मां विंध्यवासिनी देवी मंदिर हे उत्तर प्रदेश राज्यातील गंगा नदीच्या काठावरील विंध्याचलमध्ये असलेले देवी मातेचे प्रमुख मंदिर आहे. हे प्रमुख देवी माँ विंध्यवासिनी देवीच्या सर्वात पूजनीय शक्तीपीठांपैकी एक आहे. या मंदिरात दररोज मोठ्या संख्येने लोक येतात. चैत्र आणि अश्विन नवरात्रौत्सवात ही भक्तांची संख्या हजारो होते. या मंदिराला पौराणिक वारसा आहे. भारतातील 51 शक्तीपीठांपैकी प्रमुख शक्तिपीठ असलेल्या या मंदिरात भक्तांची वाढती संख्या पाहता हा सर्वच मंदिर परिसर भव्य असा मां विंध्यवासिनी धाम कॉरिडॉर करण्यात येणार आहे. मात्र यामुळे या मंदिर परिसरातील काही मंदिरांना धक्का लागल्यास विनाश सुरु होईल, असा दावा येथील ग्रामस्थांनी केला आहे. गावक-यांच्या मते या मंदिरात अनेक विघातक शक्तींना देवीने बंदी केले आहे. मंदिराच्या कोणत्याही भागाला विकासकामात धक्का लागला तर या वाईट शक्ती मुक्त होतील, आणि त्यामुळे मोठे संकट ओढावणार आहे. गावक-यांच्या या दाव्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. (Vindhyavasini Temple)
विंध्य पर्वतावर वसलेले आदिशक्ती मां विंध्यवासिनीचे निवासस्थान जगभर प्रसिद्ध आहे. सध्या या मंदिर परसरात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरु आहेत. मां विंध्यवासिनी धाम सुशोभित करण्यासाठी विंध्य कॉरिडॉर बांधण्यात येत आहे. या कॉरिडॉरमुळे येणा-या भिविकांची मोठी सोय होणार आहे. या कॉरिडॉरच्या बांधकामात अनेक मंदिरे पाडण्यात आली आहेत. मात्र मां विंध्यवासिनीच्या मंदिरास जरा जरी धक्का लागला तर मोठे संकट येईल, असा इशारा स्थानिकांनी दिला आहे. या मंदिराच्या पुजा-यांनी यासंदर्भात इशारा दिला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार मां विंध्यवासिनी मंदिरात तंत्र पुजा केली जाते. विकासकामासाठी मंदिर पाडल्यास कैदेत असलेल्या भूत-प्रेतांची सुटका होईल. आणि त्याचे दुष्परिणाम मोठे असतील असे पुजा-यांचे म्हणणे आहे. लवंग, सुपारी, लिंबू आणि कापूरसह माता विंध्यावासिनीची पुजा केली जाते. यासोबत या धाम परिसरात अन्य देवींचीही मंदिरे आहेत. मां विंध्यवासिनीच्या निवासस्थानी माँ धाधा देवी आहे आणि माँ फुलमती देवी मंदिरही आहे. येथे सर्वसामान्यांना प्रवेश बंदी आहे. (Vindhyavasini Temple)
मात्र कॉरिडॉरच्या कामात या मंदिरांना काही नुकसान झाले तर अनिष्ट परिणाम होतील, असे पुजा-यांचे म्हणणे आहे. त्यामुळे हे मंदिर पाडण्यास मोठा विरोध होत असून, मंदिर पाडण्याऐवजी अन्य मार्गाचा अवलंब करावा अशी मागणी माता विंध्यवासिनी धाममध्ये धडा आणि फुलमतीचे मंदिर आहे. येथे भूत, पिशाच, पिचकाटे आदींपासून मुक्ती मिळवण्यासाठी देशातूनच नव्हे तर परदेशातूनही भाविक मोठ्या संख्येने येतात. असे मानले जाते की, माँ धाडाच्या पायाशी भूत आणि आत्मे बांधलेले असतात, ज्यामुळे भक्तांचे सर्व त्रास दूर होतात. म्हणूनच या मंदिरात सर्व भक्त जात नाहीत. ज्यांना काही त्रास असेल तेच भक्त या मंदिरात प्रवेश करतात. आता कॉरिडॉरच्या कामात या मंदिरांला अन्य स्थळी हलवावे का याचा विचार करण्यात येत आहे. मात्र त्याला विरोध वाढला आहे. (Vindhyavasini Temple)
====================
हे देखील वाचा : जेष्ठा गौरी सण साजरा करण्याच्या पद्धती
====================
भगवती विंध्यवासिनी ही पहिली महाशक्ती आहे. शारदीय नवरात्री आणि चैत्र नवरात्री या दोन्ही प्रसंगी येथे लाखो भाविक येतात. माता विध्यंवासिनीचे जगभरातील भक्त या मंदिरात मातेच्या दरबारात हजेरी लावतात. अलिकडच्या काळात या भक्तांची संख्या वाढल्यामुळे त्यांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून या भागात कॉरिडॉरची निर्मिती करण्यात येत आहे. पौराणिक काळापासून माता विंध्यवासिनीचा उल्लेख आहे. श्रीमद भागवत पुराणातील कथेनुसार श्रीकृष्णाला कंसापासून वाचवण्यासाठी वासुदेवजींनी त्यांना गोकुळातील नंदजींच्या घरी नेले. तेथे माता यशोदेच्या पोटी योगमाया भगवती शक्तीचा जन्म झाला होता. याच भगवतीला घेऊन वासुदेव मथुरेच्या कारागृहात आले. कंसाला हे कळल्यावर त्यांनी त्या नवजात मुलीला दगडावर फेकून मारण्याचा प्रयत्न केला. मात्र भगवती तेव्हा प्रकट झाली आणि कंसाच्या मृत्यूची भविष्यवाणी केली. तिच भगवती माता विंध्यवासिनीच्या रुपात विंध्याचल पर्वतावर प्रकट झाली. हे मातेचे स्वरुप अष्टभुजा आहे. माता विंध्यवासिनीचे मंदिर हे जगातील ईश्वरी शक्तीचे पहिले स्वयंनिर्मित तीर्थक्षेत्र मानले जाते. महाभारत काळातही माता विंध्यवासिनीचा उल्लेख आहे. आता याच विंध्यवासिनी कॉऱडोरच्या उभारणीसाठी चालू असलेल्या विकासकामांवर आक्षेप घेण्यात येत आहे. (Vindhyavasini Temple)
सई बने