Home » Success Story : वडील सैन्यात अधिकारी, मुलगी IAF च्या मागी स्क्वाड्रनची प्रमुख वर्लिन पनवार, आता बॉलिवूडच्या कलाकारांना देतेय ट्रेनिंग

Success Story : वडील सैन्यात अधिकारी, मुलगी IAF च्या मागी स्क्वाड्रनची प्रमुख वर्लिन पनवार, आता बॉलिवूडच्या कलाकारांना देतेय ट्रेनिंग

by Team Gajawaja
0 comment
Varlin Panwar Success Story
Share

Varlin Panwar Success Story : लष्करी कुटुंबांची जीवनशैली ही नेहमीच सामान्य कुटुंबांपेक्षा वेगळी असते. अशाच एका लष्करी वातावरणात वाढ झालेल्या व्हर्लिन पनवार यांचे वडील भारतीय लष्करात होते. लहानपणापासून शिस्त, समर्पण आणि दिनचर्येचे संस्कार त्यांच्या मनात इतके खोलवर रुजले की त्यांनी आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सैनिकी जीवनाची वाट निवडली. व्हर्लिन पनवार यांनी भारतीय हवाई दलात तब्बल १० वर्षे स्क्वॉड्रन लीडर म्हणून सेवा दिली आणि २०१८ मध्ये त्या निवृत्त झाल्या.

निवृत्तीनंतरही त्या थांबल्या नाहीत. त्यांनी आपले सैनिकी ज्ञान आणि कौशल्य विविध क्षेत्रांत उपयोगात आणले. आयपीएलमधील तांत्रिक सुरक्षा व्यवस्थेत काम करणे असो, किंवा हवाई दलावर आधारित चित्रपटांमध्ये कलाकारांना प्रशिक्षण देणे असो, त्यांनी प्रत्येक भूमिकेत स्वतःचे 100 टक्के दिले. त्यामुळेच त्यांची ही यशोगाथा लष्करात करिअर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अनेक तरुण मुलींसाठी प्रेरणादायी ठरली आहे.(Latest Marathi News)

‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ला दिलेल्या मुलाखतीत व्हर्लिन पनवार यांनी सांगितले की त्यांच्या वडिलांची तैनाती विविध शहरांमध्ये होती. त्यामुळे वारंवार बदलणाऱ्या वातावरणात स्वतःला सामावून घेणे हे आव्हान होते. मात्र, हळूहळू त्यांच्यात देशसेवेची ओढ निर्माण झाली. दर रविवारी वडिलांसोबत धावताना ते त्यांना सैन्यातील अनुभव सांगायचे, आणि त्यांच्या डोळ्यांतील चमक पाहून व्हर्लिन यांनाही त्या वाटेने चालायचे होते.

Varlin Panwar Success Story

Varlin Panwar Success Story

जेव्हा त्या १२ वर्षांच्या होत्या, तेव्हा डेहराडूनमध्ये त्यांच्या वडिलांसोबत त्यांनी पासिंग आउट परेड पाहिली आणि त्या दृश्याने त्यांच्या मनात सैन्यात जाण्याचा निर्धार अधिक बळकट झाला. त्यानंतर त्यांनी एनसीसीमध्ये सहभागी होताना अनेक आव्हानांना सामोरे गेले. अभ्यासासोबत एनसीसीचे कठोर प्रशिक्षण तारेवरची कसरत होती, परंतु त्यांनी यामध्येही यश मिळवत 17व्या वर्षी राष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्कृष्ट कॅडेटचा पुरस्कार पटकावला.

हवाई दलात निवड झाल्यावर जेव्हा त्यांनी प्रथम सैनिकी गणवेश परिधान केला, तेव्हा त्यांच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू आले. त्या क्षणी त्यांनी त्यांच्या वडिलांना फोन केला. त्यावेळी वडिलांनी दिलेला सल्ला – “पद मिळवू नकोस, ते कमाव” – हा त्यांच्या संपूर्ण आयुष्याचा मंत्र बनला.(Varlin Panwar Success Story)

=============

हे ही वाचा : 

Anandibai Joshi : एका सामान्य स्त्रीची असामान्य यशोगाथा – डॉक्टर आनंदीबाई जोशी

Shah Rukh Khan Life : किंग खानच्या आयुष्यातील 5 खास किस्से, घ्या जाणून

===============

हवाई दलात फायटर कंट्रोलर म्हणून नियुक्त झाल्यावर त्यांच्यासमोर अनेक जबाबदाऱ्या आल्या. २०१८ मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या फ्लायपास्टवेळी एक अज्ञात वस्तू भारतीय सीमेकडे येताना दिसली. त्यांनी त्वरित निर्णय घेत विमानाला सुरक्षितपणे खाली उतरवण्याचे आदेश दिले, आणि तो निर्णय त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात कठीण निर्णयांपैकी एक ठरला.(Latest Marathi News)

2018 मध्ये हवाई दलातून निवृत्त झाल्यानंतर व्हर्लिन पनवार यांनी आयपीएलमध्ये तांत्रिक सुरक्षा व्यवस्थापन आणि बॉलिवूड चित्रपटांमध्ये सल्लागार म्हणून काम करत एक नवे आयुष्य सुरू केले. स्वप्ने पाहा आणि ती पूर्ण करा, या तत्त्वावर विश्वास ठेवणाऱ्या तरुणांसाठी व्हर्लिन पनवार आज एक जिवंत प्रेरणा ठरल्या आहेत.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.