बेरोजगारी भत्त्याबद्दल (Unemployment Allowance) आपण नेहमीच ऐकतो. त्यानुसार सरकार शिकलेल्या बेरोजगार तरुणांना आर्थिक मदत करते. मात्र बेरोजगारी भत्ता हा सर्व नोकरी गमावलेल्या आणि नोकरी न करणाऱ्यांना लोकांना मिळतो का? खरंतर बेरोजगारी भत्त्यासंदर्भात काही नियम आणि अटी आहेत. सर्वात प्रथम बेरोजगारी भत्ता त्या तरुणांना दिला जातो जे शिकले आहेत पण बेरोजगार आहेत किंवा एखाद्या कारणास्तव आपली नोकरी गमावून बसले आहेत. ज्यामध्ये त्यांची काहीही चुक नाही.
बेरोजगारी भत्त्यासंदर्भात देशात अशी कोणताही एक विशेष योजना नाही की, ज्यामुळे फायदा हा प्रत्येक राज्यात होईल. दरम्यान विविध राज्यातील स्थानिक शासकीय बेरोजगा तरुणांना प्रोत्साहन देण्यासह आणि आर्थिक सहाय्यता करण्यासाठी एक विशेष योजना चालवली जाते.
कोणत्या लोकांना मिळतो बेरोजगारी भत्ता?
जेव्हा एखाद्या संकटामुळे फॅक्ट्री बंद झाली किंवा कंपनी मधून कर्मचाऱ्यांना कामावरुन काढल्याची स्थिती निर्माण झाल्यास यामुळे प्रभावित श्रमिकांना बेरोजगारी भत्त्याच्या रुपात कामगाराला त्याची दैनिक एकूण उत्पन्नाच्या ५० टक्के पेमेंट हे एका वर्षापर्यंत बेरोजगारी भत्त्याच्या रुपात दिले जाते. या दरम्यान, लाभार्थ्यांना आणि त्यांच्यावर अलंबून असलेल्या लोकांना सुद्धा फ्री मेडिकल केयर सुद्धा दिले जाते.
तर प्रत्येक राज्यात बेरोजारी भत्त्यासंदर्भात विविध योजना आहेत. काही देशांमध्ये सरकार शिक्षित बेरोजगार म्हणजेच शिक्षण घेऊन सुद्दा नोकरी न मिळणाऱ्या तरुणांना आर्थिक मदत देते.
हे देखील वाचा- वयाच्या ६० व्या वर्षी सेवानिवृत्ती नाही, का राज्य सरकारला मागे घ्यावा लागला निर्णय?
युपी-बिहार मध्ये बेरोजगारी भत्त्यासंदर्भात योजना
उत्तर प्रदेशात बेरोजगार तरुणांसाठी अशी योजना सरकारने काढली आहे ज्याअंतर्गत १ हजार ते १५०० रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते. दरम्यान, या योजनेचा लाभ केवळ उत्तर प्रदेशातील स्थित लोकांनाच मिळतो. या योजनेचा मुख्य उद्देश असा की, प्रदेशातील बेरोजगार तरुणांना आर्थिक मदत मिळावी. (Unemployment Allowance)
यामध्ये काही नियम सुद्धा आहेत. बेरोजगारी भत्त्यासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे वय हे २१ ते ३५ वर्षादरम्यान असावे लागते. तसेच परिवारातील एकूण उत्पन्न हे वर्षाला ३ लाखांपेक्षा अधिक नसले पाहिजे.
तुम्ही कसा घेऊ शकता फायदा?
सर्वात प्रथम तुम्हाला रोजगार कार्यालयात जाऊन रजिस्ट्रेशन करावे लागते. त्यासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करु शकता. रजिस्ट्रेशनसाठी तरुणांना बँक खात्याची माहितीसह अन्य काही महत्वाची कागदपत्र अपलोड करावी लागतात. बेरोजगार तरुणांना तीन वर्षापर्यंत आर्थिक मदत केली जाते.