Home » दिवसभरात 10 हजार स्टेप्स चालणे होत नाही तर ‘या’ टीप्स फॉलो करा

दिवसभरात 10 हजार स्टेप्स चालणे होत नाही तर ‘या’ टीप्स फॉलो करा

दिवसभरात दहा हजार स्टेप्स चालणे आणि त्या ट्रॅक करण्यासाठी स्मार्ट वॉच वापरणे सध्याच्या दिवसात सामान्य झाले आहे. ए

by Team Gajawaja
0 comment
walking 10K steps
Share

दिवसभरात दहा हजार स्टेप्स चालणे आणि त्या ट्रॅक करण्यासाठी स्मार्ट वॉच वापरणे सध्याच्या दिवसात सामान्य झाले आहे. एक्सपर्ट्स सुद्धा फिट आणि हेल्दी राहण्यासाठी दहा हजार स्टेप्स चालण्याचा सल्ला देतात. अशातच अशी काही लोक असतात ती दहा हजाराचा आकडा पार करू शकत नाहीत. खरंतर 10 हजार स्टेप्स चालल्याने तुमच्या वजनात अधिक फरक पडत नागी. मात्र शरीर हे फिजिकली अॅक्टिव्ह राहण्यासाठी फार महत्त्वाचे असते. जी लोक कामाच्या व्यापातून व्यायामासाठी वेळ काढू कत नाही त्यांनी लहान-मोठ्या अॅक्टिव्हिटी करून दहा हजार स्टेप्सचे गोल पुर्ण करू शकतात. याच संदर्भातील काही टीप्स आपण पाहूयात. (Walking  health benefits)

लिफ्ट ऐवजी पायऱ्यांचा वापर करा
पायऱ्या चढणे आणि उतरणे सुद्धा एक उत्तम एक्सरसाइज आहे. मात्र बहुतांश लोकांना पायऱ्या चढण्यास फार कंटाळा येतो. ती लोक पायऱ्यांऐवजी लिफ्टचा वापर करतात. मात्र असे न करता पायऱ्यांचा वापर केल्यास तर संपूर्ण शरीरासाठी हे फायदेशीर ठरू शकते. ऑफिस असो किंवा घरी दररोज चार मजले तरी तुम्ही चढलात आणि उतरलात तरीही कॅलरीज बर्न होऊ शकतात. यामुळे तुमचे स्टेप काउंट ही वाढले जाईल.

कार दूर पार्क करा
दिवसभर खुर्चीवर बसून राहणे आणि नंतर कार चालवणे. अशातच आपल्याकडे चालण्यासाठी वेळच मिळत नाही. ज्या लोकांना दहा हजार स्टेप्स पूर्ण करायची असतात त्यांनी आपली कार घरापासून दूर पार्क करावी. जेणेकरुन चालण्यासाठी वेळ मिळेल. कार जवळजवळ 500 मीटर दूरवर पार्क करा. त्यामुळे सर्वसाधारणपणे तुम्ही 250 स्टेप्स तरी चालाल.

दररोज एक तास वॉक करा
दिवसभरात 10 हजार स्टेप्स चालणे अशा लोकांसाठी सोपे नाही जे डेस्क जॉब करतात. वजन वाढणे आणि हाडं दुखण्यामागील कारण म्हणजे तुमची नोकरी. जर तुम्ही तुमची नोकरी बदलू शकत नसाल तर आपल्या लाइफस्टाइलमध्ये बदल करा. डेस्कटॉप जॉब करणाऱ्या प्रत्येकाने एक तास तरी चालावे. त्याचसोबत काम करताना मधून मधून उठावे. पाच मिनिटे तरी वॉक करा, स्ट्रेच करा. (Walking  health benefits)

हेही वाचा- बसून-बसून झोपणे ठरु शकते जीवघेणे

पब्लिक ट्रांसपोर्टचा वापर करा
चालणे काही आजारांपासून तुम्हाला दूर ठेवते. पब्लिक ट्रांसपोर्टचा वापर केल्याने पैसे, इंधन आणि पर्यावराचा बचाव करण्यास मदत होऊ शकते. ऑफिस किंवा एखाद्या ठिकाणी फिरायला जायचे असेल तर तुम्ही मेट्रो किंवा बसचा ऑप्शन निवडू शकता. यामुळे तुमचे चालणे सुद्धा होईल.

 


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.