रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे वैयक्तिक आयुष्य हे कधीही सोशल मिडियामध्ये उघड झाले नाही. पुतिन यांच्या मुलांबाबत फारशी माहिती नाही. मात्र याला अपवाद त्यांची दुसरी मुलगी तिखोनोवा आहे. तिखोनोवा ही व्लादिमीर पुतिन यांची दुसरी मुलगी आहे. अत्यंत प्रतिभावन असलेली तिखोनोवा ही पुतिन यांची लाडकी मुलगी असल्याची माहिती आहे. त्यामुळेच तिखोनोवा अनेकवेळा रशियन सरकारी कार्यक्रमात दिसते. तिखोनोवा ही बरीचशी पुतिन यांच्यासारखी दिसते, तल्लख बुद्धी असलेली तिखोनोवा, पुतिन यांची लाडकी मुलगी आहे. आता ही 39 वर्षीय तिखोनोवा रशियन राजकारणात एन्ट्री घेण्याच्या विचारात आहे. पुतिन यांचे विश्वासू सहकारी लावरोव्ह यांची जागा तिखोनोवा घेण्याची शक्यता आहे. पुतिन यांच्या किचन कॅबिनेटमध्ये तिखोनोवा सामील होणार असल्याची चर्चा आहे. असे झाल्यास पुतिन यांच्या कुटुंबातील राजकारणात येणारी तिखोनोवा ही पहिलीच व्यक्ती ठरणार आहे. तिखोनोवा ही एक शास्त्रज्ञ आहे. शिवाय व्यवस्थापक आणि अॅक्रोबॅटिक नृत्यांगना म्हणूनही ती लोकप्रिय आहे. (Vladimir Putin)

व्लादिमीर पुतिन यांचे वैयक्तिक आयुष्य अतिशय गुप्त ठेवण्यात येते. त्यांची पत्नी, मैत्रिणी आणि मुलांविषयी फार माहिती नाही. मात्र पुतिन यांची दुसरी मुलगी तिखोनोवा ही रशियात कायम चर्चेत असते. तिखोनोवा ही तिच्या वडिलांसारखी तल्लख बुद्धीची मुलगी म्हणून ओळखली जाते. स्वतः शास्त्रज्ञ असलेल्या तिखोनोवाची स्वतःची कंपनी आहे. आता ही एकातेरिना तिखोनोवा क्रेमलिन, म्हणजेच रशियन राष्ट्रपती निवासस्थानामध्ये मोठ्या पदावर विराजमान होणार आहे. काही दिवसांपूर्वी रशियाचे परराष्ट्र मंत्री आणि पुतिन यांचे जवळचे विश्वासू सर्गेई लावरोव्ह यांनी राजकारणापासून दूर होत असल्याची घोषणा केली. तेव्हाच तिखोनोवा चर्चेत आली. लावरोव्हची जागा घेण्यासाठी तिखोनोवा प्रयत्नशील आहे. पुतिन यांचे भाषण लिहिणारे क्रेमलिनचे माजी कर्मचारी अब्बास गल्यामोव्ह यांना याबाबत एक पोस्ट शेअर केली. त्यानंतर तिखोनोवा ही पुतिन यांचा वारसा चालवण्यासाठी तयार असल्याच्या चर्चा रशियात होऊ लागल्या आहेत. (International News)
तिखोनोवा ही व्लादिमीर पुतिन यांची पहिली पत्नी ल्युडमिला हिच्यापासून झालेली दुसरी मुलगी आहे. तिखोनोवा यांनी सेंट पीटर्सबर्ग स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेतले. पदवीधर होताना त्यांनी आशियाई देशांबद्दल विस्तृत अभ्यास केला असून पुतिन मंत्रीमंडळात आशियाई देशांबद्दल प्रमुख मार्गदर्शक म्हणूनही तिखोनोवा सहभागी होऊ शकतो. तिखोनोवाचा जन्म ड्रेस्डेन, पूर्व जर्मनी येथे झाला, ती व्लादिमीर पुतिन आणि ल्युडमिला पुतिना यांच्या दोन मुलींपैकी धाकटी मुलगी आहे. तिखोनोवा यांनी सेंट पीटर्सबर्गमधील जर्मन शाळेत शिक्षण घेतले. काही वर्ष तिखोनोवा आणि तिची बहीण मारिया यांनी सुरक्षितेच्या कारणासाठी जर्मनीत राहून शिक्षण घेतले. यासर्वात तिखोनोवा यांनी जर्मन, मँडरीन या भाषांचा अभ्यास केला. मॉस्को स्टेट युनिव्हर्सिटीमधून त्यांनी जपानमध्ये स्पेशलायझेशनसह पदवीही प्राप्त केली आहे. (Vladimir Putin)

इनोप्राक्टिकाची या प्रकल्पाची त्या संचालक आहेत. मॉस्को स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये विज्ञान केंद्र तयार करण्यासाठी यातून काम केले जाते. डिसेंबर २०१९ मध्ये, तिखोनोव्हा रशियन फेडरेशन सरकारच्या अंतर्गत शारीरिक संस्कृती आणि सामूहिक क्रीडा विकास परिषदेच्या सदस्य झाल्या. फेब्रुवारी २०२० मध्ये तिखोनोवाला मॉस्को स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये एका नवीन कृत्रिम बुद्धिमत्ता संस्थेचे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तेव्हापासूनच ती प्रत्यक्ष राजकारण प्रवेश करणार अशी अटकळ व्यक्त करण्यात येत होती. जुलै २०२२ पासून तिखोनावा रशियन युनियन ऑफ इंडस्ट्रिस्टलिस्ट अँड एंटरप्रेन्योर्सच्या आयात सबस्टिट्यूशन कोऑर्डिनेशन कौन्सिलच्या सह-अध्यक्ष आहेत. (International News)
=========
Nitish Kumar : ‘या’ पाच जणांनी सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पद गाजवलंय !
=========
वडिलांप्रमाणे तिखोनोवा यांनाही साहशी खेळांची आवड आहे. २०१० मध्ये तिखोनोवा यांनी अॅक्रोबॅटिक रॉक अँड रोलमध्ये सराव सुरु केला. हा एक दुर्मिळ, नॉन-ऑलिंपिक खेळ आहे. यात तिखोनोवा आणि तिचा जोडीदार, इव्हान क्लिमोव्ह हे स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या २०१३ च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पाचव्या स्थानावर आले. २०१४ मध्ये, ही जोडी रशियन चॅम्पियनशिपमध्ये दुसऱ्या स्थानावर राहिली आहे. तिखोनोव्हाने रोसिया बँकेचे सह-मालक निकोले शामालोव्ह यांचा मुलगा, किरील शामालोव्ह याच्याबरोबर लग्न केले होते. किरील हे रशियन गॅस प्रक्रिया आणि पेट्रोकेमिकल कंपनी सिबूर होल्डिंगचे उपाध्यक्ष आहेत. मात्र या दोघांचा घटस्फोट झाल्याची माहिती आहे. तिखोनोवावर तिच्या वडिलांचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळेच पुतिन यांची वारसदार म्हणून तिच्या नावाची चर्चा रशियामध्ये असते. आता तिची नियुक्ती कॅबिनेटध्ये झाली, तर या चर्चेला पुष्टी मिळणार आहे. (Vladimir Putin)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
