Home » विक्रोळीमुळे भारताची लोकशाही बळकट झाली

विक्रोळीमुळे भारताची लोकशाही बळकट झाली

by Team Gajawaja
0 comment
Vikroli Contribution
Share

विक्रोळी, मुंबईचं एक उपनगर. या विक्रोळीमुळे भारतातली लोकशाही बळकट होण्यास मदत झाली. भारताच्या लोकशाहीत खारीचा का होईना या विक्रोळीने उचलला आहे. आता तुम्ही म्हणाल की विक्रोळीत काय स्वातंत्र्यलढा सुरू झाला होता, की गांधीच्या प्रेरणेने कुठली चळवळ सुरु झाली होती. तर असे काही झालेले नाही. मग असे विक्रोळीत काय झालं ज्यामुळे जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीची पाळंमुळं घट्ट झाली होती जाणून घेऊयात.

Halt Station India या राजेंद्र अकलेकर यांनी हा विक्रोळीचा किस्सा सांगितला आहे. आज अस्ताव्यस्त पसरलेली विक्रोळी हा मुंबईचा भाग नव्हताच. साष्टी बेटावरचा हा भाग ठाणे जिल्ह्यात होता. पुढे १९९५ साली महायुती सरकारने मुंबई मुलुंडपर्यंत वाढवली. ब्रिटिशांच्या काळात या भागातला मोठा भुखंड ब्रिटिशांनी विकायला काढला. १९४२ साली गोद्रेज कुटुंबापैकी पिरोजशा गोद्रेज यांनी आपल्या मुलाच्या नावाने इथली जमीन विकत घेतली. विक्रोळीच्या जमिनीचा चार टप्प्यांत लिलाव झाला. (Vikroli Contribution)

ही जमीन विकत घेण्यासाठी पिरोजशा यांनी आपले शेअर्स विकले इतकंच काय कर्जही काढलं होतं. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच इथे स्टेशन बांधण्यात आलं. त्याचं श्रेयही गोद्रेज ग्रुपला जातं. कारण गोद्रेज ग्रुपने आपली औद्योगिक वसाहत इथे उभी केली. कामगारांना जाण्या येण्यासाठी एक स्टेशन बांधण्यात आलं. या स्थानकाजवळ दोन गावं होती एक हरियाली गाव आणि विक्रोळी गाव. विक्रोळी गाव हे स्थानकाच्या खुपच जवळ असल्यानं या स्थानकाचं नावही विक्रोळी ठेवण्यात आलं. (Vikroli Contribution)

१९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळालं. पण भारताची पहिली ऐतिहासिक निवडणूक १९५१-१९५२ दरम्यान झाली. तेव्हा आतासारखी टेक्नॉलॉजी नव्हती. मतदानासाठी मतदारांना मतपत्रिका दिल्या जायच्या. मतदार आपल्या आवडीच्या उमेदवाराच्या चिन्हापुढे शिक्का मारायचे आणि ती मतपत्रिका मतपेटीत टाकायचे. आता भारतात एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान होणार होतं. त्यासाठी मोठ्या प्रमाणात मतपेट्या हव्या होत्या. तेव्हा भारत सरकारने गोद्रेज कंपनीशी संपर्क साधला. आणि त्यांना मतपेटी बनवण्याचं कंत्राट दिलं. (Vikroli Contribution)

================

हे देखील वाचा : मुंबई नंबर वन !

================

गोद्रेज कंपनीने मेहनत करून भारत सरकारसाठी १२ लाख ५८ हजार ३७१ मतपेट्या तयार केल्या होत्या. या सर्व मतपेट्या नंतर रेल्वेनेच भारताच्या सर्व भागात पोहोचवल्या गेल्या. भारतातली ही पहिली निवडणूक होती. आणि संपूर्ण जगाचे भारताकडे लक्ष होतं. अनेकांना वाटलं की भारतात या निवडणुका व्यवस्थित होणार नाहीत. पण त्या व्यवस्थित पार पडल्या आणि पहिलं लोकनियुक्त सरकार स्थापन झालं. १९५२ च्या निवडणुकीमुळे भारतात लोकशाही स्थिरस्थावर झाली. आणि यासाठी अशा प्रकारे विक्रोळीने आपला खारीचा वाटा उचलला होता. (Vikroli Contribution)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.