जगभरात अशा अनेक जागा आहेत ज्या वेगवेगळ्या कारणांसाठी प्रसिद्ध असतात, जसं वास्तुसाठी, तेथील खानपानासाठी, निसर्ग सौंदऱ्यासाठी, ऐतिहासिक वारशासाठी. पण कधी असं होऊ शकतं का की एखाद गाव तिथे जन्माला येणाऱ्या मुलांसाठी प्रसिद्ध असेल? तर हो असं होऊ शकतं. केरळमधील कोडिन्ही हे गाव तिथे जन्माला येणाऱ्या मुलांसाठीच प्रसिद्ध आहे. कारण या गावात प्रत्येक घरात जुळ्या मुलांचा जन्म होतो. म्हणून या गावाला ‘Twins village’ म्हणून ओळखलं जातं. या गावात नवजात शिशुंपासून ६५ वर्षे वय असलेल्या लोकांपर्यंत जुळे पाहायला मिळतात. (Kerala)
केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यातील एका गावाच्या एंट्रेन्सलाच एक बोर्ड दिसतो, ज्यावर लिहिलं आहे “welcome to the god’s own twins village kodinhi.” या गावाची लोकसंख्या २००० हजारच्या आसपास कुटुंब आहेत. ज्यामध्ये जवळ जवळ ५५० जुळे भाऊ बहीण आहेत. या गावातील एका शाळेमध्ये तर ८० जुळी मुलं आहेत. इतक्या वर्षांत या डेटामध्ये खूप वाढ झाली आहे. २००८ ला हा आकडा २८० होता जो आता ५५० वर आला आहे. या गावात शाळा असो की बाजार, प्रत्येक ठिकाणी जुळी मुलं दिसतात. (Social News)
जुळी मुलं जन्माला येणं ही खूप Rare गोष्ट आहे. भारतात प्रत्येक १००० मुलांमागे ९ ते १६ चं मुलं जुळे जन्माला येतात. पण या गावात मुलं जन्माला येण्याची संख्या जागतिक सरासरीच्या सहा पट जास्त आहे. इथं काही कुटुंब तर असे आहेत जिथे दोन ते तीन वेळा जुळी मुलं जन्माला आली आहेत. त्यामुळेच हे गाव अनेक डॉक्टर्संना आणि तज्ञांना आकर्षित करतं पण गोंधळात सुद्धा टाकतं. ऑक्टोबर २०१६ मध्ये, सेंटर फॉर सेल्युलर एंड मॉड्यूलर बायोलॉजी, केरळ यूनिवर्सिटीज ऑफ फिशरिज एंड ओशिन स्टडीज आणि लंडन यूनिवर्सिटी सोबतच जर्मनीहून सुद्धा रिसर्चर्स या गावात संशोधनासाठी आले होते. तेव्हा त्यांनी ग्रामस्थांचे जुळ्या मुलांचे DNA गोळा केले. (Kerala)
सुरुवातीला या गावकऱ्यांचा आहार, हवामान आणि विशिष्ट रासायनिक घटकांमुळे इथे जुळे मुलं जन्माला येतात असा तर्क लावला गेला. पण व्यापक अभ्यास करून सुद्धा जुळ्या मुलांच्या जन्माच्या मागचं गूढ उलगडलं नाही. त्यातल्या त्यात लॉजिकल आणि सायंटिफीक रीजन म्हणजे जिनेटिक्स. पण या गावात अनेक जुळ्या मुलांचा जन्म अशा कुटुंबांमध्ये सुद्धा झाला आहे, ज्यांना जुळ्या मुलांचा इतिहास नाही. त्यामुळे गावाच्या या रहस्याची गूढता आणखी वाढते. पण या गावकऱ्यांची सुद्धा मान्यता आहे. ती म्हणजे गावात जुळ्या मुलांचा जन्म हा स्थानिक देवतेच्या कृपेने होतो. तर काहींचं म्हणण असं आहे की, गावाच्या पाण्याच्या गूढ शक्तींमुळे हे होतं. काही लोकं याला शतकानुशतके जुना आशीर्वाद मानतात, एक असं वरदान जे त्यांच्या गावाला भारतातील सर्वात वेगळं गाव ठरवतं. (Social News)
===============
हे देखील वाचा : Artificial Intelligence : AI सुरू करणार तिसरं महायुद्ध ?
===============
कोडिन्ही हे भारतातील एक चमत्कारिक गाव असलं तरी, जगभरात इतर ‘ट्विन टाऊन्स’ आहेत, जसं ब्राझीलमधील कॅंडिडो गोडोई. तरी कोडिन्ही जागतिक स्तरावर डॉक्टरांच लक्ष वेधून घेतं. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे, कोडिन्हीच्या महिलाही जेव्हा इतर ठिकाणी लग्न करून स्थलांतरीत झाल्या तरी त्यांनी जुळ्या मुलांना जन्म देण्याचा ट्रेंड सुरूच ठेवला. डॉक्टर्स आणि तज्ञांना हे कोडं सुटलं नाही कारण कोडिन्हीच्या लोकांचा आहार केरळच्या इतर भागांपेक्षा काही वेगळा नाही. त्यामुळे या गावात जुळे मुलं जन्माला का येतात? या प्रश्नांचं उत्तर गूढच आहे. (Kerala)