Home » अरे बापरे! अमेरिकेला हे काय मिळालं…

अरे बापरे! अमेरिकेला हे काय मिळालं…

by Team Gajawaja
0 comment
America
Share

अमेरिकेमध्ये (America) परग्रहावरील युएफओचे अवशेष आहेत. फक्त युएफओच नाहीत तर त्यातील पायलटचे मृतदेहही अमेरिकेतील प्रयोगशाळेत असून त्या मृतदेहांचा अभ्यास करण्यात येत आहे. यावरुन परग्रहावरील जीव कसे आहेत, याचेही परिक्षण सुरु आहे. ही सगळी माहिती अमेरिकेतील एका न्यूज चॅनलवर देण्यात आली. अमेरिकेच्या (America) वायुसेनेत काम केलेले पायलट आणि गुप्तचर अधिकारी डेव्डिड चार्ल्स ग्रुश यांची मुलाखत न्यूज चॅनेलवर झाली. त्यावेळी ग्रुश यांनी आपण स्वतः अशी युएफओ पाहिल्याचा दावा केला आहे. शिवाय या युएफओला अमेरिकेच्या वायुसेनेमार्फत पाडण्यात आले आहे. त्यातील परजीवांचा यात मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह आता अमेरिकेच्या प्रयोगशाळेत आहेत. ग्रुश यांच्या या दाव्यानं अमेरिकेत खळबळ उडाली आहे. डेव्डिड चार्ल्स ग्रुश यांनी स्वतः गुप्तहेर म्हणून अनेक वर्ष काम केले आहे. त्यामुळे त्यांचा हा युएफओ बाबतचा दावा खरा असल्याचे मत अनेक प्रेक्षकांनी व्यक्त केले आहे. अमेरिकेवर काही वर्ष परग्रहवासीयांची नजर असून येथील निवडक क्षेत्रात युएफओचा वावर असल्याचा दावा अमेरिकेतील काही व्यक्ती करीत आहेत. ग्रुश यांच्या दाव्यामुळे त्याला अधिक बळ आले आहे.  

अमेरिकेच्या (America) वायुसेनेत काम केलेले पायलट आणि  गुप्तचर अधिकारी डेव्डिड चार्ल्स ग्रुश यांनी पृथ्वीच्या बाहेर जीवन असल्याचा दावा केला आहे. पृथ्वीशिवाय अन्य ग्रहावर असलेल्या या जीवसृष्टीची माहिती अमेरिकन गुप्तचर संस्थांकडे असून त्यावर संशोधन सुरु आहे. डेव्हिड चार्ल्स ग्रुश यांनी फक्त हीच माहिती दिली नाही तर अमेरिकन (America) गुप्तचर विभागाकडे फ्लाइंग सॉसर म्हणजेच युएफओच्या पायलटचे मृतदेह आणि या युएफओचे तुटलेले भागही आहेत. या सर्वावर व्यापक संशोधन चालू आहे. ही परग्रहावरील विमाने नेमकी कोणत्या धातूपासून बनवली आहेत, याचा शोध घेण्यात येत आहे. शिवाय या धातूचा पुन्हा वापर करता येणं शक्य आहे का? याचाही तपास करण्यात येत आहे. ग्रुश यांच्या मते, अमेरिकन (America) शास्त्रज्ञांना रिव्हर्स इंजिनीअरिंगद्वारे या युएफओपासून शस्त्रेही तयार करायची आहेत. भविष्यात होणा-या परग्रहावरील आक्रमणापासून बचाव करण्यासाठी या शस्त्रांचा वापर करण्यात येणार असल्याची माहितीही ग्रुश यांनी दिली.  

ही सर्व खळबळजनक माहिती देणारे डेव्हिड चार्ल्स ग्रुश हे अमेरिकन हवाई दलात पायलट राहिले आहेत. ग्रुशने पेंटागॉनच्या सिक्रेट युनिटमध्ये गुप्तचर अधिकारी म्हणूनही काम केले होते. पेंटागॉन हे अमेरिकेच्या संरक्षण दलाचे मुख्य केंद्र मानले जाते. गेली अनेक वर्ष पेंटागॉनच्या तळघरात युएफओ आणि परग्रहावरील जीव असल्याचा दावा अनेकांनी केला आहे. परग्रहावरील जीवांच्या डिएनएवर येथे संशोधन होत असल्याचा दावाही करण्यात आला होता. मात्र त्या फक्त उडत्या बातम्या आहेत, असे सांगून हा दावा फेटाळण्यात आल्या आहे.   पण या सर्वांवर ग्रुश यांच्या दाव्यानं शिक्का मारला असल्याची चर्चा आता होत आहे.  

अनआयडेंटिफाइड फ्लाइंग ऑब्जेक्ट्स म्हणजेच युएफओ बाबत अमेरिका आणि अन्य युरोपिय देशात बरीच उत्सुकता आहे. गेली अनेक वर्ष या युएफओच्या कथा सांगितल्या जातात. काहींच्या मते, आर्टीकामध्ये युएफओ कायम ये-जा करतात. तर कैलास पर्वतावर असेच युएफओ  अनेकवेळा पाहिल्याचा दावाही करण्यात आला आहे. एकूण या युएफओ आणि परग्रहावरील जीवांबाबत खूप उत्सुकता आहे. मात्र या युएफओबाबत अनेक गुढ गोष्टीच जास्ती चर्चिल्या गेल्या आहेत. आता त्या सर्वात ग्रुश यांच्या वक्तव्यानं भर पडली आहे. ग्रश यांच्या दाव्याबाबत अनेकांना सत्यता वाटत आहे. स्वतः ग्रुश अमेरिकन हवाई दलात पायलट राहिले आहेत. नंतर त्यांनी युएफओ विभागात गुप्तचर अधिकारी म्हणूनही काम केले आहे. त्यांनी ही गुपिते अमेरिकेनं जगासमोर आणावी अशी, जाहीर मागणी करुन युएफओ संदर्भात आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे.  

========

हे देखील वाचा : अजमेर 92 अडकला वादाच्या भोव-यात

========

ग्रुश यांनी या युएफओसंदर्भात सांगितले आहे की, अमेरिकेनं (America) पाडलेल्या युएफओमध्ये एलियन होते.  त्या हल्यात त्यांचाही मृत्यू झाला.  आता अमेरिका (America) आणि त्यांच्यासोबत त्यांचे काही मित्र देश या युएफओच्या तुटलेल्या सांगाड्यातून नवीन शस्त्रास्त्रे बनवण्याचा प्रयत्न करीत आहेत.  यासाठी रिव्हर्स इंजिनीअरिंगची मदत घेतली जात आहे.  ग्रुश यांनी अमेरिकेच्या युएफओ संशोधनाची आणखीही माहिती दिली आहे.  यासंदर्भात पेंटागॉनची एक स्वतंत्र कमिटी असून हे सदस्य समुद्राच्या खूप खोल भागातही संशोधन करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.  ग्रुश यांच्या या मुलाखतमुळे पुन्हा एकदा अमेरिकेमध्ये युएफओ आणि एलियन यांची चर्चा सुरु झाली आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.