भारतातील बहुतांश घरामध्ये खोबरेल तेल (Coconut Oil) हे असतेच. पण हे खोबरेल तेल केसांसाठी चांगले असते की खाण्यासाठी चांगले असते, याचा कधी विचार केला आहे का? पण हा प्रश्न सुप्रिम कोर्टात विचारला गेला होता. या संदर्भात गेल्या 20 वर्षापासून वाद सुरु होता. हा वाद आता सुप्रीम कोर्टानं सोडवला असून त्यावर आपला निर्णय दिला आहे. या सर्वात चर्चित वादांवर सुप्रीम कोर्टानं दिलेल्या उत्तराची आता चर्चा होत आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार कुठले खोबरेल तेल खाण्यायोग्य आहे की केसांसाठी हे त्याच्या ब्रँडिंगवर अवलंबून असेल. लहान पॅकेटमध्ये विकले जाणारे खोबरेल तेल खाद्यतेल मानले जाईल. अन्न सुरक्षा नियम आणि औषधे आणि सौंदर्य प्रसाधने कायद्याच्या आधारे हा निर्णय देण्यात आला आहे. (Coconut Oil)
सुप्रीम कोर्टात गेल्या 20 वर्षापासून सुरु असलेला एक वाद निकाली निघाला आहे. हा वाद खोबरेल तेलाबाबत होता. खोबरेल तेल केसांसाठी चांगले आहे की खाण्यासाठी हा प्रश्न सुप्रीम कोर्टापर्यंत (Supreme Court) पोहचला होता. यात तेलावरील उत्पादन शुल्काचाही प्रश्न अवलंबून होता. या सर्वांबाबत विचार करुन सुप्रीम कोर्टाने खोबरेल तेलावरील उत्पादन शुल्काबाबतचा 20 वर्षे जुना वाद मिटवला आहे. सरन्यायाधीशांसह तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने याबाबत निर्णय दिला आहे. सरन्यायाधीश संजीव खन्ना, न्यायमूर्ती संजय कुमार आणि न्यायमूर्ती आर. महादेवन यांच्या खंडपीठाने यावर सविस्तर निकाल दिला आहे. त्यानुसार जर नारळाचे तेल खाद्यतेल म्हणून विकले जात असेल आणि अन्न सुरक्षा नियमांचे पालन केले असेल तर ते खाद्यतेल म्हणून यापुढे मानण्यात येणार आहे. मात्र हे नारळाचे तेल औषध आणि सौंदर्य प्रसाधने कायद्याच्या नियमांचे पालन केल्यास ते केसांचे तेल मानले जाणार आहे. गेल्या 20 वर्षापासून हे प्रकरण सुप्रीम कोर्टात होते. (Marathi News)
कारण यामागे 160 कोटी रुपयांचे उत्पादन शुल्क, दंड आणि व्याजासह अंदाजे होते. शुद्ध खोबरेल तेल नेहमीच केसांचे तेल म्हणून वर्गीकृत केले पाहिजे, असा युक्तिवाद महसूल विभागाने केला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावत खोबरेल तेल लहान डब्यात विकले जाते, याचा अर्थ ते केसांचे तेल आहे असे होत नाही, असे स्पष्ट तेले होते. तेल खरेदी करण्याची कारण वेगवेगळी असतात. तसेच ते किती खरेदी करावे याचीही कारणे वेगळी असतात. यामागे आर्थिक कारण असेत, असे न्यायालयानं आपल्या निकालात सांगितले आहे. न्यायमूर्ती संजय कुमार यांनी निकाल देतांना, शुद्ध खोबरेल तेल नेहमीच केसांचे तेल म्हणून वर्गीकृत केले पाहिजे हा महसूल विभागाचा युक्तिवाद फेटाळला आहे. सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की तेलाचे वर्गीकरण करण्यासाठी पॅकेजिंगच्या आकारापेक्षा काहीतरी अधिक असणे आवश्यक आहे. यापूर्वी या प्रकरणात तत्कालीन सरन्यायाधीश गोगोई आणि न्यायमूर्ती आर. भानुमती यांच्या खंडपीठाने वेगवेगळी मते नोंदवली होती. लहान पॅकेटमध्ये विकले जाणारे खोबरेल तेल हे खाद्यतेल आहे, असे न्यायमूर्ती गोगोई यांचे मत होते, तर न्यायमूर्ती भानुमती यांचे मत होते की ते केसांचे तेल आहे. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाच्या या नव्या निर्णयामुळे खोबरेल तेलाच्या वर्गीकरणाबाबत सुरू असलेला वाद संपुष्टात आला आहे. (Coconut Oil)
==============
हे देखील वाचा : हिवाळ्यात गुळाचा चहा प्या आणि आजारांना लांब ठेवा
हिवाळ्यात ‘हे’ उपाय करून ओठांना ठेवा मुलायम
===============
एकूण भारतामध्ये नारळाच्या तेलाचा वापर केसांसाठी जेवढा होतो तेवढाच ते रोजच्या जेवणासाठीही होतो. विशेषतः तळणीच्या पदार्थांसाठी मोठया प्रमाणत नारळाच्या तेलाचा वापर होतो. केरळ सारख्या राज्यात नारळाच्या तेलात तयार झालेल्या केळ्याच्या वेफर्सना परदेशातही मोठी मागणी असते. याशिवाय केरळ, तामिळनाडू, कर्नाटक सारख्या राज्यात नारळाच्या तेलाचा फोडणीसाठी वापर करण्यात येतो. नारळाच्या तेलामध्ये फॅटी ऍसिड असेत. यामुळे मेंदू आणि हृदय चांगले रहाते, असे तज्ञ सांगतात. याशिवाय कॅप्रिक ऍसिड, लॉरिक ऍसिड आणि कॅप्रिलिक ऍसिडही नारळाच्या तेलात असते. यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत मिळते, अशी माहिती आहे. यासोबत नारळाच्या तेलाचा मॉइश्चरायझर म्हणून वापर होतो. केरळमध्ये नारळाचे सर्वाधिक उत्पादन होते, त्यामुळे तिथे नारळाच्या तेलाचा जेवणातही वापर होतो. (Marathi News)
सई बने