेल तेलाचे कोडे सुटले !
=======
या दिवसात सांताक्लॉजचे (Santa Claus) महत्त्व वाढते. बरेच लोक सांता क्लॉजला येशू ख्रिस्ताचा पिता मानतात. तसेच, बर्याच कथांनुसार, चौथे शतकात तुर्कस्तानमधील एका शहरात बिशप सेंट निकोलस नावाची व्यक्ती असायची, ज्याच्या नंतर सांता क्लॉजची परंपरा सुरू झाली. हे संत गरीब मुलांना भेटवस्तू वाटप करत असत. मुलांमध्ये असा विश्वास आहे की सांता त्यांच्यासाठी भेटवस्तू, चॉकलेट आणि खेळणी वाटप करतो.
