नुकतच मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर आणि सुपरस्टार रजनीकांत यांचा एक फोटो प्रचंड व्हायरल होताना दिसला. मध्यंतरी रजनीकांत यांनी मराठी मुव्हीमध्ये काम करण्याची इच्छा बोलून दाखवली होती. त्यामुळे आता मुळचे मराठी असलेले रजनीसर मराठी मुव्हीमध्ये झळकणार, अशा चर्चा सोशल मीडियावर व्हायला लागल्या होत्या. पण मराठी पिच्चर… आणि रजनीकांत हा मेळ कधीच जुळून येणार नाही. मग हा फोटो नेमका कुठला होता, तर हा फोटो होता, Waves Summit चा… आता Waves Summit काय हा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. तर WAVEs म्हणजे World Audio Visual & Entertainment Summit… ही पहिलीच जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन परिषद आहे, जी विशेषत: आपल्या भारतात भरली आहे. पण ही परिषद काय आहे ? हिचे फायदे काय आहेत आणि या परिषदेला कोणकोणते दिग्गज आले होते, चला पाहु. (Waves Summit 2025)
हे Waves summit १ ते ४ मे दरम्यान मुंबईतल्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये भरलेलं आहे. आता याचा मूळ उद्देश काय… तर ‘कनेक्टिंग क्रिएटर्स, कनेक्टिंग कंट्रीज’ ! वर्ल्ड सिनेमामधल्या क्रिएटर्सनी एकत्र येऊन काहीतरी युनिक आयडियाज घडवाव्या, ज्याचा फायदा भविष्यातल्या क्रीएटर्स आणि फिल्ममेकर्सना व्हावा. विशेष म्हणजे या भल्या मोठ्या Summit च होस्टिंग आपल्या महाराष्ट्र शासनाला मिळालं आहे. एकंदरीत तुम्हाला कळलंच असेल की एन्टरटेनमेंट इंडस्ट्रीसाठी Waves Summit अतिशय महत्त्वाची आहे. कारण यामध्ये तब्बल ९० देश सहभागी झाले आहेत. यासोबत जगभरातले कलाकार, स्टार्टअप, उद्योजक यांच्यासह बिजनेसमन यांचा सहभाग होता. पहिल्याच दिवसापासून या Summit ची चर्चा जगभर चर्चा होत आहे. (Waves Summit 2025)
या Waves Summit चं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. कंटेंट, क्रीएटीव्हीटी आणि कल्चर या एन्टरटेनमेंटमधल्या तीन गोष्टींमुळे भारताची इकोनॉमी बुस्ट होत आहे, असं त्यांनी सांगितलं. या Summit मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भाषण केलं. मुख्यमंत्र्यांसोबत राज्यपाल सीपी राधाकृष्णन, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार असे राजकीय नेते आणि मंत्री या Summit ला उपस्थित होते. पण सगळ्यांच्या नजर खिळल्या होत्या. भारताच्या वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमधून आलेल्या सिनेस्टार्स वर .. (Waves Summit 2025)
यामध्ये बॉलीवूडमधून शाहरुख खान, आमीर खान, अक्षय कुमार, करण जोहर, ऐश्वर्या राय, हेमा मालिनी, रणबीर कपूर, अनिल कपूर, सैफ अली खान , विकी कौशल, दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, आलिया भट, रितेश देशमुख, शाहीद कपूर… तर तेलुगु इंडस्ट्रीमधून एस एस राजामौली, चिरंजीवी, नागार्जुन, अल्लू अर्जुन, नानी, विजय देवरकोंडा… तमिळमधून रजनीकांत, ए आर रहमान… मल्याळममधून मोहनलाल असे अनेक दिग्गज या Summit मध्ये उपस्थित होते. यावेळी स्टेजवर इंडियन फिल्म इंडस्ट्रीबद्दल त्यांनी आपापले विचार मांडले.(Waves Summit 2025)
=================
हे देखील वाचा : WAVES : वेव्हज समिट : ‘पुष्पा 2’ सिनेमाने बदललं अल्लू अर्जुनचं आयुष्य
=================
इतके सगळे सेलेब्रिटीज जमले तरी हा केवळ सेलिब्रिटी कार्यक्रम नाहीये, तर भारताच्या तरुण पिढीला मिडीया आणि एन्टरटेनमेंट क्षेत्रात प्रगती करण्याच्या दिशेने घेऊन जाणारा एक महत्त्वाचा उपक्रमच आहे. Waves Summit मध्ये मध्ये ब्रॉडकास्टिंग, इन्फोटेन्मेंट ,Animation, VFX, Gaming, Comics आणि डिजिटल मीडिया यांसारख्या विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यामुळे इन्स्टाग्राम, युट्युब पासून अनेक सोशल मिडीया platformsचे CEO सुद्धा या Summit मध्ये आले होते. भारतात वर्षाला जवळपास २००० चित्रपट रिलीज होतात. म्हणजे या तुलनेत एका दिवसाला ५ मुव्ही रिलीज होतात असच समजा. यावरून कळत की सिनेमा हा विषय इंडियन इकोनॉमीला बुस्ट करण्यासाठी किती महत्त्वाची आहे. आणि सध्या भारताचे सिनेमे परदेशी लोकांनाही आवडायला लागले आहेत. त्यामुळे एकंदरीत भारतीय सिनेमाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतच चालली आहे आणि त्यासाठी Waves सारख्या Summit होण तितकच गरजेचं आहे.