Home » घरी ‘हे’ व्यायाम करा आणि पोटाचा घेर करा कमी

घरी ‘हे’ व्यायाम करा आणि पोटाचा घेर करा कमी

by Jyotsna Kulkarni
0 comment
Exercise For Belly Fat
Share

आजच्या काळात वजन वाढणे ही खूपच मोठी आणि अतिशय सामान्य तक्रार होत आहे. या वजन वाढीमागे अनेक कारणं असतात. बैठे काम, प्रेग्नन्सीनंतर वाढणारे वजन, फास्ट फूड खाल्ल्यामुळे वाढलेले वजन आदी अनेक कारणांचा यात समावेश आहे. वजन ज्या वेगाने आणि ज्या पटीने वाढते ते कमी करणे तेवढेच अवघड आणि त्रासदायक असते. यातच नुसते वाढणारे पोट तर मोठी डोकेदुखी ठरते, या पोटाच्या वाढलेल्या घेरामुळे त्याचे वेगळेच परिणाम होतात.

मात्र असे असले तरी वजन कमी करणे देखील आवश्यक आहे. यासाठी खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवण्यासोबतच योग्य डाएट आणि व्यायाम देखील जोडीला केलाच पाहिजे. कारण या सर्व गोष्टी एकत्र केल्यामुळेच हे वाढलेले वजन कमी होण्यास लवकर सुरुवात होईन आणि तुम्हाला त्याचा परिणाम जाणवेल. मात्र व्यायाम कोणते आणि कसे करावे आता हा प्रश्न आहेच. यासाठीच आज आम्ही तुम्हाला पोटाचा घेर लवकर कमी करण्यासाठी काही घरात करता येणारे व्यायाम सांगणार आहोत. हे व्यायाम तुम्ही घरी करून त्याचा परिणाम अनुभवू शकतात.

कार्डिओ व्यायाम
पोटाची चरबी कमी करण्यासाठी व्यायाम करण्यापूर्वी कार्डिओ व्यायाम करणे आवश्यक आहे. कार्डिओ व्यायामासाठी चालणे, जॉगिंग, पोहणे, सायकलिंग करू शकता. याचा थेट परिणाम शरीरातील चरबीवर होतो आणि ते कमी होण्यास मदत होते. यासोबतच बेली फॅटचे स्नायूही कमकुवत होतात. जे कमी करणे सोपे करते.

Exercise For Belly Fat

लेग रेझ
लेग रेझ व्यायाम हा फ्लोअर एक्सरसाइज आहे, जे घरात कुठेही अगदी कोणत्याही कोपऱ्यात अगदी सहज करता येते. हे करण्यासाठी फक्त तुमच्या पाठीवर झोपा आणि तुमचे दोन्ही पाय हवेत वर उचला आणि त्यांना छातीवर आणण्याचा प्रयत्न करा. नंतर पाय खाली करा आणि ६० अंशांवर थांबा. पाय जमिनीला टेकणार नाहीत याची काळजी घ्या. ६० अंशाच्या कोनानंतर पाय पुन्हा वर घ्या. दररोज १५-१५ चे सुमारे ३ सेट केल्याने पोटाची चरबी झपाट्याने कमी होऊ लागते.

व्ही सिटअप्स किंवा नौकासन
नौकासन आणि व्ही सिटअप्स हे समान व्यायाम आहेत. यामध्ये पाय आणि कंबर अशा प्रकारे वाकलेली असते की शरीर V चा आकार घेतो. हा व्यायाम दररोज ३ च्या सेटमध्ये केल्याने बेली फॅटचे मसल्स बर्न होण्यास मदत होते.

साईड टू साईड मेडिसिन बॉल स्लॅम
या व्यायामामध्ये हॅमस्ट्रिंग, क्वार्ड्रिसेप्स, बायसेप्स आणि खांदे टारगेट होतात. साईड टू साईड मेडिसिन बॉल स्लॅममुळे पोटाची चरबी त्वरीत कमी व्हायला मदत मिळते. तुम्ही एक मोठा बॉल हातात घ्या आणि खांदे सरळ ठेवत बॉल वरच्या दिशेने हातात घ्या. त्यानंतर उजव्या बाजूला बॉल खाली आपटा आणि वर आल्यावर परत वळून डाव्या बाजूला अशीच प्रक्रिया करा. असे तुम्ही १० ते २० सेट्स करा. यामुळे कंबर आणि पोटावर ताण येतो आणि चरबी कमी होण्यास मदत मिळते.

======

हे देखील वाचा : तणावमुक्त होण्यासाठी करा ‘ही’ योगासने

======

बर्पीज
हा व्यायम तुमच्या कोरसह तुमची छाती, खांदे, लॅट्स, ट्रायसेप्स आणि क्वाड्स मजबूत करण्यास उपयुक्त ठरतो. बर्पीज केल्याने तुमच्या हृदयाचे ठोके वाढतात कारण यामध्ये विस्फोटक प्लायोमॅट्रिक प्रकिया समाविष्ट असते. आपले पाय खांद्याच्या रूंदीनुसार पसरवा आणि हवेत हातावर आडवे व्हा आणि त्यानंतर आपले शरीर खाली कुल्ल्यांच्या दिशेने वर घ्या. त्यानंतर पाय वर घेत उडी मारा आणि पुन्हा पहिल्या अवस्थेत या याला बर्पीज म्हणतात. हातावर जोर देत तुम्ही ही उडी मारावी आणि पुन्हा खाली यावे. हे करताना तुमचे वजन हातावर आणि गुडघ्यावर येते. आपले खांदे वर उचलून हवेत उडी मारणे गरजेचे आहे. यामुळे पोटावर जोर येऊन पोटाची चरबी लवकर कमी होण्यास मदत मिळते.

हाय नीज
हा देखील एक कार्डिओ व्यायामाचा प्रकार आहे, जो फास्ट केला जातो. हे आपले पाय आणि कोर मजबूत करते. हा व्यायाम करण्यासाठी तुम्हाला एका जागी उभे राहून तुमचे पाय जमिनीवरून उचलावे लागतील आणि ते वेगाने बदलावे लागतील.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.