दिवाळी सणाची प्रत्येकाला उत्सुकता असते. या उत्साही वातावरणात तुमच्या राशींसाठी ग्रहमान कसं असेल, याबद्दल जाणून घेऊया (Weekly Horoscope 17 Oct to 23 Oct)

मेष – आपल्या राशीच्या पराक्रमस्थानातून राशी स्वामी मंगळाचे चंद्राबरोबर भ्रमण होत आहे. भावंडांचे सहकार्य लाभेल. भावंडांना संबंधी सुवार्ता कानी येतील. धाडसी निर्णय घेतले जातील. रेंगाळलेली कामे मोठ्या हिमतीने यशस्वीपणे पार पाडाल. प्रवासातून लाभ होतील. आपल्या मनाप्रमाणे घटना घडल्यामुळे आपण अतिशय आनंदी आणि उत्साही राहाल. आप्तस्वकियांच्या गाठीभेटी होतील.गृहउद्योगातून नवीन कार्यारंभ होतील. कुटुंबात शुभसमारंभाचे आयोजन केले जाईल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षातून यश लाभेल. मित्र परिवाराचे सहकार्य लाभेल. करमणुकीच्या कार्यक्रमातून आनंद मिळवाल. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखून काम केल्यामुळे एखादी सवलत मिळवता येईल. आठवड्याच्या उत्तरार्धात प्रकृतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. महत्त्वाच्या कागदपत्रांवर सह्या करण्यापूर्वी योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या.
शुभ दिनांक – 18, 19.

वृषभ – धनस्थानातील व्ययेश मंगळावरून चंद्राचे भ्रमण होत आहे. दिवाळीनिमित्त इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची खरेदी केली जाईल. घरात अत्याधुनिक सुख सुविधा केल्या जातील. आपल्या मतांचा कुटुंबात आदर होईल. दैनंदिन जीवनातून विरंगुळा मिळण्याच्या दृष्टीने एखाद्या सहलीत सहभागी व्हाल. भावंड सौख्य लाभेल. महत्त्वाची कागदपत्रे हाती लागतील. कुटुंबात पाहुण्यांची वर्दळ राहील. मातृसौख्य लाभेल. भूमी, भवन, वाहन यांच्या खरेदीचे योग येतील. सांस्कृतिक कार्यक्रमात सक्रिय सहभाग घ्याल. वैयक्तिक उत्कर्षाच्या दृष्टीने या आठवड्यातील ग्रहमान अनुकूल राहील. मित्र परिवाराचे चांगले सहकार्य लाभेल. आपल्याला मोहात पडणाऱ्या अनेक गोष्टी आजूबाजूला घडणार आहेत, त्यापासून मात्र सावधगिरी बाळगा. हाती घेतलेले काम पूर्णत्वास जाण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल पण यश नक्की लाभेल.
शुभ दिनांक -22, 23.

मिथुन – आठवड्याच्या सुरुवातीला आपल्याच राशीतून मंगळावरून चंद्राचे भ्रमण होत आहे. धाडसी निर्णय घेतली जातील. आपल्या मतांचा आदर केला जाईल. कुटुंबात शुभ समारंभाचे आयोजन केले जाईल. घरात सतत पाहुण्यांची वर्दळ राहील. त्यामुळे घरातील वातावरण अतिशय आनंदी आणि उत्साही राहणार आहे. हाती पैसा आल्यामुळे आर्थिक कोंडी जाणवणार नाही. आपली जिद्द महत्त्वाकांक्षा यांच्या जोरावर मोठी कामे करण्यात यश लाभेल. कामानिमित्त प्रवास घडतील. भावंडांची सुसंवाद साधाल. प्रवासातून कार्यसिद्धी होईल. महत्त्वाच्या कागदपत्रे हाती लागतील. सामाजिक संपर्क वाढतील. आठवड्याच्या उत्तरार्धात गृह सुशोभीकरणासाठी खरेदी कराल. राशीतील मंगळ व सुखस्थानातील बुध आपले जीवन आनंदी व यशस्वी करणारे राहतील. लघु उद्योगातून चांगला फायदा होईल. 18 आणि 19 हे दिवस आपल्यासाठी अनुकूल राहतील.
शुभ दिनांक -18, 19.

कर्क – आपल्या राशीच्या व्ययस्थानातून दोन मंगळाचे आणि चंद्राचे भ्रमण होत आहे. समोर आलेल्या संकटांना मोठ्या धैर्याने मात कराल. आता स्वकीयांचे सहकार्य लाभेल. भविष्यकाळच्या दृष्टीनेे गुंतवणूक करत असाल तर दहा वेळा विचार करावा. योग्य ठिकाणी आपला पैसा गुंतवला जाईल याची खात्री करून घ्यावी. आपल्या कर्तृत्वाला चांगली झळाली मिळेल. आत्मविश्वास वाढेल. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून लाभ होतील. भागीदारी व्यवसायातून नवीन प्रकल्प राबवले जातील.नवीन व्यावसायिक संधी उपलब्ध होतील. भागीदाराचे चांगले सहकार्य लाभेल.ओळखीतून अथवा मध्यस्थीतून रेंगाळलेली कामे मार्गी लावता येतील. लेखकांच्या हातून दर्जेदार लिखाण होऊन प्रसिद्धी लाभेल. कौटुंबिक शुभ घटना घडल्यामुळे मिष्टान्न भोजनाचे योग येतील. आठवड्याच्या उत्तरार्धात कामानिमित्त प्रवास घडतील.
शुभ दिनांक – 20, 21.

सिंह – आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या लाभस्थानातून चंद्राचे प्रमाण होत आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून तसेच शेअर्स मधून लाभ होतील. अनपेक्षित धनप्राप्ती होईल. इच्छापूर्ती होणाऱ्या घटना घडतील. सरकार दरबारी रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. स्थावर मालमत्ते संबंधी रेंगाळलेले प्रश्न सुटतील. मंगळावरून चंद्राचे भ्रमण होत असल्यामुळे धाडसी निर्णय यशस्वीपणे घेतले जातील. महत्त्वाच्या कागदपत्रांवर सह्या करण्यापूर्वी तज्ज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन घ्यावे. प्रकृतीच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका. उत्तरार्धात शुभ समारंभात सहभागी व्हाल. कुटुंबातील व्यक्तीसंबंधी शुभ वार्ता कानी येईल.
शुभ दिनांक -22, 23.

कन्या – कर्मस्थानातून मंगळावरून होणारे चंद्राचे भ्रमण तरुणांना नोकरीच्या सुसंधी देणारे राहील. आपल्या कार्यक्षेत्रात उत्कर्ष झाल्यामुळे आर्थिक लाभ होतील. नवीन जबाबदाऱ्या स्वीकारल. वरिष्ठांची मर्जीी संपादन कराल. जुनी व्यावसायिक येणी वसूल होतील. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. संततीकडून अपेक्षा पूर्ण होतील. अंगभूत कलागुणांना वाव मिळेल. कलाकारांच्या कलेला चाहतांकडून चांगली दाद मिळेल. राशीतीलशुभ बुधामुळे आठवड्याच्या उत्तरार्धात आपल्या संभाषण चातुर्यामुळे अनेक संधी उपलब्ध करून घ्याल.
शुभ दिनांक -18, 19, 23.

तूळ – धनस्थानाच्या अधिपती मंगळाचे प्रमाण भाग्यस्थानातून होत आहे. नोकरी व्यवसायात बढती बदलीचे योग संभवतात. राशीतील रवी, शुक्र, केतूमुळे आपले निर्णय चुकण्याची शक्यता राहते, तूर्तास महत्त्वाचे निर्णय टाळावे. मित्र परिवाराकडून मिळालेल्या एखादा सल्ला योग्य असेलच असे नाही. गुंतवणूक करताना योग्य ठिकाणी होत आहे याची खात्री करून मगच गुंतवणूक करावी. कोर्ट कचेरीच्या अथवा स्थावरच्या कामातून त्रास संभवतो. कुटुंबात बोललेला एखादा शब्द आपल्या कुटुंबीयांची मानसिकता बिघडवण्यास कारणीभूत ठरू शकतो तेव्हा आपली मते कुटुंबीयांवर लागू नका. सामाजिक कार्यात विशेष सहभाग घ्याल. समाजात आपल्याला मानमरातब मिळेल. राजकारणी व्यक्तींकडून समाज उपयोगी कामे केली जातील. विद्यार्थ्यांना मात्र आठवडा विद्याभ्यासात यश देणारा राहील.
शुभ दिनांक – 19, 20.

वृश्चिक – राशी स्वामी मंगळाचे आपल्या राशीच्या अष्टमस्थानातून भ्रमण होत आहे. प्रवासात आपले खिसा पाकिट सांभाळावे. प्रकृतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. संयम, सबुरी आणि सहनशीलता हे गुण अंगी बाणवण्याची नितांत गरज आहे. म्हणजे आपले कोणतेही निर्णय चुकणार नाहीत आणि त्याचा भविष्यात त्रास होणार नाही. या गुणांमुळे दिवाळीच्या काळात घरातील वातावरण आनंदी राहण्यास मदत होईल. आपल्या भाग्योदयाच्या दृष्टीने उत्तरार्धात ग्रहमान अनुकूल राहील. नोकरी व्यवसायात मात्र तूर्तास बदल करू नयेत. विविध व्यावसायिक उपक्रम यशस्वीपणे राबविता येतील. धार्मिक स्थळांना भेटी देण्याचे योग येतील. अध्यात्मिक प्रगती साधता येईल. संत सज्जनांचा सहवास लाभेल. आठव्याच्या उत्तरार्धात मित्र परिवारांचे सहकार्य लाभेल. करमणुकीच्या कार्यक्रमातून वेळ मजेत जाईल. आपल्या वक्तृत्वाच्या जोरावर मोठी मजल माराल. महत्त्वाची कागदपत्रे हाती लागतील.
शुभ दिनांक – 22, 23.

धनु – आपल्या राशीच्या सप्तमास्थानातील मंगळावरून चंद्राचे होणारे भ्रमण आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणारे राहील. जोडीदाराचे चांगले सहकार्य लाभेल. नात्यात गोडवा निर्माण झाल्यामुळे कुटुंबातील वातावरण अतिशय उत्साही राहणार आहे. नवीन गाठीभेटी, ओळखी होतील. त्यामुळे प्रगतीचे मार्ग खुले होतील. दिवाळीच्या शुभ काळात व प्रसन्न वातावरणात मौल्यवान वस्तूंची खरेदी केली जाईल. या काळात खूप दगदग, धावपळ होणार आहे, तेव्हा प्रकृतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. प्रवासात आपले खिसा पाकीट सांभाळावे. उत्तरार्धात सहलीचे आयोजन केले जाईल. तरुणांना नोकरीच्या चांगल्या संधी चालून येतील. वरिष्ठांची मर्जी संपादन केल्यामुळे आपल्यावर जबाबदारी सोपविण्यात येईल. सरकार दरबारी रेंगाळलेली कामे हळू हळू मार्गी लागतील. आठवड्या आपल्यासाठी अनपेक्षित यश प्राप्ती करून देणारा राहील.
शुभ दिनांक – 17, 18.

मकर – आपल्या राशीतून शनि तर लाभेश मंगळाचे षष्ठस्थानातून भ्रमण होत आहे. तर षष्ठस्थानातूनच सप्तमेश चंद्राचे भ्रमण होत आहे.नोकरीत चांगल्या संधींचा लाभ घेतल्यामुळे आपला फायदा होईल. नशिबाची चांगली साथ आपणास लाभणार आहे. जोडीदाराचे चांगले सहकार्य लाभेल. मोठी खरेदी कराल. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. व्यवहारात भरपूर नफा झाल्यामुळे उत्पन्न वाढणार आहे. भागीदारी व्यवसायातून नवीन उपक्रम राबवले जातील. हितशत्रूंच्या कारवायांना बळी पडू नका. महत्त्वाचे निर्णय घेताना सद् सद् विवेक बुद्धी जागृत ठेवा. अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नका. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांनी तुर्तास थांबावे. कोणतेही प्रश्न सामंजस्याने सोडवण्यातच हीत राहील. दिवाळीनिमित्त मोठी खरेदी कराल. मानसिक ताण-तणाव दूर होतील. मनस्वास्थ्य लाभेल. प्रियाजनांच्या गाठीभेटी होतील. विवाहेच्छूक तरुणांना मनपसंत जोडीदार मिळेल.
शुभ दिनांक – 18, 19.

कुंभ – दशमेश व तृतीयेश मंगळ आपल्या राशीच्या पंचमस्थानातून भ्रमण करत आहे. तेथूनच होणारे चंद्राचे भ्रमण संततीच्या उत्कर्षाची वार्ता देणारी राहील. धनेश गुरु धनस्थानात तर अष्टमेश बुध अष्टमस्थानात अशी आर्थिक दृष्ट्या भक्कम ग्रहस्थिती आपणास लाभली आहे. नोकरी – व्यवसायातून, संततीकडून तसेच कुटुंबातून म्हणजेच स्थावर मालमत्तेतून आर्थिक लाभ संभवतात. दिवाळीचा हा कालावधी आपणासाठी भरभराटीचा राहणार आहे. आपल्या प्रत्येक प्रयत्नांना यश येणार आहे. आत्ता सध्याच्या गाठीभेटीतून आनंद मिळवाल. प्रवास योग घडतील. सामाजिक कार्यात आत्ता सेवाभावी संस्थांमध्ये मदत करण्यास आपण सतत तत्पर असणार आहात. जोडीदाराचे चांगले सहकार्य लाभेल. आपले एखादे काम पूर्ण होईपर्यंत मानसिक अस्वस्थता जाणवेल. योग्य व्यक्तीच्या सहकार्याने आपले काम पूर्णत्वाहोतस जाणार आहे. आठवड्याच्या उत्तरार्धात आव्हान चालवताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवावे. तसेच आपल्या रागावर नियंत्रण ठेवून महत्त्वाचे निर्णय अतिशय समोरचारानेे घेतले तर त्रास होणार नाही.
शुभ दिनांक – 20, 21.

मीन – आपल्या राशीतून गुरुचे तर धनेश मंगळाचे सुखस्थानातून भ्रमण होत आहे. आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या सुखस्थानातूनच चंद्राचे देखील भ्रमण होत आहे. घरगुती उत्सव समारंभात सहभागी व्हाल. धार्मिक शुभकार्य घडतील. नवीन वाहन वास्तूचे योग आहेत. कुटुंबातील व्यक्तींचा संबंधित सुवार्ता कानी येतील. गृहसुशोभीकरण्यासाठी आकर्षक, शुभेच्या तसेच इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तूंची खरेदी केली जाईल. वडीलधाऱ्या व्यक्तींचे सहकार्य लाभेल. संत सज्जनांचा सहवास लाभेल. संततीची रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षातून यश लाभेल. दैनंदिन जीवनातून विरंगुळा मिळण्याच्या दृष्टीने सहलीत सहभागी व्हाल. राशीतील गुरुमुळे साडेसातीचा त्रास जाणवणार नाही. अध्यात्मिक प्रगती होईल. आठवड्याच्या उत्तरार्धात भागीदारी व्यवसायातून उत्पन्न वाढेल. दिवाळीतील ग्रहमान आपल्या उत्कर्षास अनुकूल राहील.
शुभ दिनांक – 22 , 23.
- श्री बालाजी ज्योतिषालय आणि वास्तू कन्सल्टन्सी, पुणे
9011149780 / 8668293104
टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. क फॅक्टस टीम याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असू असेही नाही.