पुढच्या काही दिवसातच भारतात सर्वाधिक आवडणारा सण साजरा होणार आहे. हा सण म्हणजे, होळी. भारतातील होळीच्या रंगाची आता देशातच नाही तर परदेशातही भुरळ पडली आहे. विशेषतः कृष्णाच्या वृंदावनमध्ये (Vrindavan) होणा-या होळीसाठी मोठ्या प्रमाणात परदेशी नागरिक भारतात येत आहेत. वृंदावनमध्ये(Vrindavan) होणा-या होळीसाठी भारतातील सर्व भागातील नागरिक वृंदावनमध्ये जातात, त्यांच्यापाठोपाठ विदेशी नागरिकही येथे दाखल होऊ लागले आहेत.
उत्तर प्रदेशातील वृंदावनमध्ये (Vrindavan) मोठ्या प्रमाणात होळी साजरी करण्यात येणार आहे. रंगोत्सव नावानं हा उत्सव साजरा होणार आहे. उत्तर प्रदेश ब्रज तीर्थ विकास परिषद आणि सांस्कृतिक विभागातर्फे यासाठी विशेष तयारी सुरु झाली आहे. यासाठी वृंदावनमध्ये (Vrindavan) भगवान कृष्णाच्या जीवनावरील आकर्षक देखावे उभारण्यात येणार आहेत. यासोबत मथुरा, वृंदावन (Vrindavan) आणि बरसाना येथेही अशाचप्रकारे भव्य होळी साजरी करण्यात येणार आहे. याभागात होळीसाठी मोठ्या प्रमाणात भारतीय आणि परदेशी नागरिक येतात, त्यांच्यासाठी येथे विशेष सुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत.
वृंदावनमधील (Vrindavan) होळीचा सण हा सर्वाधिक मोठा सण असतो. तब्बल 40 दिवस हा सण येथे खेळला जातो. मात्र शेवटच्या आठवड्यात या होळीची रंगत खरी वाढते. बरसाना येथील लाडू होळी आणि लाठमार होळीने या उत्सवाची सुरुवात होते. वृंदावनाची (Vrindavan) होळी बघण्यासाठी दरवर्षी येथे लाखो पर्यटक येतात. मथुरा येथेही पर्यटक या होळीसाठी गर्दी करतात. या प्रत्येक ठिकाणच्या होळीचे वैशिष्ट वेगळे आहे.
वृंदावनच्या (Vrindavan) होळीची सुरुवात फुलांच्या होळीपासून होते. आठवडाभर ही अशीच फुलांची होळी साजरी केली जाते. या होळीची सुरुवात 17 मार्च पासून होणार आहे. बरसाणा येथील राधा राणी मंदिरात फाल्गुन उत्सवाला सुरुवात होईल. यानंतर लाडू होळी येथे खेळली जाईल. 18 मार्च रोजी राधा राणी मंदिर, बरसाना येथे सायंकाळी 4.30 पासून लाठमार होळी खेळली जाईल. 19 मार्च रोजी नांदगाव येथे सायंकाळी 4.30 वाजता लाठमार होळी खेळण्यात येणार आहे. 20 मार्च रोजी फुलवारी होळी साजरी होणार आहे.
वृंदावनच्या बांके बिहारी मंदिरात सायंकाळी चारनंतर ही होळी साजरी होणार आहे. 21 मार्च रोजी गोकुळमध्ये दुपारी 12 वाजल्यापासून छडी मार होळी खेळण्यात येणार आहे. 23 मार्च गोपीनाथ मंदिर, वृंदावन येथे दुपारी 12 वाजल्यापासून होळी खेळली जाणार आहे. 24 मार्च रोजी बांके बिहारी मंदिरात सकाळी 9 ते दुपारी 1.30 पर्यंत फुलांची होळी खेळली जाणार आहे. 25 मार्च रोजी मथुरा आणि वृंदावन (Vrindavan) येथे मुख्य होळी खेळली जाणार आहे. 26 मार्च रोजी बलदेवाच्या दौजी मंदिरात दुपारी 12.30 पर्यंत हुरंगा होळी खेळली जाणार आहे. 2 एप्रिल रोजी रंगजी मंदिर, वृंदावन येथे होळी खेळली जाणार आहे.
वृंदावनमध्ये (Vrindavan) होणा-या या होळीची सुरुवात अगदी अनोख्या पद्धतीने होते. वृंदावनच्या होळीची सुरुवात भगवान कृष्णानं केली असे सांगितले जाते. त्यामुळे आजही वृंदावनच्या होळीची सुरुवात भगवान कृष्णच करतात, असे स्थानिक भक्तीभावानं सांगतात, तीच भावना जोपासत पहिला रंग कृष्णाच्या नावानं अर्पण केला जातो.
ब्रजमध्ये होळीचा उत्सव बसंत पंचमीच्या दिवसापासून सुरू होतो. या दिवसापासून येथील प्रत्येक गल्ली रंगानं न्हावून गेल्यासारखी दिसते. बांके बिहारी मंदिराच्या भोवती संपूर्णपणे रंग खेळणा-या भाविकांच्या टोळ्या असतात. येथील इस्कॉन मंदिरातही होळीच्या या सणाचा मोठा उत्सव असतो. बांके बिहारी मंदिराजवळ असलेल्या इस्कॉन मंदिराभोवती परदेशी पर्यटक मोठ्या संख्येनं येतात. इस्कॉन मंदिराच्या भोवती असलेल्या पांढ-या टाईल्स या होळीच्या निमित्तानं रंग आणि फुलांनी सजून जातात. इस्कॉन मंदिरातील भाविक एकमेकांवर रंगीबेरंगी फुलं आणि पाकळ्या टाकतात आणि गोपाळ भजनात रंगून जातात. हा होळीचा सण बघण्यासाठी येथे मोठ्या प्रमाणात देशी आणि परदेशी पर्यटक गर्दी करतात.
=============
हे देखील पहा : सणासुदीला गोड पदार्थ खाऊनही बर्न करू शकता कॅलरी
=============
वृंदावनमधील (Vrindavan) प्रेममंदिरही या होळीच्या रंगात रंगलेले असते. प्रेम मंदिर हे वृंदावनातील (Vrindavan) सर्वात मोठ्या मंदिरांपैकी एक मानले जाते. या मंदिरात भगवान श्रीकृष्णाची विविध रुपे दाखवण्यात आली आहेत. लाखो पर्यटक या प्रेण मंदिराबाहेर होळी साजरी करण्यासाठी येतात. येथील गोविंद देव जी मंदिराही होळी मोठ्या थाटात साजरी होते.
वृदांवन (Vrindavan) मधील सर्वात प्राचीन असलेले हे मंदिर सात मजली असून संपूर्णपणे दगडी आहे. मजले आहेत. येथेही होळी साजरी करण्यासाठी मोठ्या संख्येनं पर्यटक दाखल होतात. वृंदावन, मथुरा येथील या होळीसाठी आता प्रशासनही कामाला लागले आहे. वृंदावन (Vrindavan) येथील हॉटेल आतापासून हाऊसफूल झाली असून, परदेशी पर्यटकांसाठी काही ठिकाणी अलिशान तंबूही उभारण्यात येणार आहेत.
सई बने…